न्यूयॉर्क : भारतातील बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेचा कुख्यात नेता गुरपतवंत सिंग पन्नू याचा अमेरिकेत रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ( Gurpatwant Singh Pannu latest News )अमेरिकेतील हायवे 101 वर त्यांच्या कारला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.मात्र, त्यांच्या मृत्यूला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. प्रदीर्घ काळ भूमिगत राहून पन्नू भारतविरोधी कारवायांमध्ये सामील होता, असे सांगितले जाते. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर, अवतार सिंग खांडा यांच्याप्रमाणे आपल्यालाही लक्ष्य केले जाऊ शकते, अशी भीती त्याला होती.गुरपतवंत सिंग पन्नू सोशल मीडियावर भारताविरुद्ध विष ओकायचा आणि खलिस्तानच्या स्थापनेची बढाई मारायचा.
झी न्यूज पत्रकार दीपिक चौरसिया ने केले ट्विट
झी न्यूज चा पत्रकार दीपक चौरसिया ने ट्विट करून अपघातात मृत्यू झाल्याचा दावा केलाय,मात्र याच ट्विटमध्ये या बातमीसाठी अजून कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसल्याचेही म्हटलेय,दीपक चौरसिया अनेक कारणासाठी सोशल मिडियावर लोकांकडून ट्रोल होत असतात.
गुरपतवंत सिंग पन्नू याच्या कथित रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचा दावा करत दीपक चौरसिया कडून जो फोटो शेअर केला गेला आहे, तो प्रत्यक्षात 2021 मधला आहे.alt news चे पत्रकार अभिषेक यांनी ट्विट करून त्याची पोलखोल केली आहे.
पन्नूला भारतात दहशतवादी घोषित करण्यात आले आहे
भारत सरकारने 1 जुलै 2020 रोजी त्याला UAPA कायद्यानुसार दहशतवादी घोषित केले आहे. जुलै 2020 मध्ये पंजाब पोलिसांनी अमृतसर आणि कपूरथळा येथे पन्नूविरुद्ध देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले.पन्नू अनेकदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खलिस्तानच्या संदर्भात भारताविरुद्ध विष ओकत असे. त्याने आपल्या तथाकथित खलिस्तानमध्ये हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडचा समावेश करण्याची धमकीही दिली होती. पन्नू यांच्या सांगण्यावरून त्यांच्या शिख फॉर जस्टिस या संघटनेच्या दहशतवाद्यांनी जगभरातील हिंदू मंदिरे, भारतीय दूतावास आणि नागरिकांना लक्ष्य केल्याचा दावा करण्यात येतो.
दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू चा जन्म अमृतसरमध्ये झाला
गुरपतवंत सिंग पन्नू यांचा जन्म अमृतसरच्या खानकोट गावात झाला. नंतर तो कमाईसाठी परदेशात गेला आणि आयएसआयच्या मदतीने पंजाबमध्ये खलिस्तानी चळवळ पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहे.
त्यांनी परदेशात राहणाऱ्या शीखांना खलिस्तानच्या बाजूने भडकवले. एवढेच नाही तर पाकिस्तानी आयएसआयकडून मिळालेल्या पैशातून भारतात हिंसाचार पसरवण्याचा कटही रचला.
पैशाचे आमिष दाखवून तरुणांची दिशाभूल करत असे
पन्नू हा निरपराध तरुणांना पैशाचे आमिष दाखवून त्यांची दिशाभूल करायचा.
त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय आणि खलिस्तानबद्दल सहानुभूती असलेल्या लोकांकडून पैसे मिळत असे.
त्याचा वापर त्याने दहशत पसरवण्यासाठी आणि खलिस्तानवर खोटे सार्वमत आयोजित करण्यासाठी केला.
गुरपतवंत सिंग पन्नू जिवंत आहे की मृत्यू झालाय याबाबत अजून तरी कोणतेही अधिकृत वृत्त नाही.
तीन राज्याचा समान नागरी कायदा विरोध,आमदारांची घरे जाळली जातील
फ्रान्स का जळत आहे? 17 वर्षीय Nahel M नाहेल ला पोलिसांनी का मारलं?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 06 JULY 2023, 09:36 AM
WebTitle – Is the notorious Khalistani terrorist Gurpatwant Singh Pannu alive Death claim on social media latest news