नांदेड : शहीद अक्षय भालेराव हत्या akshay bhalerao nanded news प्रकरणामुळे पुरोगामी महाराष्ट्रातील वातावरण कमालीचे तापले असून परिस्थिती स्फोटक बनत चालली आहे.संपूर्ण आंबेडकरी समाजात या घटनेमुळे रोष आणि संताप व्यक्त केला जात असून शहीद अक्षय भालेराव हत्या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी समाजाच्यावतीने केली जात आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी शहीद अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.तसेच दोषी गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी योग्य तो पाठपुरावा केला जाईल असे नमूद करत शांतता राखण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
शहीद अक्षय भालेराव हत्याकांड,नांदेड मध्ये तीव्र निदर्शने
गेल्या काही दिवसांत दलित वंचित मुस्लिम समाजातील घटकांवर तथाकथित उच्चजातीयवाद्यांकडून हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे.जयंती साजरी केली म्हणून शहीद अक्षय भालेराव यांची केलेली हत्या असो,धर्मांध आणि जातीयवादी शक्तींच्या विरोधात आंदोलन हाथगाव येथील मातंग समाजातील नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली म्हणून तिथे गोंधळ घालून अत्याचार करून मातंग समाजावरच 395 अंतर्गत दरोडा टाकण्याचे गुन्हे नोंदवले गेलेत.अशी धक्कादायक माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रा.फारूख अहमद यांनी निदर्शनाच्यावेळी बोलताना दिली.
भुकमारी गावात अमोल पवार यांचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळून आला.लातूर जिल्ह्यात सावकारीच्या जाचामुळे पोलिस तक्रार केली म्हणून संपूर्ण कुटुंबावर हल्ला करण्यात आला.चोर आहेत असा संशय घेऊन तीन अल्पवयीन शीख मुलांची मॉब लिंचिंग करण्यात आली,यात दोघांचा मृत्यू झाला होता.दादर येथील आंबेडकर भवन परिसरात वंचितचे पदाधिकारी परमेश्वर रणशूर आणि गौतम हराळ यांच्यावर प्राणघातक हल्ल करण्यात आला.असे सांगत प्रा.फारूख अहमद यांनी अत्याचारांचा पाढा वाचला.तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावरही टीकेची झोड उठवली.पुरोगामी म्हणून आव आणत यांनी आमच्यासोबत दगाफटका केला अशी बोचरी टीका यावेळी प्रा.फारूख अहमद यांनी केली.
शहीद अक्षय भालेराव हत्या प्रकरण सोशल मिडियात लिहिणाऱ्यांची चौकशी – आंबेडकर
शहीद अक्षय भालेराव हत्या प्रकरणी सोशल मिडियात अनेकजण न्यायासाठी लिहीत आहेत,रोष संताप व्यक्त करत आहेत,तर दुसरीकडे शहीद अक्षय भालेराव यांच्या विरोधात काही चुकीचे व्हिडिओ आणि माहिती प्रसारित करून मृत्यूनंतरही विटंबना करण्याचे काम सुरू असल्याचे चित्र सोशल मिडियात दिसत आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केले असून शहीद अक्षय भालेराव यांच्या विरोधात वेडेवाकडे लिहिण्याने काही फरक पडणार नाही,मात्र हे लिहिणारे कोण आहेत? त्यांच्या या खुनाशी काही संबंध आहे का? असा प्रश्न विचारत आपला ज्याच्याशी संबंध नसतो त्याच्याविरुद्ध आपण काही बोलत नाही,त्यामुळे ज्याच्या ज्याच्या मोबाईलवरून अशाप्रकारे प्रकरणाला वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न केला गेलाय त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती यावेळी ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी दिली.मारेकऱ्यांना वाचवणाऱ्या राजकीय पुढाऱ्यांना सुद्धा सहआरोपी केलं पाहिजे.अशी मागणीही त्यांनी केली आहे.
अशोक चव्हाण यांची भेटीनंतर फेसबुकवर प्रतिक्रिया
ॲड.प्रकाश आंबेडकर यांनी शहीद अक्षय भालेराव यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले.तसेच दोषी गुन्हेगारांना शिक्षा देण्याबाबत कडक पाऊले उचलण्याची मागणी केली,ते निघून गेल्यानंतर तासाभरातच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी फेसबुक पोस्ट करून निषेध व्यक्त केला,तसेच याप्रकरणी राज्यसरकार अपयशी असल्याचे म्हटले.तसेच पोलिसांनी दिरंगाई, हलगर्जी न करता या गंभीर प्रकरणाचा योग्यपणे सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल करावे.अशी मागणी त्यांनी या पोस्टद्वारे केली आहे.
अशोक चव्हाण यांची फेसबुक पोस्ट खालीलप्रमाणे
बोंढार हवेली हत्याप्रकरण राज्य सरकारचे अपयश!: अशोकराव चव्हाण
तपास तातडीने पूर्ण करण्याची मागणी
नांदेडकरांना केले शांततेचे आवाहन
बोंढार हवेली येथील अक्षय भालेराव नामक युवकाची हत्या अत्यंत निषेधार्ह आहे. पोलिसांनी दिरंगाई,हलगर्जी न करता
या गंभीर प्रकरणाचा योग्यपणे सखोल तपास करून दोषींना कठोर शिक्षा होईल, अशा पद्धतीने आरोपपत्र दाखल करावे.
दरम्यान, कोणीही या प्रकरणाला वेगळे वळण देऊन जिल्ह्यातील वातावरण खराब करू नये व शांतता कायम ठेवावी,
असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केले आहे.
अक्षय भालेराव हत्याप्रकरणी ते म्हणाले की, २ जून रोजी सकाळी या घटनेबाबत माहिती मिळताच
मी संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून घटनाक्रम व तपासाच्या प्रगतीची माहिती घेतली.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी सूचनाही केली.
लोकशाही व संविधानानुसार चालणाऱ्या भारतात अशा घटना घडणे चुकीचे आहे.
त्यामुळे सदर हत्या प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर व कठोर शिक्षा होऊन
पीडित भालेराव कुटुंबाला न्याय मिळवून देण्याची आवश्यकता असल्याचे अशोकराव चव्हाण पुढे म्हणाले.
नांदेड जिल्ह्यात घडलेली ही घटना राज्य सरकारचे अपयश आहे. या प्रकरणामध्ये कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत.
त्यामुळे राज्य सरकारने तातडीने आपली जबाबदारी स्वीकारून हा तपास वेगाने पूर्ण करावा.
तसेच नांदेड जिल्हा व इतरत्र सामाजिक सलोखा तसेच शांततेचा भंग होणार नाही, याकरिता आवश्यक ती पावले उचलावीत,
अशी आमची मागणी आहे. त्याचप्रमाणे नांदेडकरांनी शांतता राखावी आणि कोणत्याही अफवांना किंवा अपप्रचाराला बळी पडू नये,असेही आवाहन केले.
रेल्वे अपघात ; 35 पैशांमध्ये 10 लाखांचा रेल्वे प्रवास विमा Train Travel Insurance
8 वर्षीय मुलीवर बलात्कार, 80 वर्षीय पुजारी ला अटक
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 05, JUN 2023, 22:10 PM
WebTitle – Investigation of those writing against the Akshay Bhalerao murder case on social media