कोल्हापूर/प्रतिनिधी : रविवार दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी चित्रदुर्ग मठ, दसरा चौक कोल्हापूर येथे युवा बौद्ध धम्म परिषद महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य आणि मूर्ती व शिल्प संशोधन संस्था औरंगाबाद शाखा कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “धम्मलिपीचे शोधयात्री जेम्स प्रिन्सेप यांचा जयंती” तथा “विश्व धम्मलिपी गौरव दिन” उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन ऍड. भारत शिंदे (माजी उपआयुक्त समाजकल्याण विभाग) यांच्या हस्ते सम्राट अशोक, सर जेम्स प्रिन्सेप आणि सर अलेक्झांडर कनिंगहॅम यांच्या पोर्ट्रेटचे विमोचन, अभिवादन आणि पूजन करून करण्यात आले.सामूहिक त्रिसरण पंचशील घेण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले.यावेळी सम्राट अशोक चे शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय.असे प्रतिपादन आयु.अशोक नगरे यांनी केले.
उद्घाटन सत्रात अभि. बापूसाहेब राजहंस, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष यांनी युवा बौद्ध धम्म परिषद चा कृतीआराखडा आणि कार्याचा आढावा घेतला. आयुनी. अनिता गवळी, जिल्हा प्रवक्त्या, आयु. सदानंद भोसले सर आणि आयु. बाबासाहेब माने सर यांनी सदिच्छापर मनोगत व्यक्त केले. उद्घाटन सत्राच्या शेवटी डॉ. संतोष भोसले यांनी प्रस्तुत कार्यक्रमामागील भूमिका सांगितली.
पहिल्या सत्रात धम्मलिपीचे प्रशिक्षण घेतलेल्या आयुनी. आम्रपाली माने यांनी धम्मलिपी आणि देवनागरी लिपी यातील प्रमुख फरक सांगून, धम्मलिपीतील स्वर, व्यंजन, बाराखडी, शब्द आणि जोडशब्द याबाबत विस्तृत शिकवणी घेतली, चर्चा घडवून आणली.
सम्राट अशोक यांचे शिलालेख शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान
दुसऱ्या सत्रात बौद्ध इतिहास व सभ्यता, प्राचीन भारतीय लिपी, बौद्ध पुरातत्वशास्त्र, बौद्ध प्रतिमाशास्त्र,
बौद्ध कला व स्थापत्यशास्त्राचे अभ्यासक आणि कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक
आयु.अशोक नगरे यांनी सर्व प्राचीन लीप्यांचा आढावा घेत धम्मलिपीची ओळख करून दिली.
पृथ्वीच्या निर्मितीपासून ते मानवी उत्क्रांती आणि मानवी उत्क्रांती ते बौद्ध धम्म सभ्यता असा विस्तृत इतिहास मांडत
जग, भारत आणि महाराष्ट्रातील बौद्ध पुरातत्वाचा इतिहास सांगितला.
जेम्स प्रिन्सेप आणि तत्सम यांच्या बौद्ध संस्कृतीला असलेल्या योगदानाचा विस्तृत आढावा घेतला.
ते म्हणाले “सम्राट अशोक यांचे शिलालेख शिलालेख म्हणजेच प्राचीन भारताचे पहिले लिखित संविधान होय.
विस्मृतीत गेलेल्या या महान ‘भारतसम्राटा’ चा चा शोध त्यांच्याच धम्मलिपीचा शोधयात्री ‘जेम्स प्रिन्सेप’ यांनी शिलालेखातून महत्प्रयासाने घेतला
आणि सुमारे दोन हजार वर्षांपासून अज्ञातवासात असलेला ‘सम्राट अशोक’ हे ‘महान भारतसम्राट’ पुन्हा एकदा जगासमोर आले.
याचे सर्व श्रेय सम्राट अशोकांच्या लिपीचे शोधयात्री ‘जेम्स प्रिन्सेप’ यांना जाते.
जेम्स प्रिन्सेप यांना त्यांच्या २२४ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो,
जेम्स प्रिन्सेप यांचा जन्मदिवस हा ‘विश्व धम्मलिपी गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा
आणि तो जगभरात रूढ व्हावा”. सर्वांनी त्यांच्या या व्याख्यानाचे तल्लीन होऊन श्रवण केले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील पाली कोर्ससाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
प्रश्नोत्तराच्या सत्रामध्ये ऍड. भारत शिंदे, ऍड. रमेश बोरगावकर, आयु. सदानंद भोसले सर, गणेश कांबळे, विजय पाटील, दयानंद जिरगे डॉ. किशोर खिलारे, अभिषेक कांबळे, अशोकराव साळोखे, पाली भाषा अभ्यासक शैलेंद्र जवंजाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि चर्चा घडवून आणली. आभार प्रदर्शनात डॉ. संतोष भोसले यांनी “शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे सुरू झालेल्या पाली कोर्ससाठी सर्वांनी प्रवेश घेऊ या, नियोजित पुणे जिल्हा लेणी अभ्यास दौऱ्या मध्ये सहभागी होऊया” असे आवाहन केले. उपस्थित सर्वांना युवा बौद्ध धम्म परिषद संपादित सर जेम्स प्रिन्सेप यांच्या संक्षिप्त चरित्राच्या प्रति वितरित करण्यात आल्या.
मान्यवरांची उपस्थिती
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्यसचिव सतीश भारतवासी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पाटिल, आम्रपाली माने, बापूसाहेब राजहंस, अरहत कांबळे, शिवाजी बाणेदार, सुनिता खिल्लारे, ज्योती डोंगरे, पल्लवी कांबळे, अनिल जाधव, काकासाहेब कुरळूपे, अभिषेक कांबळे, रविंद्र कांबळे, सर्जेराव फूले, विजय कांबळे, वेदांत कांबळे, वर्षा कांबळे, अभि. किरण गवळी, अजित कांबळे, संदेश पाटील, वसंत खांडेकर, सदानंद भोसले, बाबसाहेब माने, शरयू कांबळे, भगवान बुचडे, आनंदराव कुरणे, संजीवन लोंढे, डॉ. किशोर खिलारे, दिपक कांबळे, अभि. सुदाम शितोळे, प्रविणकुमार पालके, प्रज्ञा अशोक नगरे, ऍड. भारत शिंदे,
संतोष ऊर्फ रेगन कांबळे, परिनिता कांबळे, रविंद्र हलसवडेकर, ऍड. रमेश बोरगांवकर, दिलीप शिनगारे, सतिश भारतवासी, संतोष कांबळे, वैशाली कांबळे, दयानंद जिरगे, गणेश कांबळे, वाय. एस. कांबळे, प्रशांत कांबळे, अमर कांबळे, दशरथ कांबळे, डॉ. संतोष भोसले, अशोकराव साळोखे, अनिता गवळी, संतोष भुयेकर, सुरेश सिध्दार्थ, सूर्यकांत ढाले इत्यादी मान्यवरांची उपस्थिती महत्वपूर्ण राहिली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयु. रविंद्र हलसवडेकर कोल्हापूर, आयु. संजीवन लोंढे कोडोली,
आयु. अविनाश ओव्हाळ मुंबई, आयु. जयपाल चावरे कोल्हापूर, अभि. मोहन खराटे चंद्रपूर यांनी अर्थदान करून भरीव साथ दिली.
सतीश भारतवासी
राज्यसचिव,इतिहास,चळवळ अभ्यासक
धम्मलिपि व बुद्ध लेणींच्या जनजागृतीसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सुनील खरे यांना समाजरत्न पुरस्कार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 21,2023 | 19:12 PM
WebTitle – Inscriptions of Emperor Ashoka are the first written constitution of ancient India