हाथरस केस मध्ये सरकारचे दलाल पत्रकार प्रॉक्सी वॉर खेळत आहेत.हे असं कोणत्याही युद्धात करावं लागतं जेव्हा तुमच्या चौकीवर विरोधक शत्रू हल्ला करतात आणि तुमच्याकडे तोंड देण्यास पुरेशी ताकद बळ नसते.तुमची चारी बाजूने कोंडी झालेली असते.विरोधक जास्त आक्रमक असतात.डोईजड होतात.तेव्हा दुसऱ्या बाजूने गेम सुरू होतो.प्रत्यक्ष समोरासमोर भिडायची गरज नसते.आणि आम्ही तुमच्या विरुद्ध युद्ध पुकारलेय हेही जाहीर करायचं नसतं.सगळं इनडायरेक्टली सुरू असतं.अघोषित हुकुमशाही विरोधात आपण कसे लढणार आहोत?
देशातील पत्रकारिता नीच पातळीवर लोकांच्या नजरेतून उतरलीय
योगी सरकारला वाचवण्यासाठीच सरकारी पेरोलवरील पत्रकरांची ट्रूप मोहिमेवर पाठवण्यात आली आहे. जेणेकरून मुळ मुद्दे बाजूला पडतील सरकारवरील हल्ले दुसरीकडे डायव्हर्ट होतील,पत्रकारांना अचानक पत्रकारितेचा धर्म आठवणे,ते आपल्याच मालकांच्या विरोधात भुंकायला लागणे हे सगळं लोकाना संशय निर्माण करणारं वाटतं.आणि लोक उघडपणे ते बोलत आहेत.यावरून देशातील पत्रकारिता किती नीच पातळीवर गेलीय अन लोकांच्या नजरेतून उतरलीय याचा प्रत्यय येतो.
लोकाना देशातील कोणत्याही मिडियावर विश्वास उरलेला नाही.हे जास्त वाईट आहे.
आता जर तुम्ही टीआरपी पाहिले तर लोक टीव्ही पाहणे सोडून देवू लागलेत त्यामुळे टीआरपी संपल्यात जमा असल्याचे स्पष्ट होईल.
पण हे कुणी जाहीर करणार नाही.कारण ते जाहीर करणं म्हणजे आपलं अस्तित्वच संपलं हे जाहीर करणं आहे.
हाथरस केसमध्ये जिल्हाधिकारी पोलिस कर्मचारी यांच्यावर एट्रोसिटी लावण्याची गरज आहे.
पुरावे नष्ट करणे हा गंभीर गुन्हा आहे.आणि अशा गोष्टी जर सत्तेवरील लोकच करत असतील तर
लोकशाहीसाठी हे भयंकर घातक आहे.आणि हे सगळं हुकूमशाहीपेक्षा काहीच वेगळं नाही.
राजधर्माची आठवण
संविधानावरच हा गॅंगरेप झालेला आहे.आणि तो नरेंद्र मोदी आणि अमित शाह अजयकुमार बिष्ट यांनी मिळून केलेला आहे.
देशात एवढा गदारोळ माजलेला असताना सत्ताधारी पक्षाकडून लोकशाहीवर बलात्कार होत असताना
देशातील न्यायव्यवस्था डोळे मिटून गप्प बसणे पसंत करतेय.हेही इथे हुकुमशाही सुरू झालीय हे स्पष्ट करणारे आहे.
तसे नसते तर लोकशाहीच्या बचावासाठी न्यायव्यवस्था पुढे सरसावली असती.स्यूयूमोटो अंतर्गत हस्तक्षेप करत कारवाई केली असती.
उत्तरप्रदेशच्या सरकारला राजधर्माची आठवण करून देवून कानपिचक्या दिल्या असत्या.
परंतु तसे काही दिसत नाही.काल फेसबुकवर हुकुमशाही संदर्भात पोस्ट होती,
तेव्हा त्यावर अनेक नागरिकांनी देशात हुकुमशाही आहे असे विधान केले.
जर लोकाना हुकुमशाही जाणवायला लागली आहे.अनुभवायला लागली आहे. तर हे मान्य केले पाहिजे.
बहुसंख्य जनता भाजप सरकारच्या विरोधात
2014 पासून देशातील लोकशाही हळूहळू संपुष्टात आणली गेली.2020 मध्ये ती पूर्णत: संपवली गेली.आता फक्त लोकशाहीचा सांगाडा नावापुरता उरलेला आहे.फक्त सरकार पूर्ण ताकदीने आणि उघडपणे हे जाहीर करत नाही. अर्थातच याचीही कारणे महत्वाची आहेत.एकतर सत्ताधारी वर्ग जो सत्तेवर आला आहे.तो समाजात मात्र अल्पसंख्याक आहे.त्यांच्या विचाराचे लोक कमी आहेत.शिवाय देशात राज्यपातळीवर त्यांना एब्सोल्युट सत्ता नाही.त्यामुळे देशात हुकुमशाही आहे हे जाहीर करणे त्यांना अडचणीचे ठरेल.पोलिस,सीमेवरील सैनिक हवाई,आणि नेवी तिन्ही दलात खळबळ माजेल.या सगळ्या ठिकाणी बहुजन समाजातील लोकांची संख्या जास्त आहे.त्यामुळे सरकारला ते सहकार्य करणार नाहीत.
याशिवाय जनता सुद्धा सहकार्य करणार नाही.बहुसंख्य जनता भाजप सरकारच्या विरोधात आहे.कृषी बिल असो नाहीतर आरक्षण मुद्दे परीक्षेचे मुद्दे नोकरी बेरोजगारी अशा मुद्यावर देशातील जनता सरकारच्या विरोधात कोरोनाच्या महामारीत सुद्धा रस्त्यावर उतरते.हे अतिशय नियंत्रणाच्या बाहेरची गोष्ट असते.हुकुमशाही असणाऱ्या देशात हुकुमशाही मानणाऱ्या आणि गुलामीत सुख मानणाऱ्या लोकांचा वर्ग मोठा असतो.बहुसंख्यांक असतो.आणि तो अल्पसंख्याक समाजावर हुकुमशाही करत फायदे उपटत असतो.
देशातील अघोषित हुकुमशाही विरोधात आपण कसे लढणार आहोत?
आपल्याकडे परिस्थिती याउलट असल्याने भाजपसरकार सावधपणे पाऊले उचलत असते.हुकुमशाही करायची आहे. गुलामी लादत शोषण करायचं आहे,यासाठी त्या त्या समाज वर्गातील सुमार नेते गळाला लावून त्यांना मंत्रीपदाची खैरात द्यायची आणि आपल्यावर येणारा रोष आणि हल्ले दाबून टाकायचे अशी रचना भाजपने देशात केली आहे.त्यामुळे या अघोषित हुकूमशाहीच्या विरोधात लढताना आपल्याला वेगवेगळ्या पातळ्यांवर वेगवेगळ्या आघाड्यांवर मोर्चेबांधणी करावी लागेल.पारंपरिक विचार रचना बदलावी लागणार आहे. किंवा कसे यावर विचारमंथन होणे प्रत्येकाच्या वैयक्तिक स्वातंत्र्यासाठी अनुषंगाने देशाच्या हितासाठी लोकशाहीसाठी पुढे यावंच लागणार आहे.
शांत बसून देशातील अघोषित हुकुमशाही विरोधात आपण कसे लढणार आहोत?
by – टीम जागल्याभारत
दुर्गाबाई भागवत यांच्या वेश्यासंबंधीत मतावर समाचार घेणारे राजा ढाले
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)