महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बारामती दौऱ्यावर आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीतील इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोलेबाजी करत भाजपवर निशाणा साधला,25 वर्षे आम्ही नको ती अंडी उबवली असं उद्धव ठाकरे म्हणताच सभागृहात एकच हशा पसरला.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
राजकारणामध्ये टीकाकार असतात असलेच पाहिजेत,आम्ही सुद्धा इतके वर्षे होतोच.पण चांगले काम करत असताना अडथळे आणणं हे काही आपलं राजकारण असू शकत नाही.ही काही आपली संस्कृती असू शकत नाही.संस्कार असू शकत नाही.ठीक आहे तुम्हाला पाठिंबा देता येत नसला तर त्यात विघ्न तरी आणू नये.विघ्नसंतोषी खूप आहेत.विघ्न संतोषी लोकाना अशा कामातून आनंद मिळत नाही,आनंद त्यांच्या आजूबाजूला देखिल कधी फिरकला नाही.
जमाना बदलत आहे. बदल घडत असतो.जिद्द पाहिजे.बदल सगळीकडे घडू शकतो हे इथे दिसून आलं. मी मनातल्या मनात विचार करत होतो, राजकारणात सुद्धा एक इन्क्युबेशन सेंटर आवश्यक असतं. आम्ही सुद्धा एक उघडलं होतं 25-30 वर्ष. इन्क्युबेशनला मराठीत उबवणी केंद्र म्हणतात. आम्ही सुद्धा नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशाही काही गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं.दिवाळी सुरू झालेली आहेच. काही जण म्हणत आहेत की बॉम्ब फोडणार आहेत. काही हरकत नाही फटाके जरूर फोडा पण धूर काढू नका. कोरोना तसा गेलेला नाही हे लक्षात असू द्या असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
संपूर्ण भाषण — https://www.facebook.com/Shivsena/videos/422790899570305
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
किरण गोसावी चा अटक होण्यापूर्वी आला नवा व्हिडिओ
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त; जामिनावर नवाब मलिकांची प्रतिक्रिया
आर्यन खान प्रकरण; वानखेडेंवर आरोप;पंच चा धक्कादायक गौप्यस्फोट!
फॅक्ट चेक : शाहरुख खानचे वडील स्वातंत्र्यसैनिक नव्हते का?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 02, 2021 17:46 PM
WebTitle – Inauguration of Incubation Center at Baramati by Chief Minister Uddhav Thackeray