एकीकडे देशात जात वास्तव तीव्र आहे.धर्म द्वेष वाढीस लागलेला आहे.अशातच समाजात आदर्श स्थापित करणारी एक घटना घडते.सांगली येथील भेंडवडे या गावात मराठा समाजातील कुटुंबाकडून बुद्ध मुर्ती भेट देण्यात आलीय.इनमिन २० घराची बौद्ध वस्ती, आपल्या गावात बौद्ध विहार असावं या प्रेरणेतून झटत एकजण पुढे येतो आणि बौद्ध विहारासाठी प्रयत्न सुरू करतो…त्याला गावच्या बाराबलुतेदार,मराठा समाजाची साथ मिळते.
दिग्गजांची सांगली
सांगली जिल्हा म्हणजे राजकीय नेत्यांची पंढरी,आणखी मागे गेलात तर स्वातंत्र्य चळवळ क्रांतिसिंह नाना पाटील,त्यांची प्रतिसरकार अथवा ‘पत्री सरकार चळवळ.सांगली परिसरात नाना पाटलांची ब्रिटिशांवर मोठी दहशत होती.स्वातंत्र्य चळवळ अन सुधारणावादी चळवळी इथं रुजल्या. सांगलीची अशी एक वेगळी ओळख आहे.नागनाथअण्णा नायकवडी ,अण्णाभाऊ साठे,ग दि माडगूळकर ,यशवंतराव चव्हाण,बापू विरू वाटेगांवकर असे अनेक साहित्यिक कलाकार सांगलीने महाराष्ट्राला देशाला दिले.अलिकडे काही असामाजिक तत्वही सांगलीत वास्तव्य करून आहेत,ज्यामुळे सामाजिक एकतेला नख लावण्याचे उपद्व्याप अधून मधून सुरू असतात.या पार्श्वभूमीवर या घटनेचे एक वेगळे महत्व ठरते.
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यात येणाऱ्या भेंडवडे या गावात एक अनोखी सामाजिक अभिसरणाची घटना घडलीय.
येथील सांगली मधिल भेंडवडे या गावात मराठा समाजातील कुटुंबाकडून बुद्ध मुर्ती भेट देण्यात आलीय.
जात धर्माचे अडसर बाजूला सारत भगवान बुद्धाला गावातील गावकऱ्यांनी
सामूहिक पातळीवर स्वीकारण्याची ही घटना खरोखर उल्लेखनीय आणि प्रशंसनीय आहे.
विहारासाठीच्या जागेचा प्रश्न
सर्वात मोठा प्रश्न असतो तो जागेचा, विहारासाठी जागा मिळवायची कशी…? एका मोकळ्या जागेची निवड होते, बुद्ध विहाराची नियोजित जागा म्हणून ती मिळविण्यासाठी सरकारकडे हालचाली सुरू होतात.सदर जागा आपण सरकार कडून मिळवतो तिथे सुरवातीला साधा स्तंभ उभा केला जातो हे सुरू असलेल काम पाहून तरुणवर्ग सुद्धा पुढे येऊन जबादारी हातात घेऊन कामाला सुरुवात करतात.
दुसरं चॅलेंज – आर्थिक
दुसरं चॅलेंज इथुन सुरू होत, आत्ता पर्यंत खिशातून बराच खर्च केल्या नंतर,
मुळ कामाला लोकवर्गणी आणि जमेल त्या सम्यक मार्गाने पैसा ऊभा करायचा मोठा प्रश्न आपल्या समोर ऊभा होता…
खर्चाचा भार गावकऱ्यांनी उचलला
बुद्ध विहाराला येणाऱ्या सर्व खर्चाचा भार गावकऱ्यांनी उचलला १,४४ लाख एवढा लोकनिधी गावातून जमा केला. यात विषेश म्हणजे ज्यांना आर्थिक मदत शक्य नव्हती त्यांनी पडेल त्या हरेक छोट्या मोठ्या कामाची जबाबदारी उचलली, कुणी ट्रॅक्टर दिला तर कुणी आणखी काही अशा पद्धतीनं गावाच्या एकजुटीनं बुद्धविहार पुर्णत्वाच्या दिशेनं जातं होतं.
बुद्ध लोकांना आपलसं करतो, तो कधीच कुणाचा द्वेष करित नाही.
बुद्धा विहाराच्या या कामात गावातला धनगर,रामोशी,मातंग,चांभार,कुंभार,मुस्लिम आणि मराठा अशी सगळ्या जाती धर्माची लोकं झटत होती.
आणि म्हणुनच यांच्या प्रयत्नातून तब्बल १ लाख ४४ हजाराचा लोकनिधी ऊभा होऊ शकला.यात विशेष म्हणजे सुरेखा कांबळे यांनी सुरवाती पासूनच खूप कष्ट घेतले, मोठी आर्थिक मदत सुद्धा केली आणि पुढे त्यांना साथ देत.विजय कांबळे यांनी सुद्धा मोठा आर्थिकभार आपल्या खांद्यावर घेतला आणि सुरेखा काकूंना मोलाची साथ दिली.
बुद्ध हा ज्ञानाचा भाग आहे
मराठा समाजाचे विठ्ठल आप्पा इंगळे यांनी खुप आधी “जेव्हा कधी इथं बुद्ध विहार होईल तेव्हा, मी माझ्याकडून महाबोधी विहार बुद्ध गया येथून बुद्ध मुर्ती भेट देणार” हि इच्छा व्यक्त केली होती आणि हे काम सुरू व्हायच्या अगोदरच त्याचं दुःखद निधन झालं. मात्र गावात बुद्धविहाराचं काहीतरी काम सुरू होतयं हे समजताच त्यांच्या मुलांनी आपल्या वडीलांच्या पश्चात त्यांची ही इच्छा पुर्ण करत गयेवरून बुद्ध मुर्ती आणुन बुद्ध विहारास दान म्हणुन दिली.
आप्पा इंगळे यांचे सुपुत्र विकास इंगळे म्हणतात आम्ही त्या मंदिरात दर रविवारी जातो,तिथे गेल्यावर प्रत्येकवेळी आम्हाला अतिशय प्रसन्नता वाटते.तशी प्रसन्नता गावात सुद्धा यावी या विचारानेच आम्ही तो निर्णय घेतला ,हा भाग आहे फक्त ज्ञानाचा,तिथून काय घ्यायचं तर ज्ञानच घ्यायचं त्याच्या प्रसारासाठी आम्ही हा निर्णय घेतला.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 01, 2021 21:07 PM
WebTitle – In Sangli a Maratha family erected a Buddha statue in a buddha vihara