धुळे : धुळे तालुक्यातील मेहेरगाव गावातील तथाकथित उच्चजातीय मनुवादी लोकांनी गावात बैठक घेवुन निर्णय घेतला की बौध्द समाजाला किराणा सामान देवू नये, सालदार व्यक्तींना शेतात कामाला ठेवु नये, नाभिक समाजाने गावातील बौध्द लोकांचे दाढी, कटींग करू नये जो दुकानदार किराना देईल त्याला मारहाण करण्याची धमकी देत दबाव निर्माण करत बौद्ध समाजावर सामाजिक बहिष्कार टाकण्यात आला आहे. बौद्ध समाजातील महिला पुरुष अस्वस्थ झालेले असून अतिशय दहशतीच्या व भीतीच्या वातावरणात जीवन जगत आहेत .एवढेच नाही तर अगदी अत्यावश्यक सेवा डॉक्टर,मेडिकल आणि प्राथमिक उपचार देखील नाकारण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
धुळे येथील बौद्ध समाजावर बहिष्कार टाकण्यामागे नेमकं काय घडलं ?
देशातील नागरिकांनी नुकताच स्वातंत्र्याचा रौप्य महोत्सव साजरा केला.भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली.मात्र इथले समाज घटक आजही मानवी स्वातंत्र्या सारख्या मुक्त वावरण्याच्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यापासून आजही वंचित असल्याचे प्रकर्षाने समोर आलेलं आहे,ठळक झालेलं आहे.नुकताच राजस्थान येथे इंद्र कुमार या हिंदू-दलित मुलाचा त्याच्या तथाकथित उच्चजातीय हिंदू शिक्षकाने, केवळ पिण्याचा माठाला स्पर्श केला म्हणून अमानुषपणे बेदम मारहाण करत खून केला.
26 तारखेला महाराष्ट्रात बैल पोळा साजरा केला गेला.अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या आपल्या गोठ्यातील बैलांना
या दिवशी नटवून सजवून गोडधोडाचा घास दिला.शेतकरी हा वर्ग असल्याने शेती करणाऱ्या अनेक जाती आहेत.
सर्वच जातीत शेतकरी आहेत.मात्र जात व्यवस्थेची उतरंड एवढी भयानक आहे की यामुळे शेतकरी शेती करत असला घाम गाळत
असला कष्ट उपसत असला तरी शोषक समूहाच्या तुलनेत तो आपल्यापेक्षा
तथाकथित खालच्या पायरीवर असणाऱ्या असा गैरसमज करून घेऊन अशा जाती वर्गांना तुच्छ लेखने द्वेष करणे भेदभाव करणे
अशा गोष्टी करत आला आहे.या घटनेतही हे स्पष्ट झालं.
26 तारखेला बैल पोळ्याच्या दिवशी धुळे तालुक्यातील मेहेरगावात बैलांची डिजे लावून मिरवणूक काढण्यात आली होती.तर याचवेळी बौद्ध वस्तीतूनही तिथल्या बौद्ध शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील बैलांची सजवून मिरवणूक काढली.हे पाहून तथाकथित जातीयवादी गावकरी भडकले.आणि त्यांनी बैलांची मिरवणूक काढणाऱ्या बौद्ध समाजातील तरुणांना याबद्दल हटकले,तुम्ही महार लोक केव्हापासून बैल पोळा साजरा करू लागले? मिरवणूक कशीकाय काढू शकता? असा अजब सवाल त्यांनी उपस्थित केला.तसेच तरुणांना मिरवणूक काढण्यास मज्जाव केला,बौद्ध तरुणांनी हा बैलांचा सण आहे असं म्हटलं मात्र जातीयवादी मेंदू असलेल्या तथाकथित उच्च जातीय लोकांना हा अपमान वाटला आणि त्यांनी या बौद्ध तरुणांना लाठ्या काठ्यांनी जबर मारहाण केली.
व्हिडिओ सौजन्य सिद्धार्थ जगदेव
गावाने ठराव करून पाणी,दूध,किराणा,बंद केला
व्हिडिओ सौजन्य सिद्धार्थ जगदेव
जातीयवादी गावातील लोक बौद्ध तरुणांना मारहाण करून थांबले नाहीत,त्यांनी 28 तारखेला गावाची बैठक बोलावली आणि त्यामध्ये ठराव केला की या माजलेल्या महारांना (बौद्ध) पाणी,दूध,किराणा ,वैद्यकीय सुविधा सगळं बंद करण्यात आलेत,असं स्थानिक गावकरी शाहजी बोरसे यांनी कळवलं आहे.महिलांना किराणा दुकानातून साबण अन्न धान्य जीवनावश्यक वस्तू देण्यासही नकार देण्यात आल्याचे महिला वर्गाने कळवलं आहे.
व्हिडिओ सौजन्य सिद्धार्थ जगदेव
स्वातंत्र्य मिळूनही काही समाज घटकांना अजूनही स्वातंत्र्याच्या फळांची चव उपभोगता येत नाही,
असं विधान माजी सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा यांनी केलं होतं,
या पार्श्वभूमीवर आजही समाजात समता आणि बंधुभाव रुजवणे किती गरजेचे आहे.
आणि काही विकृत जातीयवादी लोकांना जनावरातून माणसात आणने गरजेचे आहे,
असं मत सामाजिक कार्यकर्ते आणि कायद्यानेवागा लोकचळवळीचे अध्यक्ष राज असरोंडकर यांनी जागल्या भारत शी बोलताना व्यक्त केले.
एकीकडे बैलासारखे जनावर पूजायचे नाटक करायचे आणि दुसरीकडे आपल्यासारख्याच माणसांना मात्र पशुपेक्षा हीन वागणूक द्यायची हा टोकाचा विरोधाभास दिसून येतो,त्यामुळे हे प्राण्यांवरचे प्रेम सदभावना हा दिखावा असल्याचे मत सामाजिक कार्यकर्ते अमोल गायकवाड यांनी जागल्या भारत शी बोलताना व्यक्त केले.
आरएसएस मध्ये बदल होणार,संघ स्थापनेची 100 वर्षे, 40 संघटनांमध्ये बदल
Jai Bhim Movie जयभीम चित्रपटाच्या निर्मात्यांवर गुन्हा दाखल
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 29,2022, 19:52 PM
WebTitle – In Dhule, the Buddhist community was boycotted by the so-called upper caste community