मुंबई: काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला तमिळ अभिनेता सुर्याचा ‘जय भीम’ (Jai Bhim) हा चित्रपट सातत्याने वादात सापडत आहे. चित्रपटाच्या कौतुकासोबतच त्याच्या समीक्षकांची संख्याही वाढत आहे. या चित्रपटाबाबत एक नाही तर अनेक वाद सुरू आहेत. नुकतेच प्रकाश राज यांच्या एका सीनवरून झालेल्या वादानंतर आता या चित्रपटातील आणखी एका सीनमुळे खळबळ उडाली आहे. निर्मात्यांना याची माहिती मिळताच त्यांनी घाईघाईत तो सीन काढून टाकला आहे.
एशियन न्यूज नेटवर्कच्या वृत्तानुसार, चित्रपटात एसआय गुरुमूर्ती यांची भूमिका साकारणारा अभिनेता तामिजने नकारात्मक भूमिका साकारली आहे. चित्रपटात तो अत्यंत क्रूर भूमिका साकारताना दाखवण्यात आला आहे. चित्रपटाच्या एका दृश्यात, जेव्हा अभिनेता तामिज घरी बसलेला असतो, तेव्हा त्याच्या मागे भिंतीवर लावलेल्या कॅलेंडरवर एक जातीय प्रतीक दिसते. या चिन्हाबाबत लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जेव्हा हे प्रकरण निर्मात्यांच्या कानावर पोहोचले तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले आणि कॅलेंडरमधून ते प्रतीक काढून टाकले आणि त्याऐवजी दुसरा फोटो लावला.
हिंदीचा कथित अपमान झाल्याचा आरोप
याआधी चित्रपटाच्या एका दृश्यात एक माणूस हिंदीत बोलताना दिसत आहे. त्यावेळी अभिनेते प्रकाश राज त्या व्यक्तीला कानाखाली मारताना दिसतात आणि तमिळ मध्ये बोल असं म्हणताना दिसतात.यावरून समीक्षक रोहित जायसवाल यांनी नाराजी व्यक्त केली होती.
फिल्म चे कमल हसन यांनीही कौतुक केले आहे
काही लोकांनी ‘जय भीम’ (Jai bhim) चित्रपटाच्या या सीनवर टीका केली, तर अनेकांनी प्रकाश राजच्या व्यक्तिरेखेची प्रशंसा केली आहे.
तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि कमल हासन यांनी चित्रपटाचे आणि स्टारकास्टचे जोरदार कौतुक केले आहे.
सूर्याचा अभिनयही लोकांना आवडला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन टीजे ज्ञानवेल यांनी केले आहे.आणि या चित्रपटाचे देशभरात कौतुक होत आहे.
मात्र चित्रपटाच्या लोकप्रियतेबरोबर चित्रपटाचे हेटर्स सुद्धा हळूहळू वाढायला लागल्याचे दिसत आहे.
लोक छोट्या छोट्या गोष्टी तपासात आहेत.
जय भीम मुवी मधील प्रकाश राजच्या ‘झापड मारण्याच्या’ सीनने नवा वाद
बाबासाहेब चित्रपटात कुठेही नाहीत,तरीही ‘सबकुछ’ जयभीम चित्रपटाच्या निमित्ताने
धार्मिक स्वातंत्र्य:भारताला रेड लिस्ट मध्ये टाका,अमेरिकन संस्थेची शिफारश
राम मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला
समीर वानखेडे ला बॉलिवूडवर हल्ला करायला आवडतं – अनुराग कश्यप
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 08, 2021 18:52 PM
WebTitle – In another scene from the movie Jai Bhim, the scene was taken by the producers
I liked your post and it’s very interesting