इक्कयु आणि लाकडी बुद्ध रूप : 14व्या शतकात इक्कयु नावाचा एक विद्वान झेन आचार्य होवून गेले. कवितेतून बुद्धविचार ते सादर करीत. एकदा प्रवासात ते एका दुर्गम विहारात थांबले. बाहेर कडाक्याची थंडी व बर्फ पडत होता. विहारात एकच भिक्खू होते ज्यांनी इक्कयुला विहारात झोपण्यासाठी एक घोंगडी दिली. मध्यरात्री खूपच थंडी पडल्याने इक्कयुने आजूबाजूला पाहिले काय उबदार मिळते का..
त्यांना विहारात तीन लाकडी बुद्धरूप दिसले. इक्कयुने एक लाकडी मूर्ती उचलली आणि आग पेटवून त्या मूर्तीच्या आगीत हातपाय शेकु लागला. आगीचा प्रकाश व धूर पाहून तो विहारातील भिक्खू आला आणि अर्धवट जळालेली बुद्ध मूर्ती पाहून त्याचा राग अनावर झाला.
भिक्खू , इक्कयुला म्हणाला,”तुला काय अक्कल आहे का? चक्क बुद्धमूर्ती जाळून उष्णता निर्माण करतोस? धम्माबद्दल तुला काहीच आस्था नाही का?
इक्कयु हसून म्हणाला,”माझ्यातील जिवंत बोधीचित्ताला जिवंत ठेवण्यासाठी निर्जीव बुद्धमूर्तीचा बळी द्यायचा की
निर्जीव बुद्धमूर्तीचा आदर करण्यापोटी जिवंत बोधीचित्ताचा बळी द्यायचा हा प्रश्न माझ्या समोर होता….पण शेवटी बुद्ध जिंकले”
भिक्खू म्हणाला, “बुद्ध मूर्ती जाळून बुद्ध जिंकले म्हणतोस?
इक्कयु म्हणाला,”कोणत्याही परिस्थितीत बोधीचित्त नेहमीच जागृत ठेवणे, पराकष्टाने सांभाळून ठेवणे हेच सांगितले ना बुद्धांनी?
असे म्हणत इक्कयु राखेत काहीतरी शोधायला लागला. हे पाहून तो भिक्खू म्हणाला, “आता काय शोधतोय राखेत?
इक्कयू म्हणाला,”बुद्धांच्या अस्थी”
भिक्खू हसायला लागला आणि म्हणाला,”खरंच तू मूर्ख दिसतोस ..अरे, लाकडी मूर्तीत अस्थी कुठून येणार?
इक्कायू म्हणाला,”लाकडी बुद्ध मूर्तीत बुद्ध नसतात हेच तू कबूल करतोस….हे बघ, तुला अजुन खुप शिकायचे आहे. बुद्ध रूप केवळ एक रूपक आहे बुध्दत्त्वाचे. त्याच्यात आम्हीं आम्हांला हवे असलेले बुद्धगुण पाहत असतो, मात्र बुद्ध तुमच्या विचारात असायला हवेत, तुमच्या आचरणात असायला हवेत
भिक्खू कडे आणि विहारात सर्वत्र पाहत, इक्कायु म्हणाला,” गेली हजारों वर्षात बुद्धांना मारण्याचे, गाडून टाकण्याचे, नष्ट करण्याचे अनेकवार प्रयत्न झाले पण बुद्ध संपू शकत नाहीत कारण आजही ते तुझ्या माझ्या विचारातून जिवंत आहेत”
लहान मूल बुद्धरुपाच्या मांडीवर बसते, त्या मूर्तीच्या अंगाखांद्यावर खेळते हे त्या मुलाचे बुद्धांप्रती असलेले वात्सल्य आणि प्रेम आहे….हेच वात्सल्य आणि प्रेम एखादा प्रौढ व्यक्ती वंदन करून व्यक्त करतो…दोघांच्या भावना सारख्याच….नाही का?
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 06 2022, 19:35 PM
WebTitle – Ikkayu and wooden Buddha form