मुंबई / 01-08-2023 : विद्यार्थ्यांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी आयआयटी-मुंबई ने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना जात आणि प्रदेशापेक्षा खेळ, संगीत आणि चित्रपट इत्यादी समानतेच्या आधारे वर्गमित्रांशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे. अपमानास्पद, द्वेषपूर्ण किंवा जातीयवादी विनोदांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.IIT Mumbai orders ban on asking students caste and caste jokes
आयआयटी मुंबई आदेश-विद्यार्थ्यांना जात विचारली तर आता खैर नाही,जातीय विनोदांवरही बंदी
संस्थेच्या पवई कॅम्पसमध्ये अनेक ठिकाणी त्याचे पोस्टर्सही चिकटवण्यात आले आहेत.
मार्गदर्शक तत्त्वात, सहकारी विद्यार्थ्यांना त्यांची जन्मतारीख, प्रवेश, धर्म आणि जात याबद्दल विचारणे अयोग्य मानले गेले आहे.
विद्यार्थ्याला त्याची JEE Advanced रँक किंवा GATE स्कोअर किंवा त्याची जात उघड करणाऱ्या कोणत्याही गोष्टीबद्दल विचारणे अयोग्य असल्याचेही म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना विभाग, क्रीडा, संगीत, चित्रपट, शाळा, महाविद्यालय आणि छंद किंवा
आवड यासारख्या सामाईक गोष्टींद्वारे जोडण्यास सांगितले आहे.
मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा झाल्याचीही चर्चा आहे.
विद्यार्थ्याने जातीयभेदभावामुळे आत्महत्या केली होती
आयआयटी बॉम्बेचा बीटेक (केमिकल) प्रथम वर्षाचा विद्यार्थी दर्शन सोळंकी याने
१२ फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती.तो अहमदाबादचा रहिवासी होता.
बहीण आणि काकूंनी सांगितल्याप्रमाणे दर्शन मोफत शिक्षण घेत आहे हे अनेक विद्यार्थ्यांना पसंत पडले नाही.लोकांना त्याचा द्वेष वाटू लागला. आम्ही पैसे देतो मग तुम्ही मोफत शिक्षण का घेता,असे ते म्हणायचे. या लोकांनी दर्शनच्या इतर मित्रांना देखील त्याच्याशी न बोलण्यासाठी वातावरण बनवले,त्यामुळे तो एकटा पडला होता.याच मानसिक छळातून दर्शन ने १२ फेब्रुवारी रोजी वसतिगृहाच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती
JEE Advanced रँक किंवा GATE स्कोअरबद्दल विचारणे देखील अयोग्य
मार्गदर्शक तत्त्वानुसार, ‘कोणत्याही विद्यार्थ्याला त्याची जात, प्रवेश किंवा वर्ग याबद्दल विचारणे अयोग्य आहे.
याशिवाय, इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या JEE Advanced रँक किंवा GATE स्कोअरबद्दल विचारणे देखील अयोग्य ठरविण्यात आले आहे.
संस्थेने 29 जुलै रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे म्हटले आहे की, रँक विचारणे हा देखील जात पडताळण्याचा प्रयत्न असू शकतो.
अपमानजनक, द्वेषपूर्ण आणि जातीयवाचक विनोद भाष्य यावरही बंदी घालण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या मार्गदर्शक तत्त्वाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर शिक्षेबाबतही संस्थेने सांगितले आहे.
आता जर जात विचारल तर शिक्षण गमवून बसाल,त्यामुळे जातीयवाद डोक्यात घेऊन शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी
आता माणसाप्रमाणेच वागावं लागेल नाहीतर शिक्षणावर पाणी सोडावं लागेल.
संभाजी भिडे यांची अटकपूर्व जामीन घेण्यासाठी धावपळ
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 01,2023 | 11:30 AM
WebTitle – IIT Mumbai orders ban on asking students caste and caste jokes