काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या शमशाबादमध्ये अप्सारा (30) नावाची एक तरुणी युवती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. या प्रकरणात एक नवीन ट्विस्ट आला आहे.वास्तविक,हे प्रकरण बेपत्ता होण्याचे नसून तरुणीचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे.दुर्दैवी तरुणीचा पुजारी प्रियकराने खून केल्याची माहिती समोर आलीय.खून करून पुजारी ने तिचा मृतदेह मॅनहोलमध्ये फेकला. पोलिसांनी सांगितले की,अनैतिकसंबंधामुळे ही हत्या करण्यात आलीय.
स्टोनिंग हेडने हत्या केली
हे प्रकरण हैदराबाद येथील असून सरुरनगरमधील मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त वेंकट सूर्य साई कृष्णा Venkat Surya Sai Krishna,याने या तरुणीची हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.वेंकट सूर्य साई कृष्णा हा विवाहित असून त्याला एक मूलही असल्याचे कळते.असे असूनही, त्याने अप्सरा नावाच्या एका युवतीशी अनैतिक संबंध निर्माण केले. यानंतर, अप्साराने वेंकट सूर्य साई कृष्णा वर तिच्याशी लग्न करण्यासाठी दबाव आणण्यास सुरवात केली. पोलिस सूत्रांनी सांगितले की, वेंकटेश्वर कॉलनी येथील रहिवासी असलेल्या अप्सराला 4 June जून रोजी वेंकट सूर्य साई कृष्णा सुलतानापल्ली येथील गोशाळेला जाण्याच्या बहाण्याने शमशाबाद ग्रामीण भागातील नरकुदा गावात गेला तिथं त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली.
बॅगमध्ये मृतदेह भरून मॅनहोलमध्ये फेकले
पोलिस सूत्रांनी सांगितले की, तरुणीवर दगडाने हल्ला केल्यानंतर त्याने बॅगमध्ये मृतदेह भरला आणि तो एमआरओ ऑफिस सरूरनगर जवळील मॅनहोलमध्ये फेकला. नंतर तो मुलीच्या आईला घेऊन आरजीए पोलिसात आला आणि 5 June जून रोजी तक्रार दाखल केली की शमशाबाद बस स्टँडवर सोडून गेलेली त्याची भाची अप्सारा 3 June जून रोजी बेपत्ता झाली आहे.आरोपी साई कृष्णा चे बोलणे अन तांत्रिक बाबी कॉल डेटा सगळं संशयास्पद वाटत होतं, त्यामुळे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डेटा रेकॉर्डची तपासणी केली गेली आणि साई कृष्णाला संशयावरून ताब्यात घेण्यात आले.
मृतदेह मॅनहोलमध्ये फेकला वरतून सीमेंट कॉँक्रिट ओतले
पोलिसांनी सांगितले,”संशयाच्या आधारे,जेव्हा त्याची कसून चौकशी केली गेली,तेव्हा तो पोपटासारखा बोलायला लागला.अप्सरा लग्न करण्याचा तगादा लावत होती,लग्न न केल्यास पुजारी वेंकट सूर्य साई कृष्णाची पोलखोल करणार असल्याची धमकी देत त्याला सतत ब्लॅकमेल करत होती.त्यामुळे वेंकट सूर्य साई कृष्णा ने तिला संपविण्याचा निर्णय घेतला.तिचा खून करून तिचा मृतदेह मॅनहोल मध्ये टाकून त्याने वरून सीमेंट कॉँक्रिट ओतले आणि पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.यासोबतच पुजार्याने अप्सरा यांची बॅग आणि सामानही जाळले.त्यानंतर त्याने आपली कार धुवून आपल्या अपार्टमेंटमध्ये पार्क केली.
साई कृष्णाने तिचा एकदा गर्भपात केला होता
हत्येचा उलगडा झाल्यानंतर अप्सराच्या नातेवाईकांनी अप्सरा गर्भवती असल्याची माहिती पोलिसांना सांगितली.
साई कृष्णाने तिचा गर्भपातही केला होता.
पुजारी ने गुन्हा कबूल केला
यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि साईकृष्णाची चौकशी केली असता त्याने पोलिसांसमोर खुनाचा गुन्हा कबूल केला.
हैदराबाद पोलिसांनी आता बेपत्ता प्रकरणाचे रुपांतर खुनाच्या प्रकरणात करून पुढील तपास सुरू केला आहे.
कोलंबिया विमान अपघात,40 दिवसांनी 4 मुलं जंगलात जिवंत सापडली
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 10, JUN 2023, 21:40 PM
WebTitle – Hyderabad priest of the temple killed the young woman due to an extramarital relationship