अमेठी/उत्तर प्रदेश : होळीच्या दिवशी रंग लावण्यावरून दोन गटात संघर्ष होऊन शब्दशः खून की होली खेळली गेली.दोन्ही बाजूंनी लाठ्या-काठ्यांचा जोरदार वापर करण्यात आला. या मारामारीत दोन्ही बाजूचे सहा जण जखमी झाले. मारामारी थांबल्यानंतर सर्व जखमींना प्रथम सीएचसी आणि नंतर जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. सीएचसीमध्ये दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी एकाला मृत घोषित केले, तर दोन गंभीर जखमींना जिल्हा रुग्णालयातून ट्रॉमा सेंटरमध्ये रेफर करण्यात आले आहे. या घटनेचा तीव्र संताप पाहता गावात मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. गावात डीएम आणि एसपीही तैनात करण्यात आले असून गावात तणाव असून छावणीचे स्वरूप आले आहे.
खून की होली
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जिल्ह्यातील जामो पोलीस स्टेशन हद्दीतील रेवडापूर मजरे बाबुपूर गावात शुक्रवारी दुपारी लोक गटातटात होळी खेळत होते. यावेळी रंग लावण्यावरून दोन गटात लाठ्या-काठ्या घेऊन हाणामारी झाली. अर्धा तास चाललेल्या या मारामारीत दोन्ही बाजूचे सहा जण जखमी झाले. पोलिसांना माहिती मिळताच गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना सीएचसीमध्ये नेण्यात आलं.या हिंसाचारात प्रताप सिंग (३८) आणि शिवराज उर्फ लड्डू पासी (४२) यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
संपूर्ण गाव छावणीत बदलले
या प्रकरणाची माहिती मिळताच जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार मिश्रा आणि पोलीस अधीक्षक दिनेश सिंह मोठ्या पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले. एवढेच नाही तर संपूर्ण गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावाला छावणीचे स्वरूप आले आहे.त्याचबरोबर या हत्याकांडामुळे गावात तणाव असून भीतीचे वातावरण आहे.
या दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्याचे प्रमुख जामो यांना याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचे डीएम राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितले.
या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं.
रंग लावण्यावरून रक्तरंजित संघर्ष
जिल्हा दंडाधिकारी राकेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, बाबूपूरचे लोक त्यांच्या गावात रस्त्याच्या कडेला होळी खेळत होते.
दरम्यान, तेथून जाणारे रेवडापूर गावातील लोकांवर रंग टाकला गेला. यानंतर दोन्ही बाजूंमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला.
यामध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
त्याचवेळी दोन जणांचा मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान दुसरा एक अँगल समोर आला असून,रेशन वाटपावरून झालेला वाद हे एक या वादामागील कारण असल्याचेही बोलले जात आहे.
प्रत्यक्षात कोटेदारने दुसऱ्या गावातील मुलाला बघून घेण्याची धमकी दिली होती आज या वादाचे रुपांतर रक्तरंजित संघर्षात झाले.
इतर वाचनीय लेख/अपडेट्स
काश्मीर फाइल्स : नागराज मंजुळे यांचं स्पष्ट मत
झुंड सिनेमा:झोपडपट्टी मध्ये जन्मलेले जागतिक दर्जाचे दिग्गज खेळाडू
झुंड चित्रपट बजेट:किती करोडमध्ये बनला? आतापर्यँतचे कलेक्शन
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
झुंड मुव्ही: रितेश देशमुख यांची पोस्ट व्हायरल; दोन भारताचा विचार..
झुंड चित्रपट:सुबोध भावे ची पोस्ट ,”नागराज तू आमच्या पिढीचा…”
Jhund film।झुंड चित्रपट,आंबेडकरांचे पोस्टर व्हायरल,पाहा रिलीज डेट
जयभीम चित्रपट थांबायचे नाव घेईना ,चीन मध्ये ठरतोय लोकप्रिय
Pushpa movie box office collection|पुष्पा फिल्म बॉक्स ऑफिस
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 18, 2022 21: 55 PM
WebTitle – Holi of blood ; Two killed on the spot, six injured, the tension in the Amethi village