पुणे : कोरेगाव भीमा चा इतिहास त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास उपमुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन.आज 1 जानेवारी 2022 रोजी कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक जयस्तंभ ला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.ऐतिहासिक लढाईत लढलेल्या व शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. कोरेगाव भीमा चा इतिहास ही महाराष्ट्राच्या त्यागाचा, शौर्याचा, पराक्रमाचा इतिहास आहे. कोरेगाव भीमाच्या ऐतिहासिक लढाईतील वीरांना वंदन करण्यासाठी, जयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या बंधू-भगिनींनी कोरोना प्रतिबंधक नियम तसंच आदर्श कोरोना आचारसंहितेचे पालन करावं, शक्यतो आपापल्या घरूनच जयस्तंभास अभिवादन आणि शहीद वीरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, असं आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
पेशवाई साम्राज्याचा अस्त झाला
कोरेगाव भीमा ची लढाई ही महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यामधील कोरेगाव भिमा या गावात भीमा नदीच्या काठावर झालेली एक ऐतिहासिक लढाई आहे. ही लढाई १ जानेवारी इ.स. १८१८ रोजी इंग्रज ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी व पेशवा साम्राज्य यांच्यात झाली होती.ब्रिटिशांच्या बाजूने एकूण ८३४ सैनिक होते, ज्यांचे नेतृत्व सेनापती कॅप्टन फ्रान्सिस एफ. स्टॉंटन करीत होता तर पेशवा साम्राज्याच्या बाजूने २८,००० सैनिक होते, ज्याचे नेतृत्व सेनापती पेशवा बाजीराव दुसरा करीत होता.
इंग्रजांच्या सैनिकांत ‘बॉम्बे नेटिव लाइट इन्फेंट्री तुकडी’चे ५०० महार सैनिक होते,मराठ्यांच्या सैनिकांत मराठा, अरब व गोसाई या सैनिकांचा समावेश होता.पेशवाईच्या काळात अस्पृश्यतेचे पालन मोठ्या प्रमाणावर होत होते व महार, मांग व इतर अस्पृश्यांना अत्यंत हीन वागणूक दिली जात असे, याला विरोध म्हणून महार सैनिक आत्मसन्मासाठी पेशव्यांच्याविरूद्ध लढले आणि विजयी झाले.या युद्धात पराभूत झालेल्या पेशवाई साम्राज्याचा अस्त झाला.
आत्मसन्मानाची लढाई कोरेगाव भीमा
हेही वाचा.. भीमा कोरेगांव ची लढाई आणि काही प्रवाद समजून घ्या
हेही वाचा..ते भीमा-कोरेगाव का नाकारतात? नक्की काय मिळणार आहे त्यावर खोटं बोलून?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 01 , 2022 16: 56 PM
WebTitle – History of Koregaon Bhima History of Sacrifice, Bravery, Might – Ajit Pawar