उत्तर प्रदेश : एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.आग्रा येथे रामनवमीच्या मिरवणुकीत जातीय हिंसाचार भडकवण्यासाठी भारत हिंदू महासभा कार्यकर्त्यांनी स्वतः गाईची कत्तल केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी शनिवारी उघडकिस आणल्याने एकच खळबळ माजली आहे.
आग्रा पोलिसांनी रामनवमीच्या मुहूर्तावर गोहत्येच्या आरोपाखाली चार तरुणांना अटक केली होती. आग्रा येथील एतमादुद्दौला भागातील गौतम नगर येथे रामनवमीच्या उत्सवादरम्यान छापा टाकून या तरुणांना अटक करण्यात आली.
हिंदू महासभा कार्यकर्त्यांनी गाईची कत्तल हिंसाचार घडवण्यासाठी केली
स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, गोहत्येच्या कटात भारत हिंदू महासभेच्या अनेक पदाधिकाऱ्यांची नावेही समोर आली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते संजय जाट याचे मुख्य सूत्रधार म्हणून नाव पुढे आले आहे. इतर अनेक कार्यकर्ते ही या कटात सामील असल्याचे बोलले जात आहे. जितेंद्र कुशवाह यांनी एतमादुद्दौला पोलिस ठाण्यात गोहत्येप्रकरणी एफआयआर दाखल केला होता.
डीसीपी सूरज राय यांनी सांगितले की, पोलिस तपासात अनेक तथ्य समोर आले आहेत.
एफआयआरमध्ये नाव असलेल्या इम्रान उर्फ ठाकूर आणि शानू या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
शानूने पोलिसांना सांगितले की, 29 मार्च रोजी रात्री 8 वाजता तो मेहताब बागेत पोहोचला
तिथे इम्रान, सलमान आणि सायरो फिरताना दिसले.त्यानंतर त्यांनी तिथे आसपास फिरणाऱ्या गायीला मारण्याचा निर्णय घेतला.
यावेळी हिंदू महासभेच्याच कार्यकर्त्यांनी जितेंद्र कुशवाह आणि संजय जाट यांच्या विरोधात तक्रार केली
आणि ते म्हणाले की रामनवमीच्या दिवशी आग्रा येथील धार्मिक सलोखा बिघडवण्यासाठी ते स्वतःच गोहत्या करत आहेत.
दरम्यान, संजय जाट यांनी म्हटलंय की, हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला जाणीवपूर्वक अडकवले असून
या संपूर्ण प्रकरणाची सीबीसीआयडीमार्फत चौकशी करण्यात यावी.
या अधिकाऱ्यांची तक्रार उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
जातीयवादी पोस्ट करणाऱ्याला ब्रिटन पोलिसांनी केली अटक
Medical stores वर आंधळा विश्वास ठेवू नका;Wellness forever Medical
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on APR 08,2023 13:08 PM
WebTitle – Hindu Mahasabha workers slaughter cows to create violence