वाराणसीतील ज्ञानवापी मशीद शृंगार गौरी प्रकरणात हिंदू पक्षात फूट पडली आहे. या प्रकरणातील पाच याचिकाकर्त्यांपैकी एक, राखी सिंगचे काका आणि विश्व वैदिक सनातन संघाचे अध्यक्ष जितेंद्र सिंह विसेन यांनी हिंदू पक्षाचे वकील विष्णू जैन यांच्यावर मुस्लिम बाजूचा फायदा केल्याचा आरोप केला आहे.मंगळवारी जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात अर्ज देऊन वकील विष्णू जैन यांनी खटला समाप्त केल्याचा आरोप आहे. जैन हे स्टेट कौन्सिलचे सदस्य असल्याचे सांगितले जातेय. सरकारी वकील असूनही ते सरकारविरोधात खटला लढवत आहेत.
ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षात फुट
विष्णू जैन हे इंडियन इस्लामिक कल्चर सेंटरचे अधिकृत सदस्य असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणी केंद्राच्या आदेशानुसार विष्णू जैन यांच्या वतीने वकलतनामा दाखल करण्यात आला आहे. मुस्लीम बाजूने वकील विष्णू जैन यांचा आधार घेऊन खटला संपवता येईल, असे सांगितले.
हे प्रकरण संपुष्टात येऊ नये म्हणून आज जिल्हा न्यायाधीश न्यायालयात अर्ज देण्यात आला आहे.
हे प्रकरण बंद करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही करण्यात आला.
सोनिया गांधी या इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरच्या संरक्षक असल्याचा आरोपही करण्यात आलाय.
विसेन म्हणाले की, मी त्या व्यक्तीचे नाव जाहीर करणार नाही, मात्र त्याचा सदस्य क्रमांक १२८९ आहे.
त्या व्यक्तीने विष्णू शंकर जैन यांना पूर्णपणे आपले बाहुले बनवले आहे.
इंडिया इस्लामिक कल्चर सेंटरने ज्ञानवापी प्रकरण हायजॅक केले आहे.
विसेन यांनी प्रश्न उपस्थित केला की 26 मे 2022 रोजी वकील विष्णू शंकर जैन यांनी माँ शृंगार गौरी प्रकरणातील फिर्यादी मंजू व्यास, सीता साहू, लक्ष्मी देवी आणि रेखा पाठक यांच्या स्वाक्षरीखाली वकलतनामा न्यायालयात सादर केला. शृंगार गौरी प्रकरणातील महत्त्वाची याचिकाकर्त्या राखी सिंहचा यात सहभाग नव्हता. त्यापूर्वी त्यांनी कधीही वकालतनामा दाखल केला नव्हता.
सुप्रीम कोर्टात उत्तर प्रदेश सरकारचे वकील असताना विष्णू शंकर जैन यांनी राज्याविरुद्ध वकलतनामा कसा मांडला, असे विसेन म्हणाले. जो राज्याचा वकील आहे तो त्याच्या विरुद्धच्या खटल्यात वकलतनामा दाखल करू शकत नाही. या आधारावर मुस्लिम पक्ष आमचा दावा आणि युक्तिवाद फेटाळतील. अशा प्रकारे अधिवक्ता विष्णू शंकर जैन हे षड्यंत्र रचून आमचा दावा नष्ट करण्यावर बेतले आहेत. आमचा खटला सहज फेटाळता यावा म्हणून त्यांनी वकलतनामा लावला.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
नव्या संसद भवनातील अशोक स्तंभ वरून वाद सुरू; बदलण्याची मागणी
छापा मारणारे अधिकारी म्हणाले; “काँग्रेस सरकार पाडा,तुम्हाला मुख्यमंत्री बनवू”
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 12, 2022, 18:40 PM
WebTitle – Hindu faction split over Gyanvapi case Lawyer Vishnu Jain accused of benefiting the Muslim side