दत्तकविधान व अज्ञान पालकत्व
हिंदू कोड बिलामध्ये दत्तकविधान याबाबत सखोलपणे विवेचन करण्यात आले आहे. दत्तक विधानाच्या काही जरुरी बाबी आहेत त्या आपण पाहू.
दत्तक घेण्याची पात्रता
१) मानसिक दृष्ट्या सबळ असलेल्या आणि 18 वर्षे पूर्ण झालेल्या हिंदूं मुलगा दत्तक घेण्यासाठी पात्र आहे.
यासाठी दत्त घेणाऱ्याच्या पत्नीचे त्या व्यक्तीस समर्थन असायला हवे.
२) 18 वर्षे पूर्ण वयाच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाची हिंदू विधवा दत्तक मुलगा घेण्यासाठी पात्र आहे.
दत्तक विधान करताना तिच्या मिळकतीचे साधन तिची स्थावर आणि जंगम प्रॉपर्टी याचा विचार करून दत्तक विधान केले जाईल.
३) दत्तकविधानाचा पात्र असलेल्या पुरुषाने आपल्या एक किंवा अनेक पत्नी असतील तर
त्यांना मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार तो पुरुष देऊ शकेल अथवा नाकारून सुद्धा शकतो.
यामध्ये बहुपत्नीत्व असलेल्या पुरुषाने एका पत्नीस जर दत्तकविधानाचा अधिकार दिला असेल तर
बाकीच्या पत्नी यांना प्रतिबंध केला आहे असे समजावे.
४) 1908 च्या सोळाव्या कायद्याप्रमाणे किंवा 1925 च्या 36 व्या कायद्याप्रमाणे
त्याच्या कलम 63 प्रमाणे दत्तक विधान करणाऱ्या पुरुषाने मृत्युपत्र केले असेल तर
आणि त्या मृत्युपत्रात दत्तक विधानाबद्दल स्पष्ट सांगितले असेल तर मृत्यूपश्चात दत्तक विधान केले असेल तर ते ग्राह्य समजले जाईल.
५) बहुपत्नीत्व असलेल्या व्यक्तीच्या दोन अगर जास्त पत्नी असतील तर आणि त्या विधवा असतील तर
त्यामध्ये अग्रक्रमानुसार दत्तक घेण्याचा अधिकार त्या पुरुषाच्या पहिल्या पत्नीपासून सुरू होईल.
प्रथम लग्न झालेली पत्नी किंवा मृत व्यक्तीची विधवा ही नंतर च्या लग्नाच्या पत्नी किंवा विधवा साठी वडील समजावी.
याचा अर्थ असा की मृत व्यक्तींची पहिली पत्नी ही दत्तक विधानासाठी अग्रक्रमांकित आहे.
६) दत्तकविधान चा हक्काचा शेवट जर त्या व्यक्तीच्या पत्नीने पुनर्विवाह केला असेल तर होऊ शकतो. तसेच त्या व्यक्तीची स्वतःची संताने जीवंत असतील आणि ती हिंदू असतील तर अशा स्थितीमध्ये त्या पत्नीस मुलगा दत्तक घेता येत नाही.
दत्तक देण्याची पात्रता
१) आई किंवा बाप याशिवाय तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला इतरांचे संतान दत्तक देण्याचा अधिकार नाही.
२) पोटकलम तीनच्या ब आणि क यांच्या अटीनुसार बाप जिवंत असेल तर त्यास आपला मुलगा दत्तक घेण्याचा अधिकार आहे. बाप जर मृत असेल तर आईच्या संमतीने तिचा मुलगा तिला इतरांना दत्तक देता येईल.
३) दत्तक देणारे आई वडील अठरा वर्ष पूर्ण झालेले असावेत. ते मानसिक रित्या सढळ असावेत. बाप किंवा आई या शब्दात दत्तक बाप किंवा दत्तक आई याचा समावेश होत नाही. असमर्थ मनाची मानसिक रित्या सबळ नसलेली 18 वर्षे पूर्ण नसलेली आई किंवा बाप या व्यक्ती संमती देण्यास पात्र नाहीत.
दत्तक म्हणून घेतला जाणाऱ्या व्यक्तीची पात्रता
१) जो व्यक्ती दत्तक म्हणून घेतला जाणार आहे त्या व्यक्तीने कोणत्याही स्त्रीला अथवा पुरुषाला दत्तक घेतलेले नसावे. तो हिंदू असावा. तो विवाहित नसावा. तो पूर्वी कधीच दत्तक घेतलेला नसावा. त्या व्यक्तीचे वय किमान पंधरा वर्षे पूर्ण झालेले असावे.
२) दत्तक घेण्यासाठी जो मुलगा दत्तक घेतला जाईल तो दत्तक देणाऱ्या कुटुंबाचा सर्वात वडील मुलगा अर्थात मोठा मुलगा असावा.
३) नातेसंबंधांमध्ये जिच्याशी दत्तक घेणारा व्यक्ती लग्न करू शकत नाही अशा नात्यांमधल्या उदाहरणार्थ त्याच्या बहिणीचा मुलगा, त्याच्या मुलीचा मुलगा किंवा आईच्या बहिणीचा मुलगा तसेच जवळच्या नातेवाईकांना मधील लग्नसंबंध जोडू शकणार नाहीत अशा कोणत्याही व्यक्तीचा मुलगा दत्त घेता येईल.
दत्तक विधान ची पूर्तता आणि त्याकरता अटी
१) दत्तक घेतलेला मुलगा दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला त्या मुलाचा ज्या घराण्यात जन्म झाला आहे त्या घरातून जोपर्यंत वर्ग करण्याच्या उद्देशाने त्याच्या आईबापांनी शारीरिकरित्या दिल्या शिवाय दत्तक विधान पूर्ण होत नाही. याचा अर्थ असा की जो मुलगा दत्तक जाणार आहे तो मुलगा आपल्या आई बाबांना सोडून दत्तक घेतलेल्या व्यक्तीकडे कायमस्वरूपी जाणे बंधनकारक आहे.
२) जो व्यक्ती एखाद्या मुलगी याला दत्तक घेणार आहे त्या व्यक्तीला अथवा त्याच्या स्वतःच्या मुलाला (औरस अथवाकोअनौरस)कोणतीही संतती असता कामा नये.
३) एकाच मुलग्याला एकावेळी दोन किंवा अधिक व्यक्तींनी दत्त घेता कामा नये तसेच एका व्यक्तीला एकापेक्षा जास्त मुले दत्तक घेता येणार नाही.
४) दत्तक घेणारे आणि देणारे त्यांच्यामध्ये दत्तक विधान त्यांच्या परस्पर संमतीने झाले पाहिजे.
५) दत्तक घेणारा अथवा देणारच यांच्यावर दडपण लबाडी आमिष किंवा इतर कोणत्याही प्रकारचे वजन वापरून दत्तक विधान करता येणार नाही.
६) दत्तक विधानानंतर ज्या व्यक्तीने एखाद्या मुलगी याला दत्तक घेतले आहे तो व्यक्ती त्या मुलग्याचा बाप आहे आणि त्याची पत्नी त्या दत्तक मुलग्याची आई आहे असे समजण्यात येईल.
७) दत्तकविधान झाल्यानंतर दत्तक घेणार आई वडील आणि त्यांची इतर नाती त्या मुलग्याला मुलगा म्हणून बंधनकारक असतील. म्हणजे दत्तक झालेला मुलगा दत्तक पिता आणि माता यांचे नातेसंबंध मध्ये असणारे इतर जे नातेवाईक आहेत त्यांच्याशी दत्तक माता पित्याचा मुलगा आणि त्याला लागू होणारी नाती असेल तसा त्याने ईतर नातेवाईकांसोबत व्यवहार करावा ही अपेक्षा आहे.
हक्क आणि अधिकार
दत्तक विधान केल्यानंतर मिळणारे हक्क आणि अधिकार, दत्तक विधान रद्द केल्यानंतर हक्क नष्ट होणे
१) दत्तकविधान केल्याबद्दल जो मुलगा दत्तक म्हणून दत्तक आई-वडिलांकडे आला आहे त्याला त्या आई-वडिलांचा संपत्तीचा हिस्सा मिळेल.
२) दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला जर दुसरी पत्नी असेल आणि त्या पत्नीस मुले असतील तर दत्तक गेलेल्या मुलग्याला दत्तक पित्याकडून निम्मा हिस्सा दिला जाईल उरलेला निम्मा हिस्सा त्याच्या सावत्र आईच्या मुलांना मिळेल.
३) दत्तक पत्र केल्यानंतर कोणत्याही दस्ताने अथवा मृत्युपत्रा ने मालमत्तेची विल्हेवाट दत्तक आई वडील दत्तकविधानाविरुद्ध जाऊन करणार नाहीत.
४) एखाद्या हिंदू व्यक्तीस जेव्हा अनेक पत्नी आहेत तेव्हा तो ज्या पत्नीच्या संमतीने दत्तक विधान करतो तसेच त्याचा इतर बायकांनी जर संमती दिली असेल तर त्या व्यक्तीची सर्वात वडील पत्नी तिला दत्तक आई मानले जाईल व बाकीच्या त्या दत्तक पित्याच्या बायकांना दत्तक मुलाच्या सावत्र आई समजाव्यात.
५) एखादा ब्रह्मचारी जेव्हा एखाद्या मुलग्याला दत्तक घेतो आणि दत्तक घेतल्यानंतर त्याने जर लग्न केले तर त्या दत्तक वडिलांची पत्नीस सावत्र आई समजावे.
६) एखाद्या मयत हिंदूच्या अनेक बायका असतील आणि त्यांना एखाद्या मुलग्याला दत्तक घ्यायचे असेल तर त्या मयत हिंदूची पहिली पत्नी ती त्याची दत्तक आई असेल,आणि इतर बायका सावत्र आई असतील.
७) कायदेशीर रित्या केले गेलेले दत्तक विधान दत्तक आई किंवा दत्तक बापाला रद्द करता येणार नाही तसेच दत्तक गेलेल्या मुलग्याला त्याच्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही आणि जन्म दिलेल्या घराकडे परत जाता येणार नाही.
दत्तक विधानाची कागदपत्रे
दत्तकविधान नोंदणीसाठी ऑफिशियल गॅजेट मध्ये राज्य सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात
त्या अर्जावर दत्तक देणारे आणि घेणारे यांच्या सह्या असतील दत्तक विधान पासून
90 दिवसांच्या आत खालील बाबी पूर्ण करायच्या आहेत.
१) दत्तकविधान तारीख, दत्तक विधानाची पद्धत, दत्तक घेणारा त्याचे नाव वय किंवा दत्तक घेणारे एकापेक्षा जास्त असतील तर त्यांची नावे, वय व पत्ते नोंद करणे आवश्यक आहे. यामध्ये एकापेक्षा जास्त याचा अर्थ असा की दत्तक घेणाऱ्या व्यक्तीच्या बायका.
२) दत्तक घेणारा माणूस विवाहित आहे तर त्या व्यक्तीच्या बायकोचे नाव, जर तो विधुर आहे तर त्या व्यक्तीच्या मेलेल्या बायकोचे नाव तसेच एकापेक्षा अधिक बायका असणारा दत्तक पिता असेल तर त्याच्या बायकांची नावे क्रमवार असावीत.
३) दत्तक घेणारी व्यक्ती जर स्त्री असेल तर तिच्या पतीचे नाव पती हयात नसेल तरीही त्याचे नाव सोबत तिला सवती असतील तर त्यांची नावे क्रमानुसार असावीत.
४) दत्तक देणाऱ्या इसमाचे नाव, दत्तक गेलेल्या व्यक्तीचे नाव, दत्तक मुलाचे वय दत्तक घेतलेल्या मुलाचे त्याच्या दत्तक घराण्यातील नवीन नाव इत्यादीची नोंद असणे गरजेचे आहे.
अज्ञान पालकत्व
अज्ञान पालकत्वाची व्याख्या म्हणजे ज्याने अठरावे वर्ष पूर्ण केले नाही असा.
व्यक्तीपालकत्वाची व्याख्या म्हणजे त्याचे जन्म देणारी आई वडील जन्म देणाऱ्या आई वडिलांना सोडून
मृत्युपत्रा नेमलेला कोर्टाने जाहीर केलेला किंवा नेमलेल्या व्यक्तीला अज्ञान व्यक्ती चा पालक असे संबोधण्यात येईल.
तसेच कोणत्याही कोर्टाने किंवा कायद्याने अधिकार दिलेल्या व्यक्तीस पालक असे संबोधण्यात येईल.
अज्ञान मुलाच्या शरीराचे व मिळकतीचे स्वाभाविक पालन करणारे खालील प्रमाणे आहेत.
१) त्या मुलाच्या अगर अविवाहित मुलीच्या बाबतीत बाप आणि त्याच्यानंतर आई.
२)मात्र तीन वर्षे पूर्ण न झालेल्या अज्ञान बालकाचा कब्जा त्याच्या आईकडे राहील.
३) अनौरस मुलगा अगर अनौरस विवाहित मुलगी यांच्याबाबत आई नंतर तिचा बाप.
४) लग्न झालेल्या मुलीच्या बाबतीत तिचा पती.
स्वाभाविक पालकाचे अधिकार
अज्ञान पालकत्वाच्या कायद्यास पात्र राहून हिंदू अज्ञानाच्या स्वाभाविक पालकास त्या अज्ञान बालकाच्या हिताकरिता योग्य आणि वाजवी आहे
तशा इस्टेटीच्या हित जोपासण्यासाठी संरक्षणाकरता वसुली करिता निर्णय घेणे याचा अधिकार आहे.
पण यासाठी काही अटींचा ही समावेश आहे.त्यातल्या प्रमुख अटी अशा.
१) अज्ञान बालकाच्या स्थावर मिळकतीचा कोणताही भाग विकणार नाही २) गहाण टाकणार नाही
३) त्याच्या वरती बोजा करणार नाही ४) खरेदीने वर्ग करणार नाही ५) कुणाला बक्षीस देणार नाही
६) त्याची आदला बदल करणार नाही ७) त्याची मिळकत कोणाला भारी तत्वाने देणार नाही.
अज्ञान पालकत्वाच्या काही अटी
१)मृत्युपत्राद्वारे अज्ञान बालकाच्या पालनपोषणाची जबाबदारी जर एखाद्याने त्रयस्थ व्यक्तिस दिली असेल तर ती ग्राह्य मानली जाईल.
२) पतीच्या मृत्यूनंतर त्याची विधवा ही त्या अज्ञान बालकाची कायदेशीर रित्या पालक आहे.
३) मृत्युपत्राद्वारे एखाद्या हिंदू आपल्या अज्ञान बालकाचे पालकत्व त्याला हवे त्या व्यक्तीस तो देऊ शकतो.
४) अज्ञान बालकास हिंदू म्हणून वाढवणे त्याचे पालन पोषण करणे हे त्या अज्ञान बालकाच्या पालकाचे कर्तव्य आहे.
५) अज्ञान बालकाच्या स्थावर मिळकतीचे जंगम मिळकतीचे तसेच कायदेशीर रित्या असणाऱ्या सर्व मिळकत त्यांची देखभाल करणे
त्या पालकाचे कर्तव्य आहे पण त्या व्यक्तीस त्या संपत्तीची विल्हेवाट लावण्याचा अधिकार नाही.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी 2
First Published on APRIL 12 , 2021 08 : 57 AM
WebTitle – hindu code bill law and dr b r ambedkar 2021-04-12