अदानीची संपत्ती नष्ट केल्यानंतर, यूएस-आधारित हिंडेनबर्ग रिसर्च, Hindenburg Research ज्याला शॉर्ट-सेलर कंपनी देखील म्हटलं जातं, पुन्हा एक दुसरा अहवाल दिला आहे की ब्लॉक इंकने ग्राहक आणि सरकार यांच्याविरुद्ध फसवणूक केली आहे.ट्विटरचे सह-संस्थापक Jack Dorsey जॅक डोर्सीच्या पेमेंट ग्रुप Block Inc ब्लॉकवर हिंडेनबर्ग रिसर्च ने एक नवीन विस्तृत अहवाल प्रसिद्ध केला आहे.यामुळे कंपनीचे आतापर्यंत 526 दशलक्ष स्वाहा झाले आहेत.
हिंडेनबर्ग चा दुसरा अहवाल;कंपनीचे 526 दशलक्ष स्वाहा
Block Inc ची स्थापना उद्योजक जॅक डोर्सी यांनी केली होती आणि
ती व्यापारी आणि ग्राहकांसाठी पेमेंट आणि मोबाईल बँकिंग सेवा देते.
2009 मध्ये स्थापन झालेली कंपनी स्क्वेअर Square म्हणून ओळखली जात होती,
त्यांनी पारंपरिक आर्थिक व्यवहारांना छेद देणारी एक कल्पना आणली.
यामध्ये एक लहान कार्ड रीडर वापरला गेला जो स्मार्टफोनच्या हेडफोन जॅकमध्ये प्लग इन करू शकतो
जेणेकरून कलाकार आणि विक्रेत्यांना क्रेडिट कार्ड पेमेंट्स सहजपणे घेता येतील.
गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचे काम ब्लॉक इंक ने केले
हिंडेनबर्गने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटले आहे की, “आमच्या 2-वर्षांच्या तपासणीने निष्कर्ष काढला आहे की ब्लॉकने लोकसंख्याशास्त्राचा पद्धतशीरपणे फायदा घेतला आहे ज्याचा तो दावा करत आहे. ब्लॉकच्या व्यवसायामागील “जादू” ही काही नवकल्पना नाही, तर कंपनीचा फायदा करण्याची आहे. ग्राहक आणि सरकार विरुद्ध फसवणूक करणे, नियमन टाळणे, आणि फुगवलेल्या मेट्रिक्ससह गुंतवणूकदारांची दिशाभूल करण्याचे काम ब्लॉक इंक ने केले आहे.”
हा अहवाल आल्यापासून, ब्लॉक इंकच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.
कंपनीचे समभाग 20% पर्यंत घसरले. गेल्या वर्षभरात या कंपनीचे शेअर्स 57 टक्क्यांनी घसरले आहेत.
ब्लॉक कायदेशीर कारवाईची तयारी हिंडेनबर्गचा अहवाल प्रकाशित झाल्यानंतर,
जॅक डोर्सीच्या नेतृत्वाखालील अमेरिकन पेमेंट फर्म ब्लॉक इंकने केलेले सर्व आरोप फेटाळले आहेत.
कंपनीने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की हिंडेनबर्गवर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यासाठी शक्यता तपासल्या जात आहेत.कंपनीच्या म्हणण्यानुसार, कॅश अॅप बिझनेसवर शॉर्ट सेलरचा अहवाल तथ्यात्मकदृष्ट्या चुकीचा आणि दिशाभूल करणारा आहे. संशोधन अहवालाचा आढावा घेतल्यानंतर ब्लॉक मॅनेजमेंटने सांगितले की, आमच्या गुंतवणूकदारांची फसवणूक आणि दिशाभूल करण्यासाठी हिंडेनबर्ग अहवाल तयार करण्यात आला आहे.
अमेरिकेतील सत्ताधारी पक्षाने हा देशावरील हल्ला म्हटलं नाही
या प्रकरणात आणखी महत्वाची गोष्ट घडली आहे की अमेरिकेतील सत्ताधारी पक्षाने त्यांच्या नेत्यांनी किंवा प्रधानमंत्र्यांनी या फ्रॉड करणाऱ्या कंपनीच्या बाजूने कोणत्याही प्रकारे मोर्चे बांधणी केली नाही. समर्थन केले नाही,इतकेच नाहीतर त्यांनी हा आमच्या देशावरील हल्ला आहे असा कांगावा सुद्धा केलेला नाही.ही बाब अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे.
ईव्हीएम EVM च्या संदर्भात विरोधी पक्ष आक्रमक;बैठकीत निर्णय
@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on MAR 24,2023 10:34 AM
WebTitle – Hindenburg’s second report; Jack Dorsey the black inc company lost 526 million