हिंडनबर्ग ने पुन्हा अडानी ग्रुपवर केला हल्ला, म्हटलं- ग्रुपचे स्विस बँक खाते गोठवले : अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडनबर्ग रिसर्चने पुन्हा एकदा अडानी ग्रुपवर हल्ला चढवला आहे. यावेळी त्यांनी स्विस मीडिया आउटलेट गोथम सिटीच्या एका बातमीचा हवाला देत म्हटले आहे की अडानी ग्रुपच्या चौकशीच्या भागामध्ये स्विस अधिकाऱ्यांनी अनेक स्विस बँक खात्यांमध्ये असलेले $310 मिलियन म्हणजेच सुमारे 2600 कोटी रुपये गोठवले आहेत. हिंडनबर्गने हा आरोप 12 सप्टेंबर 2024 रोजी एक्सवरील एका पोस्टमध्ये केला आहे. स्विस अधिकारी 2021 पासून अडानी समूहावरील मनी लॉन्ड्रिंग आणि प्रतिभूति हेरफेर प्रकरणाची चौकशी करत आहेत.
आरोपांवर अडानी ग्रुपची प्रतिक्रिया
याबाबत अडानी ग्रुपच्या प्रवक्त्याने आरोपांना “निरर्थक, तर्कहीन आणि बेताल” म्हणत याला उत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं, “अडानी समूहाचा स्विस कोर्टातील कोणत्याही कार्यवाहीत सहभाग नाही, तसेच आमच्या कंपनीच्या कोणत्याही खात्याला कोणत्याही प्राधिकरणाद्वारे जप्त केले गेलेले नाही.” निवेदनात म्हटले आहे, “आम्हाला हे सांगण्यात काहीही संकोच नाही की, आमच्या समूहाच्या प्रतिष्ठेला आणि बाजारमूल्याला अपरिवर्तनीय नुकसान पोहोचवण्याचा हा एक ठरवून केलेला आणि गंभीर प्रयत्न आहे.”
ते पुढे म्हणाले, “कथित आदेशात स्विस कोर्टाने आमच्या समूहाच्या कंपन्यांचा उल्लेख केलेला नाही
आणि आम्हाला कोणत्याही प्राधिकरण किंवा नियामक संस्थेकडून कोणतीही माहिती किंवा स्पष्टीकरण मागवलेले नाही.
आम्ही पुन्हा एकदा सांगतो की आमची परदेशी होल्डिंग संरचना पारदर्शक आहे, पूर्णपणे उघड आहे आणि सर्व संबंधित कायद्यांचे पालन करते.”
सहा स्विस बँकांमध्ये $310 मिलियन
हिंडनबर्गने बातमीचा हवाला देत म्हटले की, अडानी यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका फ्रंटमॅनने ब्रिटिश वर्जिन आयलंड्स/मॉरिशस आणि बरमूडा येथे स्थित अपारदर्शक फंडांमध्ये गुंतवणूक केली होती, ज्यामध्ये प्रामुख्याने अडानी स्टॉक्स होते. अहवालात पुढे म्हटले आहे की, सहा स्विस बँकांमध्ये $310 मिलियन पेक्षा जास्त रक्कम ठेवली गेली होती, जी आता सर्व गोठवण्यात आली आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 14,2024 | 20:31 PM
WebTitle – Hindenburg Targets Adani Group Again: Swiss Bank Accounts Frozen