प्रिय सुवर्ण कन्या
हिमा दास
हिमा दास तुझं अभिनंदन… तुझं घर पुरात वाहून गेलं असताना… तू दुःखात असताना देखील तू भारतासाठी पंधरा दिवसात चार सुवर्ण पदक मिळविलीस.
अशी घटना माझ्या माहिती मध्ये तरी भारतात आजपर्यंत कोणी केली नाही. तू भारतीय इतिहासातील एक ऐतिहासिक टप्पा झाली आहेस.
पण भारतात तुझी ही कामगिरी सहा महिन्यापेक्षा जास्त कोणी लक्षात ठेवणार नाही आणि मिडिया तर तुला जास्तीत जास्त आठवडा भर प्रसिद्धी देईल.
कारण तू ज्या खेळामध्ये सोनेरी कामगिरी करत आहेस तो खेळ भारतात Glamorous या श्रेणीमध्ये बसत नाही. भारतातल्या व्यापाऱ्यांना तुझ्या या क्रिडा प्रकारातून काही कमवता येत नाही किंवा भारतात तुझ्या क्रिडा प्रकाराचे जास्त चाहते नाहीत. त्यामुळे उत्पादकांना तुला जाहिराती मध्ये घेऊन जास्त नफा कमवता येणार नाही.
आपला भारत भांडवल दारांचा देश आहे
आपला भारत भांडवल दारांचा देश आहे आणि हे आता लपून राहिलेलं नाही.
भारतात ज्या खेळापासून पैसा कमावला जाऊ शकतो..अश्याच खेळाला व्यापारी जवळ करतात.
हॉकी, बॉडीबिल्डिंग, टेनिस, बॅडमिंटन , बिलियर्ड्स, व्हॉलीबॉल, फुटबॉल, कॅरम
या खेळात आपल्या कडे तुझ्या सारखे जागतिक पातळी वरचे हिरो आहेत.
पण त्यांच्या या खेळातून व्यापाऱ्यांना काही फायदा होत नाही.
त्यामुळे ते ही भारताच्या क्रिडा विश्वाच्या मूळ प्रवाहा पासून दूर आहेत.
पण क्रिकेट या खेळाचे भारतात कामधंदा सोडून सात/आठ तास एका जागी बसून सामना बघणारे लाखोंनी चाहते आहेत.
या चाहत्या मुळे या सामन्यांच्या प्रायोजकाला पैसा कमावता येतो.
क्रिकेट मधील खेळाडूंना जाहिराती मिळतात.ही सर्व टीम सहजासहजी करोडो रुपये कमवून जातात.
कदाचित या क्रिकेट मधला बडा खेळाडू तुला एखादी मर्सिडीज पण भेट देईल कारण ते खेळाडू तेव्हढे श्रीमंत आहेत.
बरे झाले तुला सरकारी नोकरीं मिळाली आहे. आता किमान वयाच्या 60 वर्षा पर्यंत तरी तुझी जीवन जगण्याची धडपड शांत झाली आहे.
नाहीतर 20/22 वर्षा नंतर वर्तमान पत्रात एखादी बातमी छापून आली असती. 20 सुवर्ण पदक मिळविलेली सुवर्ण कन्या सध्या गरिबीत जीवन जगत आहे.
20 सुवर्ण पदक यासाठी म्हणतं आहे कारण.. एव्हडी सुवर्ण पदक मिळविण्याची तुझ्यात ती ताकद आहे. आणि तू ती मिळवशील हा विश्वास तुझ्या प्रत्येक चाहत्याला आहे.
तुझा एक चाहता
by महेश भोसले, पुणे
19/7/2019
लोवलिना बोर्गोहिन चं खडतर संघर्षाचं कांस्यपदक
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच