हरियाणा : भारतीय जनता पार्टी (भाजप) हरियाणा युनिटचे अध्यक्ष ओपी धनखड़ (O P Dhankhar) यांनी एक अजब गजब वक्तव्य केलंय. त्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे ओम प्रकाश धनखड यांनी मोदी सरकार आल्यानंतर हरियाणात महिलांची उंची वाढल्याचे म्हटले आहे. या काही वर्षांत माझ्या बहिणींची उंचीही दोन दोन इंचांनी वाढल्याचा दावाही ओपी धनखड यांनी केलाय.
हरियाणातील सिरसा येथे झालेल्या पक्षाच्या पन्ना प्रमुखांच्या बैठकीत ओपी धनखड कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.या कार्यक्रमात ते म्हणाले, ‘पूर्वी महिलांच्या डोक्यावर शेणाची टोपली आणि पाण्याची टाकी असायची,मात्र आता महिलांची उंची दोन दोन इंचांनी वाढली आहे.महिलांना या गोष्टींपासून वाचवण्याचे काम मोदी सरकार आणि भाजप सरकारने केले आहे.
हरियाणात भाजप निवडणुक मोडमध्ये आहे
ओपी धनखड जेव्हा मंचावरून बोलत होते, तेव्हा अनेक बडे नेतेही मंचावर उपस्थित होते.
या नेत्यांमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचाही समावेश आहे.
किंबहुना, यावेळी हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजप एकट्याने उतरण्याचा विचार करत आहे.
त्यामुळेच प्रदेशाध्यक्ष ओ.पी.धनखड हे अत्यंत सक्रिय असून बूथ अध्यक्ष आणि पन्नाप्रमुखांसाठी सातत्याने कार्यक्रम घेत आहेत.
नुकतेच ओपी धनखड हेही शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.
ते म्हणाले होते, ‘हरियाणाचे शेतकरी हे त्या जवानांचे वडील आहेत ज्यांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत.
हरियाणा ही वीर भूमी आहे. हरियाणातील लोक आत्महत्येसारखे पाऊल उचलत नाहीत.
हरियाणाची भूमी आत्महत्या करणाऱ्यांना सन्मान देत नाही, त्यामुळे आत्महत्या हरयाणात चांगली मानली जात नाही.
“सरकारने दबाव आणला” -मोदी यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर एलन मस्क ने काय म्हटलं?
Sanatani Bulldozer सनातनी बुलडोजर आता धार्मिक प्रतिक?
आदिपुरुष का “कपड़ा तेरे बाप का जलेगी भी तेरे बाप की” चुराया हुआ है डायलॉग?
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा....
First Published by Team Jaaglya Bharat on 21 JUN 2023, 13:56 PM
WebTitle – Height of women increased since Modi govt came: BJP leader op-dhankar