हरलीन देओल ची कॅच
Harleen Deol Catch Video: इंग्लंड मध्ये सुरू असलेल्या महिला टीम इंडियाला डकवर्थ लुईस नियमानुसार या सामन्यात पराभव पत्करावा लागला असला तरी हरलीन देओल नं घेतलेल्या भन्नाट कॅचची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
19 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर अॅमी एलेन जोन्सनचा हरलीन देओल नं घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मिडियात व्हायरल झालाय.
हरलीन देओलने इंग्लंडची यष्टिरक्षक एमी जोन्सचा कॅच सीमारेषेवर पकडला.
भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने 19 वे षटक शिखा पांडेला दिले होते.
ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर एमी जोन्सने षटकार मारण्याचा प्रयत्न केला.
पण लाँग ऑफवर फील्डिंग करत असलेल्या हरलीन देओल ने तिच्या आशांवर पाणी सोडले.
तिने सीमारेषेच्या अगदी जवळ जोन्सचा कॅच पकडला.
मात्र ती स्वतः सीमारेषेच्या बाहेर गेली,अगोदर तीने चेंडू हवेत झेलला
आणि हवेतच सीमारेषेच्या आत उडवला.
आणि नंतर डाईव्ह मारत पुन्हा कॅच घेतला.
harleen deol catch
इथे जर पूर्वीचा नियम असता तर गोंधळ उडाला असता,कारण हरलीन देओल चा झेल पूर्ण होण्यापूर्वी मैदानाशी शेवटचा स्पर्श खेळाच्या मैदानाच्या बाहेर आला आहे.परंतु क्रिकेटच्या कायद्यांचे बारकाईने परीक्षण केल्यास हे स्पष्ट होते की जोन्सला आऊट देण्यात आला तो योग्य ठरतो.
क्रिकेट नियम कायदा 33.2.1 मध्ये असे नमूद केले आहे की “प्रत्येक वेळी एकतर चेंडू किंवा चेंडूच्या संपर्कात असलेल्या कोणत्याही फील्डरने झेल पूर्ण होण्यापूर्वी हद्दीच्या पलीकडे न गेल्यास तो झेल योग्य आणि पूर्ण झेल मानला जाईल.”
क्रिकेट नियम कायदा 19.5.2 मध्ये असे नमूद केले आहे की “सीमा रेषेच्या आत मैदानावर असणारा फील्डर जेव्हा त्याचा/ तिचा मैदानाशी शेवटचा संपर्क सीमारेषेच्या बाहेर असेल अन त्याचा चेंडूशी पहिला संपर्क होण्यापूर्वी त्याचा सीमारेषेच्या आतील मैदानाशी संपर्क झाला नसेल तर फील्डर सीमेच्या पलीकडे असल्याचे मानले जाते. ”
त्यामुळे हरलीन देओल ला “सीमेच्या पलीकडे” मानले गेले नाही.
कारण चेंडूचा पहिला संपर्क सीमारेषेच्या हद्दीत होता तसेच त्यापूर्वी तिचा मैदानाशी अंतिम संपर्क होता.
तिचा पुढचा संपर्क चौकार हद्दीबाहेर येण्यापूर्वी सीमारेषेच्या आतील मैदानाशी होता.
थोडक्यात, जोपर्यंत फील्डर प्रथम बॉलला स्पर्श करण्यापूर्वी खेळाच्या मैदानात प्रारंभ करतो.
तो झेल पूर्ण केल्यावर खेळाच्या मैदानामध्ये संपतो
आणि त्याचवेळी कधीही सीमा किंवा मैदानाशी संपर्क साधला जात नाही.
सीमारेषेच्या आत बॉलच्या संपर्कात असल्याने, हा झेल कायदेशीर ठरला आहे.
यावर काही लोकांचे असे म्हणने आहे की हरलीन देओल,चेंडू आणि सीमारेषेवरील मैदानाच्या एकाच वेळी संपर्कात होती, परंतू त्याचा री-प्ले काळजीपूर्वक पाहिला तर असं दिसतं की ते खरं नाहीये.
क्रिकेटच्या या संबंधीच्या कायद्यात 2013 मध्ये बदल करण्यात आले. याविषयी अनेक कॉँट्रोव्हर्सिज अन मतभेद असल्याने त्यात पुरेसं स्पष्टीकरण आणण्यासाठी हे बदल करण्यात आले.सीमारेषेवर झेल घेताना जगलींग केली जाते त्यावेळी झेल घेण्यावरून काही संभाव्य वाद स्पष्ट करण्यात आले. तरीही असेही काही लोक आहेत ज्यांना असे वाटते की अधिक सुधारणा आणि स्पष्टीकरण आवश्यक आहेत.
उल्लेखनीय म्हणजे, सप्टेंबर 2015 मध्ये ग्लेन मॅक्सवेल ने सध्याच्या याच नियमांवर आक्षेप नोंदविला होता.विशेष म्हणजे इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात त्याने अशाचप्रकारे झेल घेऊन लियाम प्लंकेट ला झेलबाद केले होते.
मॅक्सवेलने त्या वेळी सांगितले की “मला वाटते तुम्हाला पुन्हा सीमारेषेच्या हद्दीत जायला हवं.तुम्ही बास्केटबॉल चा नियम पाहिला तर. त्यास परत आत फेकण्यासाठी आपल्याला आतून उडी मारावी लागेल, आपण हवेत उडी मारू शकत नाही आणि परत जाताना पकडू शकत नाही. आपले पाय कोर्टाच्या आत गेले आहेत याची खात्री करुन घ्यावी आणि मला असे वाटतं की ते क्रिकेटमध्येही असलं पाहिजे. पण हेही खरं आहे की जेव्हा आम्ही आमच्या बाजूने झेल घेत असतो तेव्हा त्याबद्दल मला खरोखर काही (अयोग्य) वाटत नाही.परंतु मला हेही माहित आहे की मी जर फलंदाज असेन तर त्यावेळी मला खूप वाईट वाटेल. तुम्हाला देण्यात आलेल्या नियमानुसारच खेळावं लागतं”
मॅक्सवेल ने घेतलेली कॅच खालील व्हिडिओमध्ये 1 मिनिट, 17 सेकंदांवर आहे.
परंतु, हेही तेवढेच खरे आहे की जर 2013 मध्ये या नियमात बदल केले नसते तर
आज हरलीन देओल चा झेल कायदेशीर ठरला नसता.
फॅक्टचेक: धोनी बौद्ध भिक्खू बनला? कारण जाणून घ्या..
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 11 , 2021 01 : 18 AM
WebTitle – harleen deol catch 2021-07-10