हरिद्वार दि.13 : उत्तराखंडसह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रसार (Coronavirus) झपाट्यानं वाढताना दिसत आहे. मात्र, हरिद्वार येथील महाकुंभमेळ्यावर (Haridwar Mahakumbh) याचा काहीही परिणाम झाला नसल्याचं चित्र आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्क (Mask) आणि कोरोनाचे नियम पायदळी तुडवत लाखोंच्या संख्येनं भाविक नियमांचा फज्जा कुंभमेळ्यासाठी दाखल होत आहेत. इथे झालेल्या प्रचंड गर्दीदरम्यान थर्मल स्क्रीनिंग आणि इतर उपाययोजना करण्यात राज्य सरकारही अपयशी ठरलं आहे.
मात्र, मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांचा असा दावा आहे, की शाही स्नानाच्या वेळी
राज्य सरकारनं केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या सर्व सूचनांचं पूर्णपणे पालन केलं आहे.
कुंभमेळा पोलीस नियंत्रण कक्षाच्या म्हणण्यानुसार, सोमवारी झालेल्या दुसऱ्या शाही स्नानामध्ये 31 लाखाहून अधिक जणांनी सहभाग घेतला होता. आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार, यादरम्यान रविवारी रात्री साडेअकरा वाजेपासून सोमवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 18169 भाविकांची कोरोना चाचणी केली गेली, यातील 102 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
मेळा प्रशासनाकडून थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्थाही केली गेलेली नाही. सीसीटीव्ही कॅमेरे असतानाही अनेक श्रद्धाळू विना मास्क फिरताना दिसत आहेत. उत्तराखंडचे डीजीपी अशोक कुमार महाकुंभच्या दुसऱ्या स्नानाबद्दल बोलताना म्हणाले, की आमचा पूर्ण प्रयत्न आहे, की जितकं शक्य होईल तितकं कोरोना नियमांचं पालन झालं पाहिजे. सुरक्षेच्या दृष्टीनं उत्तराखंड पोलिसांसाठी हे मोठं आव्हान आहे. मेळ्यासाठी जितक्या लोकांची येण्याची शक्यता होती, त्यातील कोरोनामुळे केवळ पन्नास टक्केच लोक आल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.
इतर राज्यांपाठोपाठ उत्तराखंडमध्येही रुग्णवाढ होताना दिसत आहे. राज्यात २ हजार ५६ रुग्ण उपचार घेत असून,
शाहीस्नानाच्या पूर्वसंध्येला ३८६ नवीन रुग्ण आढळून आले. तर आठ जणांचा मृत्यू झाला.
त्यामुळे कुंभमेळ्यात आढळून आलेल्या करोना पॉझिटिव्ह भाविकांमुळे राज्य सरकारबरोबर केंद्राचीही चिंता वाढली आहे.
पहिल्या शाहीस्नानाला नियमांचा फज्जा उडवत ३२ लाख भाविक हरिद्वारमध्ये दाखल झाले होते.तर तिसरं शाहीस्नान बुधवारी होणार आहे.
कुंभमेळा उत्तराखंड मध्ये रुग्णसंख्येचा विस्फोट! धडकी भरवणारे आकडे
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published on APRIL 13 , 2021 13: 11 PM
WebTitle – haridwar kumbh mela covid surge 102 were found positive 2021