नवी दिल्ली: 13 ते 15 ऑगस्ट (3 दिवस) या कालावधीत चाललेल्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या वेबसाइटवर भारतीय ध्वजासह 5 करोडपेक्षा अधिकहून लोकांकडून सेल्फी अपलोड करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक मंत्रालयाने याचे वर्णन ‘महान यश’ असं केलं आहे. यावर्षी भारत स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा करत आहे.केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सांगितले की, ‘हर घर तिरंगा’ मोहिमेच्या वेबसाइटवर आतापर्यंत भारतीय ध्वजासह 50 दशलक्षाहून अधिक सेल्फी अपलोड करण्यात आल्या आहेत. मंत्रालयाने त्याचे वर्णन “महान उपलब्धी” म्हणून केले. केंद्र सरकारने ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा एक भाग म्हणून लाल किल्ल्यावर ७६ व्या स्वातंत्र्यदिनी भव्य उत्सव आयोजित केला, ज्यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुढील २५ वर्षांचा रोडमॅप शेअर केला आणि त्याला ‘अमृत काल’ असेही म्हटले आहे.
हर घर तिरंगा अन सेल्फी मोहिमेचे आवाहन
22 जुलै रोजी पंतप्रधानांनी घरोघरी राष्ट्रध्वज फडकावून किंवा प्रदर्शित करून ‘हर घर तिरंगा’ आंदोलनात सामील होण्याचे आवाहन केले होते. ‘आझादी का अमृत महोत्सवा’ची नोडल एजन्सी असलेल्या सांस्कृतिक मंत्रालयानेही लोकांना मोहिमेच्या वेबसाइटवर ‘तिरंगा’सोबत सेल्फी किंवा छायाचित्रे अपलोड करण्याचे आवाहन केले होते. भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचा उत्सव 12 मार्च 2021 रोजी 15 ऑगस्ट 2022 पर्यंत 75 आठवड्यांचा काउंटडाउन म्हणून सुरू झाला. हे 15 ऑगस्ट 2023 पर्यंत सुरू राहील.
हर घर तिरंगा सेल्फी साठी https://harghartiranga.com/selfi ही खास वेबसाइट तयार करण्यात आली आहे. त्यावर सेल्फी अपलोड करून देशभक्तीची भावना जागृत करण्याची संकल्पना होती. या यशाबद्दल केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी म्हणाले, “पाच कोटी तिरंग्याचे सेल्फी हे नेशन फर्स्ट आणि ऑलवेज फर्स्ट या भारतीयांची सामूहिक बांधिलकी दर्शवतात. हर घर तिरंगा मोहिमेचा उद्देश प्रत्येक नागरिकाच्या हृदयात देशभक्ती जागृत करणे हा होता.
25 करोड घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य
भारत स्वातंत्र्याचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र सरकारने ‘हर घर तिरंगा’ अभियानाची घोषणा केली होती. 13 ते 15 ऑगस्ट (3 दिवस) ही मोहीम चालली. याअंतर्गत 140 करोड पैकी देशभरातील 25 करोडहून अधिक घरांमध्ये तिरंगा फडकवण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. अधिकाधिक लोकांनी घरोघरी तिरंगा फडकवावा अशी अपेक्षा होती. केंद्र सरकारने तीन प्रकारचे ध्वज तयार करण्याची व्यवस्था केली होती.जे पोस्ट ऑफिसमध्येही उपलब्ध झाले. तिरंग्याची ऑनलाइन खरेदीही करण्यात आली. दरम्यान, विद्यार्थी, एनसीसी कॅडेट आणि एनएसएस स्वयंसेवकांची प्रभातफेरी काढण्यात आली. यापूर्वी 31 जुलै रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमात लोकांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 13-15 रोजी आयोजित ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
1 लाख 99 हजार ध्वज परत पाठवले
भारताच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीमध्ये ध्वज संहितेच्या मानकांचे पालन न केल्यामुळे
बुधवारी 1 लाख 99 हजार तिरंगा ध्वज गुजरातला परत पाठवण्यात आले.
तज्ज्ञांच्या मते, या तिरंग्यांमध्ये एकही दोष नव्हता, परंतु भौतिक पडताळणीमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी आढळून आल्या.
देशभरात अशा घटना घडत असल्याचे दिसून येतेय.
काही ध्वजांमध्ये कापडाच्या रंगात फरक दिसून आला तर काहींमध्ये अशोक चक्राचा मुद्दा होता.
दुसरीकडे अलीगढ येथे पाठवलेले 58 हजार ध्वज प्रत्यक्ष पडताळणीनंतर परत लखनौ ला पाठविण्यात आले आहेत.
डीपीआरओ धनंजय जयस्वाल यांनी सांगितले की, पाठवलेल्या या ध्वजांच्या कापडाचा दर्जा अतिशय निकृष्ट होता
आणि अनेक ध्वजांमध्ये अशोक चक्र चुकीच्या ठिकाणी छापले गेले होते.अनेक ठिकाणी दुसऱ्या दिवशीही ध्वज फडकवलेले दिसून आले,
तर काही ठिकाणी ते पावसात भिजतानाही दिसून आले,
यामुळे ध्वज संहितेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचे काही नागरिकांनी म्हटलंय.
पोलिसांनी घरोघरी तिरंगा यात्रा रोखली,प्रकरण गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचणार
पा रंजित यांच्या धम्मम चित्रपटात दाखवलेला बुद्ध वादाचा विषय का ठरू लागलाय?
गुगल जाहिरातीसाठी क्षमस्व! साईट मेंटेनन्ससाठी त्या गरजेच्या आहेत,आशा आहे आपण समजून घ्याल.सहकार्य कराल.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on AUG 16,2022, 17:59 PM
WebTitle – Har Ghar Tiranga : More than 5 crore people uploaded selfies with the national flag