गुजरात:अहमदाबाद. गुजरातमधील जुनागड जिल्ह्यात हिंदू दलितांना मंदिरात प्रवेश न करण्याचे निर्देश देणारे पोस्टर लावण्याचे प्रकरण समोर आले आहे. मालिया पोखोर गावात संगणकावर छापलेले पोस्टर गावात लावण्यात आले होते, ज्यामध्ये हरिजन आणि मेघवाल जातीच्या लोकांना मंदिरात प्रवेश न करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.हे प्रकरण गांभीर्याने घेत पोलिसांनी घटनास्थळ गाठून दलितांना मंदिरात प्रवेश करू नये म्हणून लावलेले पोस्टर हटवले. जुनागड जिल्ह्यातील मालिया तहसीलच्या पोखोर ग्रामपंचायतीच्या नावावर गावात दलितविरोधी पोस्टर लावण्याचे प्रकरण समोर आले आहे.त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि घटनास्थळी पोहोचून पोस्टर हटवले, पोस्टर कोणी लावले याचा तपास पोलीस करत आहेत.
हिंदू दलितांना मंदिरात प्रवेश न करण्याचे निर्देश
सामाजिक कार्यकर्ते हंसराज मीना यांनी हे पोस्टर शेअर केले होते.”मेघवाल समाजाला मंदिरात जाण्यास बंदी आहे.” हे पोस्टर गुजरातचे आहे. हे मॉडेल दिल्याबद्दल नरेंद्र मोदी यांचे आभार. शेवटी दलित समाजाची सुधारणा कधी होणार? असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटलंय.
याप्रकरणी या व्यतिरिक्त अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. हरिजन आणि मेघवाल जातीच्या लोकांनी
गावातील कालभैरव मंदिर आणि मंदिर परिसरात प्रवेश करू नये आणि याची विशेष काळजी घ्यावी, असे पोस्टरमध्ये लिहिले आहे.
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची धावपळ उडाली आणि पोलिस उपअधीक्षकांनी घटनास्थळी पोहोचून पोस्टर हटवले.
त्यांच्या उपस्थितीत दलित समाजातील महिला आणि पुरुषांनाही कालभैरव मंदिरात प्रवेश देण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
गुरुवारी सायंकाळपर्यंत व्हायब्रंट गुजरात गुंतवणूकदार परिषदेच्या तयारीत जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे उच्चपदस्थ अधिकारी व्यस्त असल्याने याप्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. अहमदाबादमधील जीएलएस विद्यापीठाबाहेर दलित विद्यार्थ्याच्या रॅगिंगचे प्रकरण नुकतेच समोर आले. याप्रश्नी कारवाई होत नसल्याबद्दल आमदार जिग्नेश मेवाणी यांनी त्यांच्या समर्थकांसह दोन दिवसांपूर्वी नवरंगपुरा पोलिस ठाण्याचा घेरावही केला होता.
Bulli Bai App : नेपाळी तरुण म्हणाला, हिंमत असेल तर अटक करा
‘बुल्ली बाई’ अॅप :पोलिसांनी बेंगळुरूच्या व्यक्तीला घेतले ताब्यात
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 08, 2022 16 :28 PM
WebTitle – Gujarat: Police remove posters barring Hindu Dalits from entering temples