सरकारी शाळा,त्यातही जिल्हापरिषद म्हणजे आणखी डाऊन मार्केट.अन त्यातही आदिवासी भाग ,सगळं ग्रामीण गावठी शहरी मध्यमवर्गीयांची ही मानसिकता राहिली आहे.गावाच्या शाळेत शिक्षण घेणारे अन देणारेही फार कौतुकास पात्र नसतात. परंतु ही मानसिकता बदलायला भाग पाडलं आहे.सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडीच्या जिल्हापरिषद शाळेतील प्राथमिक शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी.
कालपासून सोशल मिडियात अचानक रणजितसिंह डिसले हे नाव सर्च व्हायला लागलं
आणि दुसरीकडे शुभेच्छांचा पाऊस सुरू झाला.रणजीतसिंह डिसले यांची कामगिरीही तशीच आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.तब्बल सात कोटी रुपयांचा हा पुरस्कार आहे.
ग्लोबल टीचर पुरस्कार
युनोस्को आणि लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी हा ग्लोबल टीचर पुरस्कार दिला जातो.
रणजितसिंह डिसले यांच्यासोबत आणखी दहा शिक्षकांची नामांकने या पुरस्कारासाठी होती.
त्या दहातून रणजीतसिंह डिसले यांची निवड झाली.
मात्र रणजीतसिंह यांनी पुरस्काराची रक्कम (सात कोटी) ही सर्व दहा शिक्षकांमध्ये समान वाटली.
आणि आणखी एक आदर्श घालून दिला.रणजीतसिंह यांच्यामते निवड झालेले दहा ही शिक्षक हे समान गुणवत्ता असणारे होते.
त्यामुळे विविध देशातील या शिक्षकांना या रकमेतून ते शिकवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही रक्कम वापरुन बदल घडवता येतील.
व्हर्च्युअल फील्ड ट्रीप
मुलांना शिक्षण मिळणं हा त्यांचा जन्मसिद्ध अधिकार आहे असं रणजीतसिंह डिसले मानतात.कोरोनाच्या काळात जगभरात शिक्षण क्षेत्रातही अडथळे आले. त्यावर अनेक लोक वेगवेगळ्याप्रकारे मात करत आहेत.रणजीतसिंह यांनीही यावर एक तोडगा काढला. Q R आपण सगळेच स्कॅन करतो,ऑनलाईन खरेदी करताना,किंवा ऑनलाईन वस्तू,गोष्टी विकत घेताना,तर असेच एकदा त्यानाही QR कोड स्कॅन करताना हे लक्षात आलं की ही पद्धत आपण शिक्षण क्षेत्रातही आणू शकतो,त्यांनी लगेच एक QR कोड तयार केला आणि त्यातून कविता धडे डाउनलोड करण्यासाठी मुलांना समजावलं.या अभिनव कल्पकेतला हा पुरस्कार मिळाला आहे.परंतु ही एकच बाब ग्राह्य धरलेली नाही.रणजीतसिंह गेली अकरा वर्षे या क्षेत्रात काम करत आहेत.2009 पासून ते प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहेत.
अशांत देशातील मुलांचे गट बनवून त्यांना शिक्षण देत आहेत.त्यांना शिक्षण,विज्ञान यांची गोडी लागावी म्हणूनही ते काम करतात.
“व्हर्च्युअल फील्ड ट्रीप” या शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून 87 देशातील
300 हून अधिक शाळांतील मुलांना शिकवण्याचे काम ते करत आहेत.
व्हर्च्युअल फील्ड ट्रीप सोबत गुगल, मायक्रोसॉफ्ट,ब्रिटिश कौन्सिल,प्लीपग्रिड, प्लीकेर्स यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थासोबत ते कार्यरत आहेत.
लेट्स क्रॉस दी बॉर्डर
गेल्या 9 वर्षात त्यांना 12 आंतरराष्ट्रीय आणि 7 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.तसेच 12 शैक्षणिक पेटंट सुद्धा त्यांच्या नावावर आहेत.मायक्रोसॉफ्टचे मुख्यकार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांच्या कार्याचा गौरव करणारी “हीट रिफ्रेश” अशी एक चित्रफीत तयार केलीय.हा मान मिळवणारे देखिल जागतिक पातळीवरील ते पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.एकूणच रणजीतसिंह यांचा हा प्रवास थक्क करणारा असाच आहे.
या घटनेत फक्त सोलापूरकरांचा गौरव नाही,तर देशाचाही गौरव आहे,याशिवाय सरकारी शाळा,सरकारी शाळेतील शिक्षक यांच्याप्रती निर्माण झालेला हा आदर सन्मान सुद्धा एक जमेची बाजू आहे.शिक्षक विद्यार्थी घडवतात असं म्हणतात.सुधृढ निरोगी विचार करणारा विवेकशील समाज शिक्षकच निर्माण करत असतात.रणजीतसिंह त्यातही फार मोठी कामगिरी करत आहेत.फक्त देशच नाहीतर विदेशातील देशांतही ते नवीन पिढी घडवत आहेत.”लेट्स क्रॉस दी बॉर्डर” हा त्यांच्या त्यापैकी एक उपक्रम. रणजीत सिंह यांना टीम जागल्या भारत कडून विशेष कौतुक आणि पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा !
हेही वाचा.. सेव्ह मेरिटवाल्यांना SC विद्यार्थ्यांची चपराक
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)