बुद्ध पौर्णिमेच्या आपणास, आपल्या कुटुंबास आणि मित्रपरिवारास मनःपूर्वक सदिच्छा.
भगवान बुद्धांनी आपल्या जीवनातं अनेक प्रवचन दिली.ज्ञानप्राप्ती नंतर सारनाथ येथ पंचवर्गीय भिक्खूना दिलेल्या पहिल्या प्रवचनापासून ते महापरिनिर्वाणा आधी भन्ते आनंदला दिलेल्या शेवटच्या प्रवचना पर्यंत भगवान बुद्धांच्या प्रवचनाची संख्या लाखोंच्या असेल.गाथांच्या स्वरूपातील त्या प्रवचनाचे संपादन त्रिपिटकात करण्यात आलेले आहे.
मुक्ती कोण पथें
सर्वसामान्य माणसाला धम्म समजण्यास मदत व्हावी आणि जागतिक स्तरावर भगवान बुद्धांच्या धम्माबाबत नव्याने चर्चा व्हावी म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या निर्वाणाआधी “बुद्ध आणि त्यांचा धम्म” हा ग्रंथ लिहिला.दुर्दैवाने तो ग्रंथ बाबासाहेबांच्या ह्यातीत प्रकाशित होऊ शकला नाही. बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर हा ग्रंथ संपादित करून प्रकाशित करण्यात आला.सामान्य बौद्ध उपासकाने हा ग्रंथ वाचून त्यावर चिंतन, मनन केले तरी धम्माचा मूलभूत गाभा समजेल याबाबत शंका नाही.
माझ्या दृष्टीने भगवान बुद्धांचा हजारो उपदेशांपैकी सर्वात महत्वाचे दोन उपदेश किंवा प्रवचन म्हणजे कलामसुत्त आणि भन्ते आनंद सोबत झालेला शेवटचा भगवान बुद्धांचा संवाद फार महत्वाचे आहेत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुक्ती कोण पथें या ऐतिहासिक या भाषणातून घेतलेला भन्ते आनंद व भगवान बुद्ध यांच्यातील संवादाचा उतारा खाली देत आहे.
दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका
एकदा भगवान बुद्ध नुकतेच आजारतून थोडे बरे झाल्यामुळे विहाराच्या छायेत पसरलेल्या आसनावर बसलेले असताना त्यांचा शिष्य आयुष्यमान आनंद भगवंतांकडे येऊन त्यांना अभिवादन करून एके बाजूस बसला आणि म्हणाला “भगवंतास मी सुखात असताना पाहिले आहे व आजारात असताना पाहीले आहे. भगवंतांच्या आजारामुळे माझे शरीर शिशा जड झाले आहे. मला दिशाभ्रम झाला आहे. मला धर्मही सुचत नाही, परंतु त्यातल्या त्यात मला एवढे समाधान वाटते की भिक्षुसंघविषयी काहीतरी सांगितल्या शिवाय भगवंतांचे परिनिर्वाण व्हायचे नाही” भगवान बुद्धांनी उत्तर दिले “आनंदा! भिक्षुसंघास मजपासून काय हवे आहे? आनंदा मी आत बाहेर काहीही न ठेवता धर्मोपदेश केलेला आहे. त्यात तथागताने आचार्यसुप्ती मुळीच ठेवली नाही. तर मग आनंदा तथागत भिक्षुसंघाविषयी काय सांगणार आहे? तेव्हा आनंदा तुम्ही सुर्याप्रमाणे प्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशीत राहू नका! स्वतःवरच विश्वास ठेवा! दुसऱ्या कोणासही अंकित होऊ नका! सत्याला धरून रहा! सत्याचाच आश्रय करा! व दुसऱ्या कोणाला शरण जाऊ नका!
कालामसुत्तात
मित्रांनो एकीकडे मला शरण या म्हणजे तुमचे दुःख, दैन्य दूर होईल असे सांगणारे बुवा, महाराज आहेत
तर दुसरीकडे तर कोणलाही शरण न जाता स्वतःच स्वतःचा आधार व्हा
असे सांगणारे भगवान बुद्ध सामान्य माणसात आत्मविश्वास निर्माण करून त्याला खऱ्या अर्थाने मुक्त करतात.
ईतर धर्मसंस्थपाक, बुवा, महाराजआपल्या उपासकांना केवळ माझ्यावर विश्वास ठेवा, मी सांगतो तेच अंतिम सत्य समजा असे सांगतात पण भगवान बुद्ध आपल्या उपासकांना कालामसुत्तात उपदेश देतात कि केवळ पूर्वजांनी सांगितले, धर्मग्रंथात लिहिले, परंपरा आहे, साधू संतांनी सांगितले म्हणून एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेऊ नका तर तर्काच्या विवेकाच्या कसोटीवर एखादी गोष्ट स्वतःच्या बुद्धीला पटली आणि जर ती गोष्ट तुमच्या व इतरांच्या सुद्धा भल्याची असेल तरच स्वीकारा.
वरील उपदेशातून भगवान बुद्ध मानवाला खऱ्या अर्थाने बौद्धिक दृष्ट्या स्वतंत्र करतात, मानवाला समाजाचा एक कल्याणकारी घटक बनवतात आणि म्हणूनच भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म इतर धम्माच्या आणि धर्म संस्थपकांपेक्षा वेगळे ठरतात.
ज्याचा आदी, अंत, आणि मध्य कल्याणकारी आहे, सुखकारक आहे अश्या धम्म जगाला देणाऱ्या शाक्यमुनी भगवान बुद्धांना वंदन.
नमो बुध्दाय!
हेही वाचा… माझा सहोदर सखा वाट्याडा बुध्द
हेही वाचा… सिद्धार्थ यशोधरेला सोडून गेला होता का ?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
Comments 1