महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने रुढी-परंपराना कालसुसंगत पर्याय देत उपक्रम राबवित असते.
नवरात्री दरम्यान गरबा नृत्याचं तरूणाईला आकर्षण असते. अश्या कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रबोधन व्हावे, परिवर्तन व्हावे तसेच समता हे मूल्य विचारात घेऊन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने ‘गरबा समतेचा’ हा उपक्रम साने गुरुजी विद्यालय, दादर मुंबई येथे पार पडला.
‘गरबा समतेचा’ अंधश्रद्धा निर्मूलन समिती चा अनोखा उपक्रम
विविध जाती, धर्म व वेगवेगळ्या लैंगिकतेच्या व्यक्ती गरबामध्ये सहभागी झाले. समतेच्या विचारांना गृहीत धरून मासिक पाळी, स्त्री-पुरुष समानता, रूढी-परंपरा यांमुळे स्त्रियांवर होणारे अन्याय या विषयांवर पोस्टर तयार करण्यात आले होते. डेंजर बॉक्स पुस्तकाचे लेखक महेंद्र नाईक यांनी पोस्टरसाठी मजकूर लिहिला होता. विशेषत गरबा नृत्यासाठी अं.नि.स कार्यकर्ते अनिल करवीर आणि सीमा माने यांनी रचलेली गाणी सादर करण्यात आली.
शॉर्ट फिल्म आणि वेबसिरिजमध्ये काम करणारे एल.जी.बी.टी.आय.क्यू.ए समुदायासाठी सामाजिक कार्य करणारे कलाकार विकी शिंदे आणि मुंबई समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी मोलाचे योगदान देणारे समाजसेवक जय शृंगारपुरे उपस्थित होते. यांच्या कार्याचा सन्मान म्हणून अं.नि.सच्या वतीने सन्मान करण्यात आला. अं.नि.स. शाखा कुर्ला, घाटकोपर, दादर, आणि दहिसर या शाखांच्या एकत्रित नियोजनाने आणि साने गुरुजी विद्यालयाचे सचिव मोहन मोहाडीकर यांच्या सहकार्याने कार्यक्रम मोठ्या संख्येत यशस्वी पार पडला.
आजची दीक्षाभूमी नागपूर बौद्ध समाजाला कशी मिळाली? जाणून घ्या
धर्मांतराने काय मिळाले आणि काय मिळवले?
धम्मचक्र प्रवर्तन दिन, १४ ऑक्टोबर की विजयादशमी ?
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 04,2022, 15:45 PM
WebTitle – Garba Equality A unique initiative of the Andhshraddha nirmulan samiti