‘ई’ विभागाच्या माध्यमातून महापरिवर्तनदिनी मोफत अल्पोपहार ..
मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक अखंड भारताचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिका ‘ई’ विभागाच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशभरातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांना ३५ हजार कांदे पोहे प्लेट अन् ५ हजार पार्ले जी बिस्कीटांचे वाटप करण्यात आले. झोन – 1चे तत्कालीन उप आयुक्त एस. एस. शिंदे यांच्या सहकार्य आणि प्रेरणेतून सुरु झालेला हा स्त्युत्य उपक्रम, ‘ई’ विभागातील कामगार, कर्मचारी, अधिकारी गेली २० वर्षे राबवित आहेत. ५ डिसेंबर २०१७ रोजी ओखी वादळामुळे आलेल्या आकस्मिक पावसामुळे महापालिकांच्या शाळांमध्ये आश्रय घेतलेल्या अनुयायांसाठी दोन दिवस भोजनाचीही व्यवस्था करुन दिली होती.
महापरिवर्तनदिनी भोजन, अल्पोपहाराबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत महाप्रलयकाळी पावसांने हाहाकार माजवल्यांने कोकणातील महाड, चिपळूण, खेड भागात पुरामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली होती. अशा ओढवलेल्या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी अनेक मदतीचे आले, त्यावेळी ई विभागाच्या माध्यमातून २०० पुरग्रस्त विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, कंपास बॉक्स, वह्या, पेन, पेन्सिल बॉक्स, कापडी मास्क इत्यादी शालोपयोगी साहित्याचे त्या ठिकाणी जाऊन वाटप करण्यात आले होते. यावर्षी मुंबई काँग्रेस अध्यक्षा आमदार वर्षाताई गायकवाड,
दैनिक सार्वभौम राष्ट्र’चे प्रतिनिधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान दादर येथील अल्पोपहाराच्या स्टॉलला भेट देऊन
‘ई’ विभागाच्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. सदर उपक्रमात माजी कार्यकारी अभियंता संजय गायकवाड,
संजय मोरे, मिलिंद सपकाळ, दिपक शिवगण, सुगत पडेलकर, केशव चाफे, के.डी. पवार, युसूफ चौघुले,
सोनावणे सर, रविंद्र घाटगे, विजय मानकर, श्रीम. यादव, श्रीम. पिसाळ, श्रीम. मिराशी,
श्रीम. मुणगेकर मॅडम अशा अनेक आजी माजी कामगार, कर्मचारी, अधिकारी यांचे योगदान मिळत आहे.
मिलिंद चिंचवलकर
लेखक,आंबेडकरी चळवळ अभ्यासक,कार्यकर्ता
संविधान दिन : सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on DEC 07,2023 | 21:038 PM
WebTitle – Free refreshments on Mahaparivartan Day through ‘E’ section