कायम वादग्रस्त आणि अतार्किक विधाने करून करून चर्चेत राहणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील नटी जीला नुकतेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करून उपकृत करण्यात आले त्या कंगना राणावत ने देशाच्या स्वातंत्र्याबाबत केलेल्या वक्तव्यावरुन गदारोळ झाला होता. या विधानावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. त्याचवेळी भाजप च्या एका माजी आमदाराने बिहारमधील सहरसा येथे कंगना राणावत च्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. तुम्हाला हे सांगावे लागले की या आमदारांनी कंगनावर संताप व्यक्त करताना म्हटलंय की तीने देशाची चेष्टा लावली आहे.
देशाची थट्टा केली जात आहे
सोनबरसा सहरसा जिल्ह्यातील भाजप चे माजी आमदार किशोर कुमार मुन्ना यांनी कंगना राणावत च्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, “आज देशाची थट्टा केली जात आहे. जात, धर्माच्या नावावर कुणी काहीही बोलून जातो. कंगनाच्या स्वातंत्र्याच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, कंगनाच्या वक्तव्यामुळे देशाची एकता, अखंडता आणि सार्वभौमत्व धोक्यात आले आहे. 1947 साली देशाला स्वातंत्र्य मिळाले.त्याला आव्हान देणे हे दिवाळखोर मानसिकतेचे उदाहरण आहे.
ते म्हणाले की, 2014 पासून एक ट्रेंड सुरू झाला आहे की, कोणाचे मन आये बोलतो. देशद्रोहाची चर्चा, देश तोडण्याची चर्चा, जात, धर्माची चर्चा केली जात आहे. ते देशासाठी धोकादायक आहे. त्यामुळे या प्रकरणाबाबत आम्ही मुख्य न्यायदंडाधिकारी यांना अर्ज दिला आहे.
त्याचवेळी किशोर कुमार मुन्ना यांच्याशिवाय जयपूरमधील एका काँग्रेस नेत्यानेही वैशाली नगर पोलीस ठाण्यात कंगनाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. कंगना राणौतच्या वक्तव्यामुळे आपल्या देशाच्या संविधानाचा आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
स्वातंत्र्य भीक म्हणून दिले तर ते स्वातंत्र्य ठरते का? भारताला खरे स्वातंत्र्य हे २०१४ ला मिळाले,
असं वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने केले होते.ज्यामुळे अनेक देशप्रेमी नागरिकांना वाईट वाटून दु:ख झालं.
कंगना कडून न्यायाधीश बदलण्याची मागणी, न्यायाधीशांवर गंभीर आरोप
जयभीम चित्रपट वाद: हीरो सूर्याला मारण्याची धमकी;पोलिस तैनात
पोचिराम कांबळे : एका नामांतर शहिदाची अस्वस्थ कहाणी..!
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 18, 2021 16:30 PM
WebTitle – Former BJP MLA files case against Kangana Ranaut