कागल : शिक्षणा संबंधी जनजागरणासाठी पहिली शिक्षण महापरिषद कागलमध्ये- आज समाजापुढे अनेक समस्या आहेत आणि भ. बुद्धांपासुन संत चळवळ ते आधुनिक काळातील म. फुले, ज्ञानाई सावित्रीमाई फुले, छ. शाहू महाराज, डॉ॰ बाबसाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत सर्वांनी ‘अविद्या’ हे सर्व दु:खाचे कारण असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे भारतीय बहुजन समाजाने शिक्षणाकडे आधुनिक काळात लक्ष्य देण्यास सुरु केले व त्यामुळे ते बौद्धिकतेसोबत आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या मजबूत होऊन आपल्या संवैधानिक अधिकारांप्रति सतर्क झाले आणि कांही मोक्याच्या आणि माऱ्याच्या जागा मिळवू लागल्याने संविधानविरोधी शक्तींनी पुन्हा षडयंत्र रचायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरण हे त्या षडयंत्राचाच एक भाग असल्याने त्याबद्दल समाजात जागरूकता निर्माण करणे काळाची गरज बनली आहे.
शिक्षणा संबंधी जनजागरणासाठी पहिली शिक्षण महापरिषद कागलमध्ये
त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेने भूमिका घेण्याचे ठरवून राज्यभर हे जनजागरण करण्याचा कृतिकार्यक्रम
हाती घेतला असून ‘०७ नोव्हेंबर भारतीय विद्यार्थी दिन, २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन
व २८ नोव्हेंबर म. फुले स्मृतीदिन-भारतीय शिक्षक दिन’ या दिवसांचे औचित्य साधुन त्याची सुरुवात
कागल जि. कोल्हापूर येथील गहिनीनाथनगर येथे डॉ॰ बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालय/वाचनालय हॉलमध्ये
‘पहिली शिक्षण महापरिषद’ रविवार दि. २७ नोव्हेंबर, २०२२ रोजी सकाळी १० ते सायं. ०५ या वेळेत होणार आहे.
या परिषदचे स्वागताध्यक्ष म्हणून २२ राज्यस्तरिय व्यसनमुक्तीदूत पुरस्कार विजेते
मा. उत्तम कांबळे सर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
तर उद्घाटक माजी शिक्षण व ग्रामविकास मंत्री मा. हसनसो मुश्रिफ असणार आहेत.
कार्यक्रमामध्ये प्रमुख वक्ते म्हणून मा. प्राचार्य राजेंद्र कुंभार यांचे ‘बौद्धिक गुलामीचे षडयंत्र नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावर
तर कॉ. धनाजी गुरव यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षक, पालक, विद्यार्थी यांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्याने होणार आहेत.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मा. नविदसो मुश्रीफ (संचालक, गोकुळ दूध संघ ),
मा. भैय्यासो माने (संचालक, के. डी. सी. सी.), मा. जी. बी. कमळकर (गट शिक्षणाधिकारी, कागल),
मा. डी. के. अहिरे आण्णा (संस्थापक, समता शि. प. नाशिक),
शिक्षणा संबंधी जनजागरणासाठी पहिली शिक्षण महापरिषद कागलमध्ये
मा. राजेंद्र गायकवाड (राज्याध्यक्ष, समता शि. प. नाशिक), मा. एकनाथ आंबोकर (जिल्हा शिक्षणाधिकारी माध्यमिक), मा. मधुकर कदम (राज्य नेते स. शि. प. अहमदनगर), मा. प्रकाशसो गाडेकर (माजी नगराध्यक्ष), मा. डॉ. योगेश साळे (जिल्हा आरोग्य अधिकारी), मा. शिवाजी कांबळे (तालुकाध्यक्ष काँग्रेस आय. कागल), मा. प्रतापराव जाधव (शहराध्यक्ष, काँग्रेस आय. हुपरी), मा. प्रा. रणजितसिंह भोसले (प.म. महासचिव पीआरपी), मा. इंजि. बापूसाहेब राजहंस (जिल्हाध्यक्ष यु.बौ.ध.प. कोल्हापूर),
मा. प्रा. डॉ. संजय साठे (विद्रोही सांस्कृतिक चळवळ), मा. शफिक देसाई (विद्रोही सांस्कृतिक चळवळ), मा. सादिक शेख (अध्यक्ष, समर्थ सोशल फौंडेशन), मा.महावीर माने (माजी शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य), मा. नेमचंद शितोळे (माजी शिक्षण सहसंचालक, म.रा.), मा. एम. जी. चिखलीकर (माजी शिक्षणाधिकारी), मा. एम. टी. कांबळे (माजी शि. वि. अधिकारी), मा. प्रा. रविदास पाडवी (को.जि.आ.ई. आदिवासी ए. फेडरेशन), मा. पी. टी. कांबळे सर (कर्ना. राज्याध्यक्ष, समता सैनिक दल),
शिक्षणा संबंधी जनजागरणासाठी पहिली शिक्षण महापरिषद कागलमध्ये
A मा. भरत शिरसाट (माध्य. राज्याध्यक्ष स. शि. जळगाव), मा. डॉ. संजय कांबळे (य.च.के.एम.सी. कॉलेज कोल्हापुर), मा. किशोर माणकापुरे (जिल्हा कोषाध्यक्ष, बामसेफ कोल्हापूर), मा. सदानंद भोसले (राज्य नेते स.शि.प. कोल्हापूर), मा. आनंदराव आकुर्डेकर (शिक्षणविस्तार अधिकारी), मा. शांताराम जोगळेकर (जि.दै. शिक्षणाधिकारी चिक्कोडी), मा. सुभाष मस्के (जिलाध्यक्ष समता शि. प. जालना), मा. अविनाश पाटोळे (जिल्हाध्यक्ष, संघर्ष बहुजन सेना), मा. प्रा. डॉ. किशोर खिलारे (राज्यसमन्वयक प्रा.भ.ल.आ.) मा. अनुप्रिया कदम (विद्रोही सांस्कृतिक चळवळ ), मा. सुरेश सोनगेकर (संचालक, शिक्षक बँक कोल्हापूर),
B मा. डॉ. प्रशांत नागांवकर (विद्रोही सांस्कृतिक चळवळ) मा. किरण घुगरे (राजर्षी राज प्रोड्युसर कंपनी कागल), मा. राहुल कांबळे (बौद्ध समन्वय समिती, कोल्हापूर) व प्रमुख उपस्थिती मा. संतोष गवई (राज्य महासचिव, बुलढाणा), मा. सतीश भारतवासी (राज्यसचिव, यु.बौ.ध.प.), मा. भाऊसाहेब अहिरे (राज्यकोषाध्यक्ष नाशिक), मा. सतिलाल शिरसाठ (राज्य सहसचिव स.शि.प.), मा. संतु कांबळे (अध्यक्ष, चंदगड), मा. भास्कर कांबळे (माजी केंद्र प्रमुख), मा. प्रा. राहूल भास्कर (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. प्रा. चारुशिला तासगावे (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. प्रा. सौरभ पाटणकर (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन),
C मा. प्रा. प्रविणकुमार कांबळे (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. प्रा. डॉ. तृप्ती थोरात (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. प्रा. डॉ. उज्वला बिरजे (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. प्रा. डॉ. पूनम रजपूत (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. प्रा. डॉ. प्रकाश नाईक (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. प्रा. अमोल महापुरे (प्राध्या. भरती लक्ष्यार्थ आंदोलन), मा. सुखदेव आवारे (जिल्हा सचिव जालना), मा. श्रीकांत मिठारे (माजी मुख्याध्यापक), मा. तानाजी कांबळे (माजी बँक कर्मचारी),
D मा. ए. के. कांबळे (माजी मुख्याध्यापक) मा. वसंत खाडेकर (माजी मुख्याध्यापक), मा. शरद कानडे (हाय. मुख्याध्यापक), मा. बी. एच. माने (माजी मुख्याध्यापक), मा. प्रा. विशाल कुरणे (प्रा.भ.ल.आ.), मा. राणोजी ठोंबरे (ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काँग्रेस), मा. सुनिल शेवाळे (निपाणी तालुकाध्यक्ष एस.सी.एस.टी.शि.सं), मा. विजय दिवाण (माजी शि.वि. अधिकारी), मा. परशराम किर्तीकर (ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी), मा. नितीन कानडे (कार्यकर्ते यु.बौ.ध.प.), मा. बी. आर. कांबळे सर, मा. आनंदा राणे (माजी केंद्र प्रमुख),
पत्रकार मा. प्रकाश कांबळे, मा. कृष्णा कांबळे (ता. संघटक यु.बौ.ध.प. शिरोळ), मा. निलाप्पा ऐवाळे (माजी मुख्याध्यापक), मा. पंकज खोत (विद्रोही विद्यार्थी संघटना), मा. विजय पोवार (मुख्याध्यापक) असून कार्यक्रमाच्या संयोजनासाठी प्रा. डॉ. प्रभुदास खाबडे, मा.शंकर गावित, मा. प्रदिप कांबळे, प्रा. डॉ. संतोष भोसले, मा. गौतम कांबळे, मा. शुभम सावंत, मा. अमित कांबळे सर, मा. चैतन्य श्रीसागर, मा. सदानंद कृष्णात हेगडे, मा. विक्रम सामंत (केंबळी), मा. प्रदिप सातपुते, मा. वैभव कांबळे (आणूर),
मा. अमर सोनावणे, मा. प्रिया बसे, मा. अजित इंगले, मा. अनिता गवळी, मा. मुक्ताताई भास्कर,
मा. अश्विनी कांबळे, मा. पूजा कानडे आदिंनी मेहनत घेतली आहे, अशी माहिती
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक व महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेचे राज्यकार्याध्यक्ष प्रा. किरण भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
शिक्षण महापरिषदेला विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राध्यापक व शिक्षणप्रेमी यांनी
मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकात करण्यात आले आहे.
पुन्हा सुटकेस कांड : आयुषी चौधरी चा खून करून शव सुटकेस मध्ये फेकलं
hraddha Murder Case दोन दिवस मृतदेहाचे तुकडे करत होता आफताब, श्रद्धा मर्डर केस
बजरंग दल चा नेता,टोल भरण्यास नकार, पत्नीची केस ओढत भर रस्त्यात मारहाण
VIDEO : गुजरात मध्ये केबल पूल कोसळला 400 लोक पाण्यात,काही लटकले
समान नागरी संहिता म्हणजे काय? गुजरात मध्ये समिती स्थापन करण्यास मान्यता
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on NOV 23,2022, 08:40 AM
WebTitle – First Education Mahaparishad in Kagal for public awareness about education – Prof. Kiran Bhosle