कोल्हापुरातील बिंंदू चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक ऐतिहासिक अर्धाकृती पुतळा आहे.हा पुतळा आजच्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर 1950 मध्ये बसवला गेला.त्याचं आणखी एक विशेष कारण हे की हा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हयातीत असताना उभारला गेला.महापुरुष थोर समाज सुधारक यांचे पुतळे मृत्यूनंतर उभारण्याची प्रथा जगात आहे.
मात्र डॉ.आंबेडकरांचा पुतळा त्यांच्या अनुयायाकडून हयातीतच उभारला गेला.हे एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल.अन तो उभारला गेला एका मराठा समाजातील सत्यशोधक चळवळीतून तयार झालेल्या विचारवंतांकडून माधवराव खंडेराव बागल हे त्यांचं नाव.त्यांना लोक भाई बागल म्हणून सुद्धा ओळखत असत.
सामाजिक कार्यकर्ते भाई माधवराव बागल हे या पुतळा समितीचे अध्यक्ष होते.शिल्पकार बाळ चव्हाण यांनी हा पुतळा बनवला आहे.तत्कालीन नगराध्यक्ष द़ मा़ साळोेखे यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ डिसेंबर १९५० ला हजारो लोकांच्या उपस्थितीत या पुतळ्याचे अनावरण केले गेले.या कार्यक्रमाला कुणीही मोठा नेता पुढारी किंवा वक्ता यांच्या हस्ते उद्घाटन न करता सामान्य लोकांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले.आज या घटनेला 70 वर्षे पूर्ण झाली.
भाई बागल यांचे प्राथमिक शिक्षण कोल्हापुरातील राजाराम हायस्कूल येथे झाले आणि नंतर त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, मुंबई येथून चित्रकला, मॉडेलिंग आणि म्युरल सजावट असा अभ्यासक्रम पूर्ण केला. महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने आणि कार्याने बागल प्रभावित झाले होते फुले, आंबेडकरांपासून तरुणांना या शाहूनगरीत सतत स्फूर्ती मिळाली पाहिजे असा त्यांचा उद्देश होता. यासाठी त्यांनी बिंदू चौकात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ब्राँझचे पुतळे करून घेतले.
भाई बागल हे कृतीशील पुरोगामी होते. शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा खऱ्या अर्थाने वारसा चालवत होते. त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातही भाग घेतला होता,त्यात त्यांची महत्वाची भूमिका राहिली आहे.कर्मकांड बुवाबाजी अंधश्रद्धा आणि जातीयवाद याच्या विरोधात भाईंनी मोठे काम केले.
देशभरातील तमाम आंबेडकरवाद्यांसाठी कोल्हापुरातील बिंदू चौक
आणि मराठा समाजातील व्यक्तीकडून उभारण्यात आलेला हा डॉ.आंबेडकरांचा पुतळा
हे आदराचे आणि महत्त्वपूर्ण ठिकाण बनले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी या पुतळ्याला स्वत: भेट दिलेली आहे.
१७ ऑक्टोबर १९६० रोजी या चौकात दोन्ही पुतळ्यांच्या मध्यभागी हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला,
ज्यावर भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील २० हुतात्म्यांची नावे कोरलेली आहेत.
दरवर्षी अनेक आंबेडकरवादी लोक कोल्हापुरातील माणगाव आणि बिंदू चौक या स्थळांना भेटी देतात.
विविध सार्वजनिक व सामाजिक सभांचे आयोजन या ठिकाणी होत असते.
आद. भाई माधवराव बागल यांच्यासारखे लोक समाजासाठी एक दीपस्तंभ म्हणून कायम प्रेरणा देत असतात.त्यांच्या कार्यास नमन!
-
टीम जागल्या भारत
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. ON RECORD: डॉ. आंबेडकरांच्या संविधान निर्मिती योगदानाबद्दल
कॅनडामध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
(वाचक हो.. आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा, ताज्या अपडेट्स मिळवा,आपल्या मित्रांना सांगा.)
First Published on December 9, 2020 13 : 54 PM
WebTitle – first-ambedkar-statue-in-the-world-built by Maratha 2020-12-09