मुंबई, 23 जून : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांनी बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना इतरांना मुंबईत परतण्याची 24 तासांची मुदत दिली होती,मात्र एकनाथ शिंदे यांनी आता उशीर झाल्याचे सूचक विधान केले होते,या पार्श्वभूमीवर त्यांचा एक व्हिडीओ (Eknath Shinde Video Viral) समोर आला आहे. यात एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तबच केले असल्याचे दिसून येत आहे.. या व्हिडिओ मध्ये ते आमदारांशी संवाद साधताना दिसत आहेत. याशिवाय एका आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असल्याचंही सांगितलं आहे.
शिवसेनेने महाविकास आघाडीतून बाहेर पडावे अशी आमदारांची इच्छा असेल तर आमदारांनी 24 तासांत मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासमोर उपस्थित राहून चर्चा करावी असे आवाहन शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले होते. बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार होईल. मात्र, त्याआधी तुम्ही मुंबईत येण्याची हिंमत दाखवावी असे आवाहन राऊत यांनी त्यांना केले होते.मात्र एकनाथ शिंदे यांनी आता गाडी खूप पुढे निघून गेली अशाप्रकारचे विधान केले होते.त्यामुळे एकनाथ शिंदे हे आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत हे स्पष्ट झालं होतं
आता त्यांच्या पुढील वाटचालीचा एक व्हिडिओच समोर आल्याने सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत.
video मध्ये काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
– भाजपही महाशक्ती आहे.
– भाजपने पाकिस्तानला धडा शिकवलाय.
– भाजप एक राष्ट्रीय पक्ष आहे.
– त्यांनी मला सांगितलं की,हा निर्णय ऐतिहासिक आहे.
– काही लागलं तर ते आपल्याला कमी करणार नाही.
बंडामागे भाजप असल्याचं दिसत नाही – अजित पवार
एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप असल्याचं अजून तरी दिसत नाही, असं वक्तव्य महराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
शिंदेंच्या मागे भाजपच, अजित पवारांना त्याची माहिती नाही – शरद पवार
अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्या बंडामागे भाजप नसल्याचं अजित पवारांनी सांगितलं. अजित पवारांना इथली स्थानिक माहिती आहे, पण गुजरात आणि आसाममधील परिस्थिती आम्हाला जास्त माहित आहे.”
खरतर वरील व्हिडिओ मध्ये स्वत: एकनाथ शिंदे यांनीच भाजपचे नाव घेऊन या मुद्याला पूर्णविराम दिलेला आहे.
यामागे भाजप असल्याचे स्पष्ट झालेय.मात्र दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवक्ते अतुल भातखळकर यांनीही यात भाजप असल्याचा इन्कार केला होता.
राज्यातील राजकीय पेच सुप्रीम कोर्टात
महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या राजकीय कोंडीच्या (Maharashtra Political Crises) पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या जया ठाकूर (Jaya Thakur) यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राजीनामा दिलेल्या किंवा विधानसभेतून अपात्र ठरलेल्या आमदारांना निवडणूक लढवण्यास पाच वर्षांची बंदी घालावी, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. जया ठाकूर यांनी याचिकेत मागणी केली आहे की, महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट पाहता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
शिवसेना आमदार सूरत वरून पळाला,बेशुद्ध करण्यासाठी मला इंजेक्शन दिलं
400 हून अधिक सीए चिनी कंपन्यांना मदत करत होते,कारवाई ची तयारी
Samrat Prithviraj Review : प्रेक्षकांनी टॅक्स फ्री सम्राट पृथ्वीराज का नाकारला?
शिवाजी महाराज यांच्यावरील चित्रपट यामुळे पुढे ढकलला – नागराज मंजुळे
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JUNE 23 2022, 20:45 PM
WebTitle – Video finally-eknath-shinde-came-up-with-a-new-plan-new-video-release