केंद्रातील भाजप सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब-हरयाणातील शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले आहेत. गुरुवारी सकाळी दिल्ली-हरयाणा सीमेवर अंबालाजवळ मोठ्या प्रमाणावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी दिल्ली पोलिसांकडून शेतकरी आंदोलकांवर पाण्याचे फवारे आणि अश्रुधुरांचा वापर केला. दुसरीकडे पोलिसांना विरोध करताना आंदोलकांनी बॅरिकेड्सवर दगडफेक केली. ते उखडून टाकण्याचा प्रयत्न केला.तर दुसरीकडे 25 कोटी सहभाग असलेल्या कामगारांचे आंदोलनही चिघळले आहे.नवीन कामगार व शेतकरी विरोधी कायद्यांच्या विरोधात देशव्यापी संपाचा एक भाग म्हणून पश्चिम बंगाल,ओडीसा येथे विविध ठिकाणी उग्र निदर्शने करण्यात आली.
दिल्ली पोलिसांकडून पाण्याचे फवारे, अश्रुधुराचा वापर
सरकारने हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला.पोलिस बळाचा वापर करत आंदोलक शेतकऱ्यांवर बोचऱ्या थंडीत तीव्र पाण्याचे फवारे मारून,तसेच अश्रु धूर आणि बॅरिकेट्स लावून आंदोलक शेतकऱ्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला गेला.
पोलिसांच्या कारवाईवर भाष्य करताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “शेतकरी केंद्राने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. हे कायदे मागे घेण्याऐवजी शांततेत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्यापासून रोखलं जात आहे. त्यांच्यावर पाण्याच्या तीव्र फवाऱ्यांचा वापर केला जात आहे. अशा प्रकारे शेतकऱ्यांवर अन्याय करणं योग्य नाही. शांततेत आंदोलन करणं हा त्यांचा संविधानिक अधिकार आहे.”
या आंदोलनामुळे देशभरात नागरिकांचे समर्थन शेतकरी आणि कामगार वर्गाला मिळताना दिसत आहे.
फॅक्ट चेक : शेतकरी आंदोलन म्हणून कॉँग्रेसने वापरले जूने फोटो ?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)