‘दिल्ली चलो’ आंदोलन करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांवर हरयाणा येथे दंगल आणि खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून भारतीय किसान युनियनचे राज्य प्रमुख गुरुनाम सिंग चारुनी यांच्यासह अनेकांचा त्यात समावेश आहे. त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे, खुनाचा प्रयत्न करणे, दंगल , कोरोना संसर्ग पसरवून लोकांचा जीव धोक्यात घालणे असे आरोप ठेवले आहेत.
दिल्ली चलो
२६ नोव्हेंबर रोजी कलम ३०७ (खुनाचा प्रयत्न), कलम १४७ (दंगल), कलम १४९ (बेकायदा एकत्र येणे), कलम १८६ (सरकारी कामात अडथळा), कलम २६९ ( संसर्ग पसरवून लोकांचा जीव धोक्यात आणणे) या अन्वये शेतकऱ्यांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुसरीकडे तेलंगणा येथे योगी आदित्यनाथ यांची लोकांच्या प्रचंड गर्दीतील निवडणूक प्रचाराची रॅली निघाली आहे. या रॅलीवर कोणते गुन्हे दाखल झाले आहेत किंवा कसे हे समजलेले नाही.दरम्यान,शेतकऱ्यांच्या गर्दीवर कोविड संदर्भात टीव्हीवर प्रश्न विचारणाऱ्या महारथी कोरोना योद्धा आदित्यनाथ यांनाही हैद्राबादमध्ये कोरोना विरूद्ध कोणती मोहीम राबवत आहेत, असे प्रश्न विचारतील का? असा खोचक सवाल आपचे आमदार संजय सिंह यांनी विचारला आहे.
आंदोलक शेतकऱ्यांकडून दिल्लीतील जंतर-मंतर किंवा रामलीला मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळण्याची मागणी केली जात होती.
जवळपास ५ लाख आंदोलकांचा यात सहभाग असल्याचं शेतकरी संघटनांकडून सांगण्यात आलं.
अशात दिल्लीत दाखल झाल्याशिवाय आपण माघारी फिरणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता.
आपण करोनाच्या गाईडलाईन्सहीत इतर नियमांचं पालन करण्यास तयार असल्याचंही शेतकऱ्यांनी आश्वासन दिलंय.
निरंकारी मैदानातही मास्कसहीत सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू राहणार आहे.
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)