सिंघू बॉर्डरवर गेल्या दीड महिन्यांपासून शेतकऱ्यांचे विरोधातील काळ्या कायद्यांच्या विरोधात हाडे गोठविणाऱ्या थंडीत आंदोलन सुरू आहे.आतापर्यंत अनेक शेतकऱ्यांना या आंदोलनात आपल्या जीवाचे बलिदान द्यावे लागले आहे.भाजप सरकार यावर कोणताही तोडगा काढू शकलेले नाही.
सिंघू बॉर्डरवर दीड महिन्यांच्या या आंदोलनात काही शेतकरी कडक्याच्या थंडीमुळे मरण पावले तर काहींनी आत्महत्या केली.
3 जानेवारी रोजी टिक्री आणि कुंडली सीमेवर काम करणार्या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
पहिला मृत्यू टिक्री बॉर्डरवर झाला.येथे मृतक शेतकऱ्याची ओळख पटवण्यात आली असून त्यांचे नाव जुगबीर सिंह असे आहे.
दुसरीकडे कुंडलीच्या सीमेवर आणखी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला कुलबीर सिंग असे त्याचे नाव आहे.
दरम्यान,केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींदरम्यान झालेली आजची आठवी बैठकही आज निष्फळ ठरली.
या बैठकीनंतर तिन्ही कृषी कायदे रद्द होणार नाहीत.त्या व्यतिरिक्त इतर पर्याय असतील तर द्या, त्यावर विचार करू,
असं केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी सांगितलं.त्यामुळे शेतकरी आंदोलनाचा तिढा अद्यापही सुटताना दिसत नाही.
आज दुपारी 2 वाजता ही बैठक सुरू झाली. या बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मागणी लावून धरली. मात्र, केंद्र सरकारने या मागण्या धुडकावून लावल्याचं सूत्रांनी सांगितलं. या बैठकीनंतर कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याच्या व्यतिरिक्त शेतकरी संघटनांनी दुसरा पर्याय द्यावा. त्यावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत. पण तिन्ही कायदे रद्द करण्यात येणार नाही, असं स्पष्ट केलं.
फॅक्ट चेक : शेतकरी आंदोलन म्हणून कॉँग्रेसने वापरले जून फोटो ?
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)