नेहमी आपल्या उथळ आणि उन्मादी ट्विट आणि बडबडीने प्रसिद्धी मिळवणारी नटी कंगणा राणावत पुन्हा एकदा सडकून तोंडघशी पडली आहे.यावेळी तीने देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.तसेच या आंदोलनात सामील झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धेची शाहीन बाग दादी ची अपमानजनक संभावना करत खिल्ली उडवताना तिच्याबद्दल खोटी माहिती प्रसारित केल्याने सोशलमिडियात कंगणा राणावत चांगलीच ट्रोल झाली.या गोष्टीमुळे लोकांनी तीला चांगलीच फैलावर घेतली. लोकांच्या रोषामुळे आणि आपली चोरी पकडली गेल्यामुळे कंगणा राणावत ने ( kangana ranaut ) ते वादग्रस्त ट्विट डिलिट करून टाकलं.
हे दोन फोटो एकत्र करत कंगणा राणावत ने म्हटले की “हाहाहा ही तीच दादी आहे,जी टाइम मॅगझीन मध्ये सर्वात ताकदीची भारतीय म्हणून झळकली होती.शंभर रुपयांमध्ये ती उपलब्ध आहे. पाकिस्तानी पत्रकारांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रतिमा मलिन करण्यासाठी तिला भाडेतत्वावर घेतलं आहे.आपल्या लोकानी बोलण्याची गरज पाहिजे.”
कंगणाचं हे ट्विट नेहमीप्रमाणे आयटीसेल द्वारे प्रचंड वायरल केले गेले, शेतकरी आंदोलनाची हवा निघून जावी.
लोकांच्या मनात त्याविषयी तिरस्कार उत्पन्न व्हावा. आणि लोकानी अशा आंदोलनाला पाठिंबा देवू नये.
ही या लोकांची मोडस ऑपरेन्डी प्रत्येक आंदोलनात दिसून आली आहे.
मात्र यावेळी लोकानी संताप अनावर झाल्याने कंगणा राणावतला खडे बोल सुनावत ट्रोल केले.
तसेच अनेकांनी कानउघाडणी केली.त्यानंतर तीने गुपचुप ट्विट डिलिट करून टाकले.
सदर ट्विट वायरल झाल्यानंतर आमची टीम कामाला लागली.
आमच्या टीमने या फोटो मागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला,तेव्हा आम्हाला जी माहिती समजली ती अशी.
दावा –
फोटोमध्ये दिसणारी व्यक्ती (दादी ) ही शाहीन बाग (शाहीन बाग दादी ) मध्येही होती आणि तीच आताही शंभर रुपयांसाठी या आंदोलनात आलेली आहे.
आम्ही शोध घेतल्यानंतर आम्हाला काही फोटो मिळून आले.
त्याप्रमाणे शाहीनबाग येथील दादी आणि शेतकरी आंदोलनातील दादी या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे स्पष्ट झाले.
पहिल्या छायाचित्रातील दादीचे नाव मोहिंदर कौर असं असून त्या 73 वर्षांच्या आहेत.त्या शेतकरी आंदोलनात होत्या.तर दुसऱ्या फोटोतील दादी शाहीनबाग आंदोलनातील आहेत. त्यांचे नाव बिलकीस बानो असे असून त्या 82 वर्षांच्या असल्याची माहिती मिळत आहे.
याशिवाय,बिलकीस बानो यांनी आपण या आंदोलनात गेलो नाहीत,आपण कित्येक दिवस घराच्या बाहेरच पडले नसल्याचे त्यांनी काही प्रसारमाध्यमांना याबाबत विचारणा झाल्यावर सांगितले.तर मोहिंदर कौर यांनी कंगणाला कामधाम नसेल तर माझ्या शेतात कामाला यावं असा टोला लगावला आहे.त्यांचे पतीही संतापले असून कंगणाला काम नसेल तर आमच्या शेतात तिला मजूर म्हणून आम्ही कामाला ठेवू असा टोला त्यानीही लगावला आहे.
सदर फोटो पाहिले तरी या दोन वेगळ्या व्यक्ती असल्याचे लहान पोर सुद्धा सांगू शकते,
मात्र ज्याना विशिष्ट प्रपौगंडा चालवायचा असतो ते लोक खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे करण्याच्या धडपडीत असतात.
सत्य –
कंगणा राणावत यांच्या ट्विट मधिल दावा असत्य आहे.
VERIFICATION AND METHODOLOGY
आम्ही गुगलवर reverse-image search करून याचा शोध घेतला तसेच विविध प्रसारमाध्यमांच्या जुन्या नव्या बातम्या सुद्धा चाळणी लावण्यात आली असता यातील सत्य समजून आले.
याप्रकरणी आता कंगणा राणावत वर मानहानी चा दावा ठोकण्यात आला आहे.माफी मागण्यासाठी एक आठवड्याचा अवधी देण्यात आला असून जर माफी मागितली नाही तर पुढील कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलं आहे.यामुळे कंगणा राणावतच्या अडचणी आता वाढल्याचे दिसून येत आहे.
टीम जागल्या भारत
सिंघू टिकरी आणि गाझीपुर बॉर्डर परिसरातील इंटरनेट सेवा बंद
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)