Sharjeel Imam in Jamia Violence Case: जामिया हिंसाचार प्रकरणात शरजील इमाम: दिल्लीच्या प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयू) माजी विद्यार्थी शरजील इमाम यांना आज न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीच्या साकेत कोर्टाने शनिवारी शरजील इमाम आणि आसिफ इक्बाल तन्हा यांची देशद्रोह अंतर्गत लादलेल्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
या दोघांवर 2019 साली दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात हिंसाचार पसरवण्याचा आणि लोकांना भडकावल्याचा आरोप होता. शरजील इमाम आणि आसिफ इक्बाल तन्हा यांच्यावर दंगल आणि बेकायदेशीर संमेलनाशी संबंधित भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली आरोप ठेवण्यात आले होते. मात्र शनिवारी दिल्लीच्या साकेत न्यायालयाने दोघांनाही देशद्रोहाच्या खटल्यातून मुक्त केले. साकेत न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरुल वर्मा यांनी हा आदेश दिला आहे.
देशद्रोहाच्या आरोपातून निर्दोष सुटल्यानंतरही तुरुंगातच राहावे लागणार
देशद्रोहाच्या आरोपातून मुक्त झाला असला तरी, शर्जील इमामला अजूनही तुरुंगातच राहावे लागेल
कारण त्यांच्याविरोधात आणखी अनेक गुन्हे दाखल आहेत.
२०२० ईशान्य दिल्ली दंगलीशी संबंधित कट प्रकरणातही शरजील आरोपी आहे.
त्याच्याविरुद्ध बेकायदेशीर कृत्य (प्रतिबंध) करणे (यूएपीए) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शर्जील इमामवर अनेक खटले आहेत. ज्यांची स्वतंत्रपणे सुनावणी सुरू आहे.
दिल्ली पोलिसांनी शर्जील इमामविरुद्ध देशद्रोह आणि दंगलीचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या केस डायरीनुसार, नागरिकत्व कायद्याबाबत देशभरात निदर्शने होत असताना शरजील इमाम यांनी दिल्लीच्या जामिया परिसरात एका विशिष्ट समुदायाच्या लोकांमध्ये भावनिक भाषण केले.याशिवाय शरजीलने सोशल मीडियावर चिथावणीखोर वक्तव्येही केली असा आरोप ठेवण्यात आला होता. शरजीलच्या या वक्तव्यानंतरच दंगलीला हिंसक वळण लागल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. मात्र, कोर्टात झालेल्या सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांना यासंदर्भात ठोस पुरावे सादर करता आले नाहीत. अशा परिस्थितीत न्यायालयाने शरजीलला या प्रकरणात संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्त केले आहे.
बळीचा बकरा बनवले
कायदेविषक वृत्तसेवा livelaw ने दिलेल्या बातमीनुसार,2019 च्या जामिया हिंसाचार प्रकरणात शरजील इमाम, सफूरा जरगर, आसिफ इक्बाल तन्हा आणि इतर आठ जणांना दोषमुक्त करताना, दिल्ली न्यायालयाने शनिवारी अत्यंत महत्वाचं निरीक्षण नोंदवले की “या प्रकरणातील “खऱ्या गुन्हेगारांना” पकडण्यात पोलिसांना यश आले नाही आणि “त्यांनी (शरजील इमाम, सफूरा जरगर, आसिफ इक्बाल तन्हा) यांना बळीचा बकरा बनवले” . अतिरिक्त सत्र न्यायाधीश अरुल वर्मा यांनी निरीक्षण केले की पोलिसांनी निदर्शक जमावातील काही लोकांना आरोपी म्हणून आणि इतरांना पोलिस साक्षीदार म्हणून उभे करण्यासाठी “मनमानीपणे निवड” केली आहे. हे “चेरी पिकिंग” “cherry picking” निष्पक्षतेच्या नियमासाठी हानिकारक आहे, असेही न्यायालयाने नमूद केले.उघड कृत्ये न करता केवळ निषेधाच्या ठिकाणी उपस्थित राहिल्याने आरोपी म्हणून काही परिणाम होऊ शकत नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायाधीश म्हणाले की त्यांच्या विरोधात “निष्काळजी आणि घोडचूक पद्धतीने” खटला चालवला गेला आहे.
लंडनच्या एडवर्ड चा औरंगाबादच्या सांची सोबत बौद्ध पद्धतीने विवाह
अदानी यांच्या अडचणीत वाढ NDTV सोडतायत पत्रकार
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा

First Published by Team Jaaglya Bharat on FEB 04,2023 18:00 PM
WebTitle – Exoneration of Sharjeel Imam and others from sedition charges