मुंबई, दि. 22 : वरळी येथील पोलीस अधिकारी कर्मचारी वसाहत मधिल 51 इमारतींच्या अंतर्बाह्य दुरूस्तीच्या कामाचा शुभारंभ पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी माजी आमदार सुनील शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता के.टी. पाटील, कार्यकारी अभियंता संजय इंदूरकर आदी उपस्थित होते.
येथील इमारती जीर्ण झाल्या असून मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर असणारे पोलीस बांधव आणि त्यांच्या कुटुंबियांना चांगल्या सदनिकांमध्ये राहता यावे यासाठी दुरूस्तीचे काम अद्ययावत, उत्कृष्ट दर्जाचे आणि वेळेत करावे, अशा सूचना श्री.ठाकरे यांनी यावेळी दिल्या.
वरळी पोलीस वसाहत येथे पोलीस कर्मचाऱ्यांसाठी 63 इमारती असून
त्यापैकी पहिल्या टप्प्यात 51 इमारतीतील 1160 सदनिकांच्या अंतर्बाह्य दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केले जाणार आहे.
येत्या एक वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाणार असून उर्वरित इमारतींचे काम पावसाळ्यानंतर केले जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
दुसरी बातमी – महामेट्रो व पीएमआरडीए मेट्रो प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या कामगार पुतळा, शिवाजीनगर येथील झोपडीधारकांचे स्थलांतरण व पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शिवाजीनगर येथील कामगार पुतळा व राजीव गांधीनगर येथील मेट्रोमुळे बाधित होणाऱ्या तसेच सिद्धार्थनगर येथील झोपडीधारकांच्या पुनर्वसनाबाबत आज उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली व्हीव्हीआयपी सर्किट हाऊस येथे बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार सुनील टिंगरे, अण्णा बनसोडे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख उपस्थित होते.
शिवाजीनगर येथील बाधित झोपडीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गतीने मार्गी लावण्याचे निर्देश
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on JUN 22, 2021 21: 30 PM
WebTitle – Environment Minister Aditya Thackeray inaugurates repair work of flats in Worli police colony 2021-06-22