टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी अधिकृतपणे आता ट्विटर चा ताबा घेतला आहे. elon musk ceo Twitter यानंतर त्यांनी ट्विटर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थांना काढून टाकले आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, लीगल, पॉलिसी आणि ट्रस्टच्या प्रमुख विजया गड्डे (Vijaya Gadde), मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल (Ned Segal) आणि इतर काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना मस्क यांच्याकडून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.सूत्रांच्या माहितीनुसार सांगितले की, नेड सेहगल आणि पराग अग्रवाल हे दोघेही सॅन फ्रान्सिस्कोच्या मुख्यालयात उपस्थित होते जेव्हा त्यांना ट्विटरवरून बाहेर काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
अगोदर हे जाणून घ्या की इलॉन मस्क elon musk Twitter यांनी
ट्विटर कंपनीचे सीईओ पराग अग्रवाल Parag Agrawal CEO Twitter यांच्यासह
वरिष्ठ अधिकारी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बनावट खात्यांच्या संख्येबद्दल
ट्विटर गुंतवणूकदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला होता.
अधिकाऱ्यांच्या हटविण्यावर भाष्य करण्यास नकार
तथापि, ट्विटरने अधिकाऱ्यांच्या हटविण्यावर भाष्य करण्यास नकार दिला. परंतु मस्क यांच्या या कृतीमुळे ट्विटर चे कर्मचारी घाबरून गेले आहेत. तथापि, एलन मस्क यांच्या वतीने, ट्विटरच्या कर्मचार्यांना सांगण्यात आले आहे की ते 75 टक्के कर्मचाऱ्यांना काढणार नाहीत. यापूर्वी असे वृत्त होते की मस्क ट्विटरच्या कर्मचार्यांकडून 75 टक्के किंवा 5600 कर्मचारी काढून टाकतील. टेकक्रन्च च्या अहवालानुसार, एलन मस्क यांनी बुधवारी रात्री उशिरा ट्विटर मुख्यालयात भेट दिली आणि कर्मचार्यांना हे स्पष्ट केले की ते कर्मचाऱ्यांना हद्दपार करणार नाहीत.
एलोन मस्क यांनी किती रुपयांना खरेदी केलं ट्विटर?
याआधी प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर हेडक्वार्टरमधून फिरतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता.
$44 अब्ज डॉलर एवढ्या किमतीत ट्विटर विकत घेण्याचा करार पूर्ण करण्यासाठी शुक्रवारच्या
अंतिम मुदतीच्या दोन दिवस आधी त्यानी बुधवारी व्हिडिओ शेअर केला.
मस्क यांनी त्यांचे ट्विटर प्रोफाइल देखील बदलले आहे आणि त्याच्या वैयक्तिक निवेदनात ‘ट्विट चीफ’ असे लिहिले आहे.
त्यानी त्त्यांच्या प्रोफाईलवरील स्थान बदलून त्याच्या elon musk Twitter हेडक्वार्टर असं केलं आहे.
डॉलर;उपासमार व बेरोजगारी च्या समस्येवर तोडगा काढणे याला प्राधान्य हवे
त्रिरश्मी बुद्ध लेणी नाशिक येथे एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on OCT 28,2022, 09:16 AM
WebTitle – Elon Musk’s big move after acquiring ownership of Twitter, ousting CEO Parag Agarwal
Thanks