एकोणिसाव्या शतकाच्या भारतीय इतिहासात अढळ स्थान मिळविणारे हे दांपत्य ज्येतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले – जबरदस्त मानवी सहानुभूती आणि न्यायपूर्ण मानवी सम्यक दृष्टिकोन फुले दांपत्य याच्याकडे होते.या जोडप्याने, आर्य-ब्राह्मण श्रेष्ठत्वाच्या सर्वोच्चतेच्या विचारसरणीला आव्हान देवून जाती-व्यवस्था आणि पितृसत्तेच्या उच्चाटनासाठी आयुष्यभर संघर्ष केला, मानवजातीवर प्लेग महामारी ची आपत्ती आली तेव्हा या दांपत्य यांनी आपले सर्व आयुष्य मानवतेच्या सेवेत दिली आणि आज अजरामर झाले.
संपूर्ण जगाला कोरोना साथीच्या महामारी आजाराचा सामना करावा लागला असताना, त्यावेळी महाराष्ट्रात दुष्काळ आणि प्लेग साथीच्या महामारी रोगाचा प्रादुर्भाव होता तेव्हा फुले दाम्पत्याचे कार्य लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. 15 लक्षाहून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून कोट्यावधी लोकांना जीवनाचे गंभीर संकट ओढवले आहे.
दुष्काळात अनाथ मुलांसाठी 52 शाळा
फुले दाम्पत्याच्या आयुष्यात अशा तीन मोठ्या मानवी आपत्तीदेखील घडल्या. 1876-77 मध्ये महाराष्ट्रात एक भयंकर दुष्काळ पडला. सावित्रीबाई फुले यांना लिहिलेल्या पत्रात ज्योतिबा फुले या दुष्काळाचे भयानक वर्णन करतात, या शब्दांत – ‘जिथे प्राणी-पक्षी अन्न व पाण्याअभावी मरत आहेत .त्यांचे मृतदेह सर्वत्र पसरलेले आहेत. माणसांना जिवंत ठेवण्यासाठी धान्य नाही. जनावरांना चारा आणि पाणी नाही. ही भीषण आपत्ती टाळण्यासाठी गावकरी गावातून पळून जात आहेत. आणि लोक जगण्यासाठी पराकोटीचा संघर्ष करीत आहेत.
अशा परिस्थितीत फुले दाम्पत्याने स्थापन केलेल्या ‘सत्यशोधक समाजा’ने दुष्काळग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सुरवात केली. सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले हे दोघेही वेगवेगळ्या ठिकाणी पीडितांना मदत करीत होते. या दुष्काळाच्या वेळी, मोठ्या संख्येने मुले अनाथ होती, ज्यांची शिक्षण व्यवस्था नव्हती. फुले दाम्पत्याने दुष्काळात अनाथ मुलांसाठी 52 शाळा उघडल्या, त्यामध्ये मुलांना राहण्याची, खाण्याची, पिण्याची आणि अभ्यास शिक्षणाची करण्याची तरतूद होती.
लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी दृष्काळ प्रतिबंधक समिती
फुले दाम्पत्याच्या नेतृत्वात ‘सत्यशोधक समाज’ ने पुढाकाराने लोकांना अन्नधान्य पुरवण्यासाठी ‘दृष्काळ प्रतिबंधक समिती’ स्थापन केली. लोकांच्या अन्नाची व्यवस्था करण्याबरोबरच ही समिती लोकांना मानसिकदृष्ट्या सक्षम करत होती . समाजाचे कार्यकर्ते खेड्यांना भेटी देत असत. वेगवेगळ्या माध्यमातून अन्नधान्याची व्यवस्था करून, लोकांना या दुष्काळाचा सामना कसा करावा याची माहिती देत.
दुष्काळाच्या वेळी, सत्यशोधक समाजाच्या कामांचेही त्या काळातील ब्रिटीश अधिकारी यांनी मोठ्या प्रमाणात कौतुक केले. या संदर्भात सावित्रीबाई फुले आपल्या पत्रामध्ये लिहितात- जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की तुम्ही सत्यशोधक समाजातील लोक जनहितासाठी कल्याणकारी कामे करीत आहात. या उदात्त कार्यात मी तुमची काही मदत करु शकलो तर सांगा मी आपला आभारी राहीन.
प्लेग चा कहर
2 नोव्हेंबर 1890 रोजी ज्योतिबा फुले यांच्या निधनानंतर, सावित्रीबाई फुले यांनी पिडीत दलित बहुजन जनतेची सेवा करण्याचा दृढ निश्चय केला. 1896 मध्ये पुणे आणि आसपासच्या भागात पुन्हा एकदा दुष्काळ पडला. सावित्रीबाई फुले यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी एक रात्रंदिवस केले दुष्काळग्रस्तांना मोठ्या प्रमाणात मदत म्हणून साहित्य पुरवण्यासाठी त्यांनी सरकारवर दबाव आणला. यावेळी सावित्रीबाई सत्यशोधक समाजाचे नेतृत्व करीत होत्या. त्यांनी सत्यशोधक समाजातील हजारो कार्यकर्ते यांना दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी गुंतवून ठेवले आणि स्वत: लोकांच्या मदतीसाठी पूर्णपणे वाहून घेतले.
1897 मध्ये मुंबई, पुणे आणि आसपासच्या भागात प्लेग महामारी चा प्रादुर्भाव पसरला. मृतदेहांचे ढीग सापडले. घर व कुटुंबातील लोकही आजारी लोकांना सोडून पळून जाऊ लागले. आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता लोक पळून जात.अशा वेळी सावित्रीबाई फुले यांनी आपला डॉक्टर यशवंत यांच्या मदतीने लोकांच्या उपचाराची व्यवस्था केली. यशवंतने पुण्यात रुग्णांसाठी क्लिनिक उघडले, तेथे प्लेग पीडित व्यक्तींवर उपचार केले गेले. अशाच एका रुग्णाला उपचारासाठी क्लिनीकमध्ये आणताना सावित्रीबाई ला प्लेग झाला 10 मार्च 1897 रोजी सावित्रीबाई स्वत: प्लेगला बळी पडल्या आणि त्यांचे निधन झाले.
सावित्रीबाईंचा मृत्यू
सावित्रीबाई फुले आपले सगळे आयुष्य मानवतेसाठी जगल्या, सावित्रीबाई च्या मृत्यू नंतर यशवंत फुले सैन्यात डॉक्टर होते.
1905 मध्ये पुण्यात पुन्हा प्लेग पसरला तेव्हा ते उपचारासाठी पुण्यात परतले
आणि त्यांना रुग्णांकडून संसर्ग झाला आणि 1905 मध्ये यशवंतरावाचे निधन झाले.
मानवाबद्दल दया आणि करुणा आहे, जी आधुनिक काळातील फुले-दांपत्याने स्थापित केली आहे.
आज जेव्हा जग महामारी आणि मानवी शोकांतिका ग्रस्त आहे,
तेव्हा आम्ही केवळ फुले दाम्पत्याची आठवण करून आणि त्यांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन
या कोरोना महामारीच्या काळात काम करून मानवजातीवर जे अरिष्ट आले आहे ते दुर करुन त्यांचा वारसा पुढे करू शकतो.
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
हे ही वाचा.. स्मरण क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे
हे ही वाचा..क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले : जीवन आणि कार्य
First Published on APRIL 11 , 2021 14 : 30 PM
WebTitle – during the Epidemic Paid tribute to social reformer jyotiba phule and Savitribai phule2021-04-11