मुंबई महानगरपालिकेकडून दरवर्षी महापरिनिर्वाण दिनी दादर चैत्यभूमी तसेच शिवाजी पार्क परिसरात देश भरातून येणाऱ्या करोडो भीम अनुयायांसाठी तात्पुरता निवारा,पिण्याचे पाणी,फिरती शौचालये,स्वच्छता कर्मचारी,रोषणाई,आरोग्य सुविधा इत्यादींची सुविधा पुरवली जाते.
मात्र, जगभरात हाहाकार माजवलेल्या कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे
यावेळी सरकारकडून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच भारतीय बौद्ध महासभेने देखिल यावेळी आपल्या आपल्या स्थानिक पाळतीवरच अभिवादन करण्याचे आणि गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे.
या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून देशभरातील भीम अनुयायी नागरिकांना पुरविण्यात येणाऱ्या नागरी सुविधा अंशत: रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले असून तसे पत्रक महानगरपालिकेने काढले आहे.यासोबतच महानगरपालिकेकडून महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी चं थेट प्रक्षेपण करण्या येणार असून सर्वानी ऑनलाईन अभिवादन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
टीम जागल्या भारत सुद्धा देशभरातील तमाम भीम अनुयायांना आवाहन करत आहे.आपण सर्वानी गर्दी टाळावी.फिजिकल डिस्टन्सिंग चे काटेकोर पालन करावे.शक्यतो यावर्षी आपल्या स्थानिक विभागातच नियम पाळून अभिवादन करावं.विवेकी विचारी समाजाकडून इतर समाज आदर्श घेत असतो.तुम्ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी आदर्श जयंती साजरी करून देशप्रेमाचे आणि सुशिक्षित कर्तव्यदक्ष समाज म्हणून सर्वांसमोर एक आदर्श उदाहरण घालून दिले.त्याचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक सुद्धा झाले. यावेळीही तीच कृती अपेक्षित आहे.
सविनय जयभीम !
कॅनडा मध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)