पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवली म्हणून साहित्यीक यशवंत मनोहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा जीवन व्रती पुरस्कार नाकारला आहे.विदर्भ साहित्य संघातर्फे डॉ. यशवंत मनोहर यांना जीवनव्रती पुरस्काराने गौरविण्यात येणार होते. मात्र कार्यक्रमात सरस्वीतीची प्रतिमा ठेवू नये अशी मागणी साहित्यीक डॉ. यशवंत मनोहर यांनी केली होती. मागणी केल्यानंतरदेखील परंपरेप्रमाणे सरस्वतीची प्रतिमा ठेवण्यात आली, यामुळे नाराज डॉ. यशवंत मनोहर यांनी कार्यक्रमस्थळी पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला.नकार देताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली ती भूमिका सुद्धा अत्यंत महत्वाची आणि डोळस आहे.
खुलासा
डाॅ.ओरकेंनी मी सांगितल्याप्रमाणे तुमच्याकडे चौकशी केली, पण तुम्ही कार्यक्रमात सरस्वतीची प्रतिमा ठेवणारच असं कळलं. मराठी साहित्यातील माझी प्रखर इहबुद्धिवादी प्रतिमा लक्षात घेऊन आपण अशा दुरुस्त्या कराल असं वाटलं होतं, पण ते झालं नाही म्हणून मी नम्रपणे हा पुरस्कार नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना शिक्षणबंदी आणि ज्ञानबंदी करणा-या शोषणसत्ताकाची प्रतीकं मी पूर्णतःनाकारलीच आहेत. माझा सन्मान म्हणजे जिच्या अनन्यतेमुळे मी ओळखला जातो त्या माझ्या जीवनदृष्टीचा सन्मान ! माझ्या या जीवनदृष्टीत न बसणारे अनेक पुरस्कार मी नाकारले आहेत. हा वाङ्मयीन कार्यक्रम आहे आणि त्यात धर्म येणं मला अजिबात मान्य नाही. म्हणून आपण मला दिलेला जीवनव्रती हा पुरस्कार मी नम्रपणे नाकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपण मला समजावून घ्यावं. मनोहर म्हैसाळकर म्हणजे माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणारा माणूस. ते मला निश्चित समजावून घेतील ही खात्री मला आहे.आयुष्यभर जपले ते मी कोणत्याही कारणास्तव नाकारू शकत नाही कारण मी मला नाकारलं तर माझ्याशी जगण्यासारखं काहीही नाही.क्षमस्व!-यशवंत मनोहर
सरस्वती ही ब्राह्मणी/वैदिक धर्माचे प्रतीक
धर्म आणि साहित्य यात गल्लत करता कामानये.सरस्वती ही विद्येची देवता असणं हे हिंदू धर्मातील धार्मिक प्रतीक आहे.मुळात तसं काहीच नाही.आणि वस्तूत: हे प्रतीक हिंदू धर्मातील नसून वैदिक धर्मातील आहे.याशिवाय अशी कुणीतरी काल्पनिक देवी विद्येची देवता मानणे हाच बुद्धीप्रामाण्यवादी पातळीवरील पराभव आहे.
जसे डॉ. यशवंत मनोहर यांच्या समर्थनात बहुसंख्य लोक उभे राहिले तसे विरोधात देखील काही लोक राहिले.त्यांनी अशी प्रतीके नाकारण्याची गरज नाही.ही हिंदू विरोधी भूमिका असल्याचे थाप मारायला सुरू केले.मुळातच हे सरस्वती ही ब्राह्मणी/वैदिक धर्माचे प्रतीक आहे.
शाळेपासूनच ती मुलांच्या बालमनावर थोपवली गेल्याने तीच मुलं आज मोठी होऊन हे चुकीचं असल्याचं बोलत आहेत.
चूक त्यांची सुद्धा नाही.त्यांच्यावर लहानपणापासूनच विद्येची देवता सरस्वती असं बिंबवले गेल्याने अचानक असं काही नसतं हे स्विकारणे जड जाणे स्वाभाविक आहे.
सावित्रीबाई याच विद्येची देवता
खरतर ही अंधश्रद्धा आहे.कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून तीचा जन्म झाला.
मग तीला तुम्ही भजलं पाहिजे,देवी मानलं पाहिजे अशी धर्माज्ञा,नियम बनवला गेला.
आणि गेली कित्येक वर्षे हे इतर समाजावर थोपवलं गेलं.
चला असं समजू की तुम्हाला तसं वाटतं कुणीतरी काल्पनिक देवी विद्येची देवता आहे.
मग सांगा तिचा जन्म कुठे झाला? तिने कोणत्या शाळेत विद्यार्थ्याना शिकवले किती शाळा महाविद्यालये उघडली?
शैक्षणिक बाजूला ठेवू सामाजिक सांस्कृतिक व्यवहारीक कौटुंबिक अशा कोणत्या तरी क्षेत्रात शिक्षण दिलं आहे?
तीने एखादी कविता केलीय निबंध लिहिला आहे.गणित सोडवले आहे.नेमकं काय केलं की ती थेट “देवता” या पदावर विराजमान झाली?
तसं काही दिसत नाही.ही अंधश्रद्धा आहे.आता या उलट नुकतीच जयंती साजरी झालेल्या माता सावित्रीबाई आहेत.
ज्यांनी महिलांना मागासवर्गीय मुलांना शिक्षणाची दारे खुली केली. शाळा काढल्या.
सनातनी ब्राह्मणी लोकांकडून शिव्याशाप दगड धोंडे शेण चिखल अंगावर झेलले परंतु त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य थांबवले नाही.
शिक्षण मिळू न दिल्याने बहुजन समाजाचे कसे नुकसान झाले हे देखील त्यांनी पटवून दिले.
जर “देवता”च असतील तर त्या सावित्रीबाई याच विद्येची देवता आहेत.मानल्या पाहिजेत.
आजही माळी समाज हिंदू धर्माचा भाग आहे ना?
आता सरस्वतीस विरोध म्हणजे काहींनी यास हिंदू धर्म विरोधी म्हणले आहे.तशा थापा मारणे आणि बहुजणांना मूर्ख बनवून आपले इस्पित साध्य करणे हे हजारो वर्षापासून सुरू आहे.तुम्हाला वाटते ती विद्येची देवता आहे. ती अंधश्रद्धा तुम्ही तशी जरूरच माना याबद्दल कुणीही काही म्हणत नाही.तुमचा तो अधिकार आहे.परंतु दुसऱ्यांनी देखील तीच अंधश्रद्धा मानली पाहिजे. ही तुमची बळजोरी चुकीची आहे.तुमची प्रतीके इतरांवर का थोपवता?
दुसरे असे की माता सावित्रीबाई या हिंदू धर्मीयच- माळी समाजाच्या.आजही माळी समाज हिंदू धर्माचा भाग आहे ना? (महात्मा फुले यांची सत्यशोधक समाज ही पुढची पायरी होती) मग त्यांना विद्येची देवता मानण्यास वाईट का वाटते त्या तथाकथित शूद्र आहेत? तथाकथित खालच्या जातीच्या आहेत म्हणून? कसली भीती वाटते? आपले अजेंडे फेल होतात याची?
यावरून स्पष्ट होते की हा हिंदू धर्म विरोध नसून अंधश्रद्धा आणि वास्तव यातला तिढा आहे.त्यामुळे डॉ. यशवंत मनोहर यांनी घेतलेली भूमिका ही प्रागतिक आहे. आधुनिक आहे. आणि सत्याची कास धरणारी आहे.आज स्मृतिशेष विद्रोही कवी पॅंथर नामदेव ढसाळ यांचा स्मृतीदिन आहे. आजच्या दिवशी एका दुसऱ्या कवीने घेतलेली ही भूमिका यासाठी ऐतिहासिक आणि आताच्या व येणाऱ्या पिढ्यांसाठी एक दिशादर्शक पायवाट आहे.
हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता संदर्भात ; हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी भाग 2
ऑलिम्पिक स्टार वंदना कटारिया च्या घराबाहेर जातीयवादी गुंडांचा नाच
जागल्या भारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..@jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
Comments 2