डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे वाक्य आजही तंतोतंत लागू पडते. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते की, “व्यक्तिस्वातंत्र्याची आवश्यकता जर मान्य असेल तर प्रत्येक व्यक्तीच्या ठायी आपले स्वातंत्र्य रक्षण करण्याची शक्ती उत्पन्न होणे अत्यंत जरूर आहे व ती शिक्षणाशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही यामुळे प्रत्येक सुधारलेल्या राष्ट्रांत प्रजेला सुशिक्षित करण्याची जबाबदारी सरकारला आपल्या अंगावर घेणे प्राप्त झाले आहे याचा अर्थ असा की सरकारने शिक्षण मोफत व सक्तीचे करणे गरजेचे आहे.”
बाबासाहेबांनी ह्यापुढे शिक्षणानंतर नोकरी याबाबतही काही विचार मांडले आहेत.त्याकाळी अस्पृश्य लोकांना इंग्रजांनी त्यांच्या पलटणी मध्ये नोकऱ्या दिल्या होत्या आणि त्या पलटणीतील नोकरीमुळे अस्पृश्य समाज संपन्न झाला होता आणि त्या पलटणीच्या कारणास्तव हिंदू समाजाच्या रचनेत क्रांती झाली होती.आणि या क्रांतीमुळे समाजात बरेच बदल झाले होते.
बाबासाहेबांनी तत्कालीन अस्पृश्य लोकांना आणि इतर मागासवर्गीय लोकांना एक मोलाचा संदेश दिला होता.
त्या संदेशात ते म्हणतात अस्पृश्य लोकांना दोनच धंदे करण्यासारखे आहेत ते म्हणजे एक पांढरपेशा आणि दुसरा शेती.
बाबासाहेब पुढे म्हणतात अस्पृश्य लोकांनी पांढरपेशा धंद्याचा अवलंब करावा.
याचे स्पष्टीकरण देताना बाबासाहेब म्हणतात, “सरकार ही एक मोठी जबरदस्त संस्था आहे.” सरकार ज्याप्रमाणे मनात आणेल त्याप्रमाणे तशा गोष्टी घडवून आणील आणि सरकार सर्वस्वी नोकरांवर ती अवलंबून आहे.
त्यामुळे सरकारचे मन म्हणजे नोकरांचे मन.
यावरून एक गोष्ट सिद्ध होते की, सरकारकडून आपल्याला आपल्या हिताचे काही काम करून घ्यायचे असेल तर आपण सरकारी नोकरीत जाणे गरजेचे आहे.
आणि सरकारी नोकरीत शिरकाव करणे गरजेचे आहे.
त्यामुळे बाबासाहेबांचे हे विचार आजही लागू पडतात.
शिक्षणाच्या बाबतीत बाबासाहेबांनी अगदी प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळे विचार व्यक्त केले आहे.
बाबासाहेबांनी सांगितले आहे की, भारत हा विविध जाती-जमातींचा देश आहे.
आणि या सर्व जाती जमाती सामाजिक दर्जा व आर्थिक स्थिती याबाबत असमान आहेत.
या सर्व जाती जमातींना एकत्र समानतावर आणायचे असेल तर, समान स्तरावर आणायचे असेल तर त्यातील मागास वर्गास काही विशेष सवलती देणे आवश्यक आहे.त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि या विशेष सवलती मध्ये शिक्षण हा प्रामुख्याने मोठा घटक आहे. जोवर प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे होत नाही तोवर मागासवर्गीय समाजामध्ये जागृती निर्माण होणे अशक्य आहे.
पुढे बाबासाहेब म्हणतात की या जमाती शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या आहेत त्यांना आधुनिक शिक्षणाच्या सर्व संधी सर्वप्रकारे उपलब्ध व्हायला पाहिजेत.त्यामुळे त्यांना नागरिक म्हणून आपल्या हक्क आणि कर्तव्याची जाणीव होईल आणि दुसरी म्हणजे अशा जमातींनाअशा संधी उपलब्ध करून द्यायचे असतील तर अशा जमातींना विशेष प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे.
9 मार्च 1924 ला मुंबईमध्ये दामोदर हॉल येथे बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली एक बैठक झाली, या बैठकीमध्ये बाबासाहेबांनी संस्थेला बहिष्कृत हितकारणी सभा असे नाव द्यावे हे सुचवले व ते मंजूर करण्यात आले. संघटनेचे ब्रीदवाक्य म्हणून शिकवा,चेतवा, संघटित करा असे होते.
( शिका संघटित व्हा संघर्ष करा असे नाही,अनेकजण हा क्रम चुकीचा लिहितात)
पुढे 20 जुलै 1924 ला बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन झाली असे जाहीर केले. शिक्षणाप्रती बाबासाहेबांची तळमळ लक्षात घेता बाबासाहेबांनी दिलेल्या मंत्राची आपण जर उकल केली तर त्यात पहिला शब्द आहे तो म्हणजे शिका शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असे सांगणारे बाबासाहेब हे एकमेव महापुरुष होते असे म्हणायला काही हरकत नाही.
बाबासाहेबांनी शिक्षणासोबत शीलही असले पाहिजे असे सांगितले आहे. शिला शिवाय विद्या फुकाची आहे असे बाबासाहेब म्हणत होते. विद्या हे एक शास्त्र आहे आणि ते शास्त्र एखाद्याच्या संरक्षणासाठी जशी वापरले जाते तसेच त्याचा उपयोग घात करण्यासाठी वापरला जाऊ शकतो असे बाबासाहेबांना वाटत होते. त्यामुळे बाबासाहेबांनी विद्या प्राप्त करताना सोबत शील पालनही केले पाहिजे असे सांगतात.
शिक्षणाविषयी आग्रही असणारे बाबासाहेब जेव्हा फ्रान्स आणि जर्मनी मध्ये गेले होते तेव्हा त्यांना भाषेची अडचण निर्माण झाली होती, पण बाबासाहेबांनी फ्रेंच आणि जर्मन भाषा शिकून शिक्षण पूर्ण केले. बाबासाहेब पुढे म्हणतात ज्याप्रमाणे एखादा माणूस दारू प्यायला लागल्यावर तो जन्मभर पितच राहतो. त्याचप्रमाणे आपण शिक्षणाच्या बाबतीत अशाच प्रकारे व्यासंगी असले पाहिजे.
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना ते मार्गदर्शन करताना म्हणतात की.
“तुम्ही घाणेरड्या पाण्यात पडलेली रत्ने आहेत.अत्यंत घाणेरडे झालेल्या पाण्यात अत्तराचे थेंब पडावा त्याप्रमाणे तुमची स्थिती आहे तुमच्या आई बाबांना शिक्षण नाही, अठराविश्वे दारिद्र्य आहे तशी तुमची अवस्था आहे यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे फक्त आणि फक्त शिक्षण आहे.”
डॉ.बाबासाहेबांनी शिक्षण घेणाऱ्या युवकांना खूप मोलाचे सल्ले दिले आहेत. ते म्हणतात की, विद्यार्थीदशे मध्ये असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी राजकारणात भाग घेता कामा नये. अभ्यास सोडून ते राजकारणात पडले तर स्वतःचे नुकसान करून घेतील. शिक्षण जोवर घेत आहेत तोवर त्यांनी फक्त शिक्षण घेतले पाहिजे. तसेच शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक तरुणांनी आपल्यापुढे एक उदात्त ध्येय ठेवले पाहिजे. आणि ते ध्येय गाठण्याची पराकाष्टा केली पाहिजे. जोवर तुम्ही ध्येयापर्यंत पोहोचत नाही तोवर थांबून चालायचे नाही. विद्यार्थी हा महत्त्वाकांक्षी असलाच पाहिजे. ज्यावेळी विद्यार्थ्यांच्या मधील महत्त्वाकांक्षा संपेल त्यावेळी तो मेल्यात जमा असेल. महत्त्वाकांक्षी शिवाय माणूस जगू शकत नाही.
“आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या दीनदुबळ्या जनतेच्या उद्धार करण्या करता वापर करावा“
यानंतर बाबासाहेबांनी शिक्षणाचा उपयोग कसा करावा याबद्दल खूप छान सल्ला दिला आहे.
ते म्हणतात की ,
“आपल्या शिक्षणाचा उपयोग आपल्या दीनदुबळ्या जनतेच्या उद्धार करण्या करता वापर करावा”.
केवळ आपली बायको मुले बरी असे जर वाढले तर त्याचा समाजाला काय उपयोग?
आणि असे लोक समाजाप्रती बेईमान आहेत.शिक्षण घेतले पाहिजे.
आणि त्याचा उपयोग समाजाप्रती झाला पाहिजे.
समाजामध्ये आपल्या शिक्षणाचा फायदा करून दिला पाहिजे.
तसेच समाजाच्या निसर्गदत्त हक्कासाठी आपण जगले पाहिजे.तर त्या शिक्षणाचा उपयोग आहे.
“लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने तिच्या पतीची मैत्री म्हणून तिने पतीच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे.मात्र गुलामासारखे वागण्यास त्या मुलीने खंबीरपणे नकार द्यावा.”
बाबासाहेबांनी शिक्षणामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा असावा याबद्दलही विवेचन केले आहे.
बाबासाहेब म्हणतात स्त्रियांच्या संघटनेवर माझा फार विश्वास आहे.
समाजातील दोष नाहीसे करण्यासाठी स्त्रिया काय करू शकतात हे मी जाणतो.
बाबासाहेब पुढे स्त्रीयांना असा सल्ला देतात की तुमच्या मुलांना शिक्षण द्या.
त्यांच्यामध्ये हळूहळू महत्त्वाकांक्षा जागृत करा.
ते थोर पुरुष होणार आहेत असे त्या मुलांच्यावर संस्कार करा.
त्यांच्यातील न्यूनगंड नाहीसे करा.
पुढे बाबासाहेब म्हणतात की लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने तिच्या पतीची मैत्री म्हणून तिने पतीच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे.
मात्र गुलामासारखे वागण्यास त्या मुलीने खंबीरपणे नकार द्यावा.आणि समतेचा आग्रह धरावा.
स्त्रियांच्या मध्ये इतक्या चांगल्या प्रकारे जागृती करणाऱ्या फार थोडक्या समाजसुधारकांमध्ये बाबासाहेब हे अग्रगण्य आहेत.
जगामध्ये अत्यंत हुशार आणि शिक्षणाच्या बळावर संपूर्ण भारतातील अस्पृश्य आणि मागासलेल्या जनतेला एक नवा प्रकाश, एक नवी आशा,एक नवी दिशा दाखवणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे युगप्रवर्तक होते यात शंका नाही.डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत राहणे ही आज समस्त भारतीयांची गरज बनली आहे.
#जयंती_विशेष
#उद्धारकर्ता_आपला
#मार्गदर्शक_आपला
#उत्सव_आपला
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
हे ही वाचा.. हिंदू कोड बिलाची पार्श्वभूमी
हे ही वाचा.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महिला वर्ग
जागतिक महिला दिन – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपण
कॅनडामध्ये साजरा होतोय “डॉ. बी आर आंबेडकर समता दिन”
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published on APRIL 08, 2021 13 : 05 PM
WebTitle – Dr. Babasaheb Ambedkar’s education policy, jayanti 2021 -04-08