Bloomington, Indiana, USA – 31 जानेवारी 2025 डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथसंपदेचे इंडियाना विद्यापीठास भव्य दान!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर अमेरिकेतील शिक्षण संस्थांमध्ये पोहोचविण्याच्या उद्देशाने, आंबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (AANA) तर्फे इंडियाना विद्यापीठाच्या Herman B Wells ग्रंथालयास डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित आणि संपादित ग्रंथसंपदेचे 20 खंड भेट देण्यात आले. हा उपक्रम “कायदा आणि जात” या विषयातील जागतिक तज्ज्ञ प्रा. केविन ब्राउन यांच्या पुढाकाराने पार पडला.
या ऐतिहासिक उपक्रमाला इंडियाना विद्यापीठातील प्रा. केनेथ डाऊ-शमिट, लुइस फ्युएंटेस-रोह्वर आणि पेड्रो माचाडो (Kenneth Dau Schmidt, Luis Fuentes Rohwer and Pedro Machado) यांनी आपला मोलाचा पाठिंबा दिला. अमेरिकेतील आणि कॅनडातील आंबेडकरी समाजासाठीही हा एक महत्त्वाचा टप्पा असून, या ग्रंथसंपदेच्या माध्यमातून आंबेडकरांचे विचार व तत्त्वज्ञान नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.
आंबेडकर लिखित ग्रंथांचा शैक्षणिक महत्त्व
इंडियाना विद्यापीठाच्या ग्रंथालय प्रमुखांनी या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले की, डॉ. आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे मानवशास्त्र, अर्थशास्त्र, धार्मिक अध्ययन, भारतीय इतिहास आणि सामाजिक न्यायासंबंधीच्या संशोधनासाठी अत्यंत मौल्यवान आहेत.
डॉ. आंबेडकरांनी संविधान, जातिव्यवस्था, आर्थिक धोरणे, धर्म आणि सामाजिक सुधारणांवर केलेले संशोधन आजही महत्त्वपूर्ण ठरते. त्यामुळेच या ग्रंथसंपदेच्या समावेशामुळे इंडियाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांना आणि संशोधकांना सामाजिक परिवर्तनाच्या या महान विचारांवर अभ्यास करता येईल.
इंडियाना विद्यापीठ आणि त्याची शैक्षणिक परंपरा
1820 मध्ये स्थापन झालेले इंडियाना विद्यापीठ हे एक प्रतिष्ठित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ आहे. 48,000 हून अधिक विद्यार्थी, 850 विद्यार्थी संघटना, 80+ भाषा अभ्यासक्रम आणि 380+ परदेशी शिक्षण कार्यक्रमांसह हे विद्यापीठ नावाजलेले आहे.
डॉ. आंबेडकर लिखित ग्रंथसंपदेच्या समावेशामुळे विद्यापीठाच्या सामाजिक न्याय, मानवाधिकार आणि भारताच्या घटनात्मक अभ्यास विषयांना अधिक बळकटी मिळेल.
AANA तर्फे प्रा. केविन ब्राउन आणि इंडियाना विद्यापीठातील सहकारी प्राध्यापकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.
उत्तर अमेरिका खंडात आंबेडकरी विचारांची गगनभरारी
AANA तसेच AIC, AIM, ABAT आणि BSG यांसारख्या आंतरराष्ट्रीय आंबेडकरी संस्थांनी यापूर्वीही अमेरिका व कॅनडातील अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये डॉ. आंबेडकर लिखित ग्रंथसंपदा भेट दिली आहे.
या योगदानामुळे जात, समानता, मानवी हक्क, धर्म आणि सामाजिक सुधारणांवर चाललेल्या आधुनिक चर्चांमध्ये आंबेडकरांचे विचार अधिक प्रभावीपणे पोहोचत आहेत.
या संस्थांना मिळाले आंबेडकर ग्रंथसंपदेचे दान
AANA ने डॉ. आंबेडकरांचे ग्रंथ याआधी खालील प्रमुख विद्यापीठांमध्ये दान केले आहेत:
- Wayne State University, डेट्रॉईट, मिशिगन
- University of Pennsylvania, फिलाडेल्फिया, पेनसिल्व्हेनिया
- Harvard University, केंब्रिज, मॅसॅच्युसेट्स
- Princeton University, न्यू जर्सी
- University of Texas, ऑस्टिन, टेक्सास
- York University, टोरोंटो, कॅनडा
- Northwestern University, इलिनॉय
- Pacific University Oregon, फॉरेस्ट ग्रोव्ह, ओरेगन
- University of Georgia, एथन्स, जॉर्जिया
- Georgia Institute of Technology, अटलांटा, जॉर्जिया
- Eastern Mennonite University, व्हर्जिनिया
- University of Delaware, नेवार्क, डेलावेर
- University of Massachusetts, अॅमहर्स्ट, मॅसॅच्युसेट्स
- Brandeis University, मॅसॅच्युसेट्स
- Columbia University, न्यूयॉर्क
- Franklin University, ओहायो
- Adelphi University, न्यूयॉर्क
- University of North Carolina, ग्रीन्सबोरो
- University of Texas, ऑस्टिन, टेक्सास
याशिवाय, स्थानिक ग्रंथालयांमध्येही आंबेडकर यांच्या ग्रंथांचे वितरण करून भारतीय इतिहास, अर्थशास्त्र, जातिभेद, बौद्ध तत्वज्ञान आणि सामाजिक न्यायावरील सखोल माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे.
AANA – शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा वसा
2008 मध्ये स्थापन झालेली Ambedkar Association of North America (AANA) ही संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार उत्तर अमेरिकेत प्रसारित करण्यासाठी कटिबद्ध आहे.
बौद्ध धर्माच्या अहिंसा, समता आणि ज्ञानाच्या संदेशाचा प्रसार करणे हा AANA चा मुख्य हेतू आहे. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन घडवण्याच्या डॉ. आंबेडकरांच्या मिशनला बळकट करण्यासाठी AANA वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करते.
अधिक माहितीसाठी संपर्क:
🌐 वेबसाईट: www.aanausa.org
📩 ई-मेल: aanausa@gmail.com
📚 संसाधने: https://baws.in
📝 अहवाल सादरकर्ता:
M. वासनिक, अँबेडकर असोसिएशन ऑफ नॉर्थ अमेरिका (AANA)
Support Jaaglyabharat.com, – Your Small Contribution, A Big Step Towards Change!
जागल्याभारत अतिशय कमी रिसोर्स मध्ये काम करत आहे. दुसरीकडे बलाढ्य मेनस्ट्रिम मिडिया (प्रसार माध्यमे) जी सातत्याने फेक न्यूज चालवत असतात,आणि शोषित वंचित समाजाचे प्रश्न दाबत असतात.त्यामुळे आपल्या मिडियाला बळ दिले पाहिजे.
At Jaaglyabharat.com, we’re committed to bringing you accurate, insightful news that you can trust. By making a small contribution, you help us continue delivering high-quality content, expanding our reach, and staying independent. Every bit of support keeps the news accessible and empowers us to do more.
Thank you for standing with us!
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on FEB 06,2024 | 21:15 PM
WebTitle – dr-ambedkar-writings-indiana-university-aana