डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याला आज २४ वर्षे झाली.आज माझ्यासहित अनेक तरुणांना हा लढा अस्मितेचा वाटू शकेल.हकनाक माणसे बळी गेली.घरादाराची राखरांगोळी झाली वगैरे वस्तुस्थिती आहे.हे खरेच.
परंतु केवळ नावासाठी आम्ही भावनिक झालो होतो?
हे सत्य नाही.आम्ही गांधी विद्यापीठात शिकतो.नेहरू विद्यापीठात शिकतो.
टिळक सावरकर शिवाजी महाराज एवढेच काय बनारस हिंदू विद्यापीठातही
शिकतो.आम्ही बाटत नाही आम्हाला जातीयवाद शिवत नाही.आमची मने शुद्ध आहेत मेंदू शुद्ध आहेत.
माणूस बना.माणुसकीने वागा.हे तुमच्या कृतीत दिसले पाहिजे.
तुम्हाला विद्यापीठ अन गुणपत्रिकेवर डॉ.बाबासाहब आंबेडकर नाव आल्याने मनात आणि डोक्यात जातीयकीडा वळवळू लागला होता.हाच तो मनु जो आजही अधूनमधून आपले डोके वर काढत असतो.इतर जातीधर्माचे तुम्हाला नावही सहन झाले नाही.
हेच लोक यांचेच पूर्वज यांची आजची पिढी मुलेबाळे (तन्मयचिन्मय) आजही हीच मानसिकता घेऊन जगत आहेत.अपवादांना सलाम.तुमच्या मागील पिढीची पापे चुका आम्ही तुमच्या माथी मारत नाही.फक्त एवढीच अपेक्षा करतो कि तुम्ही त्याच मार्गाने जावू नका.माणूस बना.माणुसकीने वागा.हे तुमच्या कृतीत दिसले पाहिजे.
डॉ.बाबासाहेब ब्राह्मण असते तर या देशात त्यांची मंदिरे बांधली गेली असती.परंतु बाबासाहेबाना आजही जातीयदृष्टीकोनातून पाहिले जाते.दलितांचे नेते म्हणून पोट्रेट केले जाते.
कुणीतरी शास्त्री फास्त्री बरळतो बाबासाहेबानी घटना लिहिली नाही.कुणीतरी गावखेड्यात पुतळ्याची विटंबना करतो कुणी बाबासाहेबानी भीमा-कोरेगांवची लढाई मिथक म्हणून रचली म्हणून गरळ ओकतो.
अहवेलना आजही सुरु आहे.जातीयवाद आजही तोच आहे टोकदार आहे.काही गोष्टी जरूर बदल्या.काय तर शारीरिक अस्पृश्यता कायदा करून गेली.मात्र मनमेंदुवर अजूनही मनूचा अज्रस्त विळखा आहे.
माजी मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण आहे हा मुद्दा होऊ शकत नाही.मुख्यमंत्री जातीयवादी आहे हा मुद्दा आहे.
माजी मुख्यमंत्री फडणवीस ब्राह्मण आहे हा मुद्दा होऊ शकत नाही.मुख्यमंत्री जातीयवादी आहे हा मुद्दा आहे.
मुख्यमंत्री भीमा-कोरेगावच्या हल्लेखोरांना पकडायचे आदेश देत नाही
मात्र प्रत्येक पोलिसस्टेशनला किमान ४० केसेस नोंद करण्याचे निर्देश देत आहेत.
मुख्यमंत्री पेशव्यांचा वारसदार नाही हे त्याने कृतीतून दाखवून दिले पाहिजे होते.तसे होताना दिसत नाही.
नामांतर लढ्याने आम्हाला संघर्ष शिकवला.स्वाभिमान शिकवला.चिवटपणा शिकवला.प्रतिकूल परिस्थितीत तग धरायला शिकवले.
अन राखेतून फिनिक्स पक्षाप्रमाणे पुन्हा भरारी घेण्याचे आत्मभान दिले.
त्याजागी इतर समाज असता तर देश सोडून परागंदा झाला असता.
आम्ही इथेच झुंज देत आहोत.आम्ही या मातीत जन्मलो आहोत.
एवढे हाल या देशात कोणत्याच समाजाच्या वाट्याला आलेले नाहीत.याचा एकदा माणुसकीच्या नात्याने विचार करावा.
नाही केला तर गिल्ट घेऊन जगणे नशिबी येते त्याला इलाज नाही.माणूस बनणे हाच अंतिम इलाज.
आता परिस्थिती बदलली आहे.समीकरणे बदलली आहेत.
यापुढे अशी आंदोलने नाही झाली तर समाजाच्या हिताच्या दृष्टीने ती होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
आज स्मारक नामांतर हे समाजाचे विषय होऊ शकत नाहीत.
विद्यापीठ कॉलेज हॉस्पिटल्स वसतिगृह शिक्षण नोकरी ऍट्रॉसिटी हेच मुद्दे प्राधान्याने अगत्याने लढणे सोडवणे गरजेचे आहे.
असो नामांतर लढ्यातील सर्व ज्ञात अज्ञात शहिदांना विन्रम अभिवादन
सदियों रहा है दुश्मन, दौर-ए-ज़माँ हमारा।
कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी।
जयभीम जय भारत जय संविधान !!
by मिलिंद धुमाळे
अवतार सिंह पाश…. सबसे ख़तरनाक होता हैं अपने सपनो का मर जाना..
महाश्वेता देवी, शोषित-उत्पीडित वंचिताच्या वेदनेचा आवाज
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)