मोदी सरकारने सोशल मीडियावर बीबीसी डॉक्युमेंटरी ‘इंडिया: द मोदी क्वेश्चन’ ‘India: The Modi Question’ ब्लॉक केल्याबद्दल द हिंदूचे माजी संपादक एन. राम म्हणाले की, याने जगाला संदेश दिला आहे की भारताची राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्था इतकी नाजूक आहे की देशात प्रसारित न झालेल्या माहितीपटामुळे त्याला धोका आहे. YouTube/Twitter वर अॅक्सेस असलेल्या अत्यंत लहान लोकसंख्येद्वारे ती पाहिली गेलीय.मात्र दुसरीकडे लोक बीबीसी डॉक्युमेंटरी डाउनलोड bbc documentary download करण्यासाठी इंटरनेटवर मोठ्याप्रमाणावर सर्च करत आहेत.
राम म्हणाले की सरकारचा हा ‘वेडेपणा’ आहे आणि त्यांनी स्वतःला अडचणीत आणलं आहे.
ते म्हणाले, “जर एखादं परिपक्व सरकार असतं तर त्यांनी कोणतीही टिप्पणी केली नसती किंवा त्याच्याशी फक्त असहमती व्यक्त केली असती.”
द वायरसाठी करण थापर यांच्या 26 मिनिटांच्या मुलाखतीत, राम यांना bbc documentary बीबीसी डॉक्युमेंटरीबद्दल त्यांच्या मताबद्दल विचारण्यात आलं होतं, ज्यावर त्यांनी उत्तर दिलं की , “हा अतिशय काळजीपूर्वक, परिश्रमपूर्वक संशोधन करून सादर केलेला भाग असून शोध पत्रकारितेचे हे एक उत्तम उदाहरण आहे.
download bbc डाउनलोड बीबीसी डॉक्युमेंटरी का सर्च करत आहेत लोक?
बीबीसी डॉक्युमेंटरी वर बंदी आणल्याने डाउनलोड bbc documentary download करण्यासाठी
लोक इंटरनेटवर मोठ्याप्रमाणावर सर्च करत आहेत.अनेकांनी व्हाटसेप ट्विटर टेलिग्राम धुंडाळून झाले आहे.
अनेकजण ही बीबीसी डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी आता उत्सुक झाले आहेत.
साहजिक आहे ज्या गोष्टीवर बंदी घातली जाते त्या गोष्टीच पाहण्यासाठी लोकांच्या उड्या पडत असतात.
विरोधी पक्षाने टीका केली
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी माहितीपटाच्या व्हिडिओ लिंक ट्विट केल्या होत्या.
याला “सेन्सॉरशिप” म्हणत, ओ’ब्रायन म्हणाले की, ट्विटरने त्यांची अगोदरची पोस्ट काढून टाकली होती,
जी “लाखो वेळा” पाहिली गेली होती. त्याच्या आणखी एका ट्विटमध्ये तो म्हणाला की,
‘माझे दुसरे ट्विट तीन दिवस राहिलं नंतर काढून टाकण्यात आलं”
या माहितीपटावर सरकारच्या भूमिकेवर टीका करताना काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी पत्रकारांना सांगितले की, “भारत सरकारची ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ सारखी ‘ब्लॉक इन इंडिया’ नावाची योजना आहे. सरकारला कठोर प्रश्न विचारायचे नाहीत. बीबीसीचे मुख्यालय दिल्लीत असते तर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आतापर्यंत त्यांच्या दारात आले असते.
जेएनयु मध्ये QR कोड वाटले गेले
जेएनयु विद्यापीठात बीबीसी डॉक्युमेंटरी वर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले असून विद्यार्थी नेता आयषी घोष चा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये ती म्हणताना दिसते की तुम्ही जर एक स्क्रीन बंद केली तर आम्ही हजारो स्क्रीन चालू करू.जर पोलिस बळ वापरलं किंवा भाजपच्या लाठ्याकाठ्यावाले असतील त्यांनी स्क्रीनिंग बंद करून पाहावे.आम्ही ही डॉक्युमेंटरी पाहण्यासाठी QR कोड वाटत आहोत, या पद्धतीने आम्ही आंदोलन करत आहोत.
जगदीश गायकवाड ला मुंबईत मारहाण
मागासवर्गीय युवा व्यावसायिकांना मरणाच्या दारात उभा करणारं महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभाग!
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JAN 25,2023 11:20 AM
WebTitle – download bbc documentary narendra modi