मुंबई: साकीनाका येथील बलात्काराच्या घटनेनं राज्यभरात खळबळ उडाली असताना आता डोंबिवलीतही एक खळबळजनक घटना समोर आली आहे. डोंबिवलीमध्ये 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना उघडकीस आली आहे.या घटनेमुळे डोंबिवली हादरली आहे.मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना ताब्यात घेतलं आहे.यातील दोनजण अल्पवयीन असल्याचे कळते.पीडित मुलीकडून मानपाडा पोलीस ठाण्यात 29 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
व्हिडिओ वायरल करू अशी धमकी देऊन अत्याचार
सदर अल्पवयीन पीडित मुलीवर जानेवारी महिन्यापासून सामूहिक बलात्काराची घटना घडत होती,तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.पीडित मुलीच्या प्रियकराने तिच्यावर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवला,त्यानंतर त्या व्हिडिओच्या आधारेच व्हिडिओ वायरल करण्याची धमकी देत आरोपी प्रियकर मुलीला ब्लॅकमेल करत वारंवार बलात्कार करत होता.त्यानंतर इतर आरोपींकडूनही याच व्हिडिओच्या आधारे या मुलीवर बलात्कार करण्यात आले.तब्बल आठ महीने हा भयंकर प्रकार सुरू होता.
या प्रकाराला कंटाळून अखेर मुलीने काल मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
मुलीची कहाणी ऐकून पोलीसही हादरले.त्यानंतर पोलिसानी विविध पथके तयार करून तपास चक्रं फिरवून 26 आरोपींना पकडले आहे.
इतर आरोपींचा शोध पोलिस घेत असल्याची माहिती मिळत आहे.
राजकीय नेत्यांची मागणी
भाजपच्या नेत्या चित्रा वाघ,आणि राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी पोलिस ठाण्याला भेट देऊन कठोर कारवाईची मागणी केली आहे.
आरोपींमध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असणाऱ्यांची मुलं
विशेष म्हणजे या आरोपींमध्ये काही राजकीय पक्षाचे पदाधिकारी असणाऱ्यांची मुलं देखिल असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
उन्नाव केस : अल्पवयीन मुलींसोबत काय घडलं? एकमेव वाचलेल्या मुलीला AIIMS मध्ये शिफ्ट करण्याची मागणी
जागल्याभारत वरील बातम्या/लेख शेअर करून इतर लोकांपर्यंत पोहोचण्यास आम्हाला मदत करा.मित्रांना सांगा.
(वाचकहो..आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा,मित्रांना सांगा)
First Published by Team Jaaglya Bharat on SEP 24, 2021 15:48 PM
WebTitle – Dombivali Incident of gang rape of a minor girl by 29 persons