तामिळनाडू : भारतात तुम्ही राष्ट्रपती असा नाहीतर आयएएस ऑफिसर उच्च पदस्थ अधिकारी तुमचं सोशल स्टेट्स जातीचं स्थान बदलत नाही,आरक्षण संधीमुळे शिक्षण मिळतं,अधिकारी बनता येतं परंतु जात मात्र बदलत नाही,तिचं स्टेट्स तेच राहतं अन त्यामुळे तुम्ही कितीही मोठे अधिकारी व्यक्ती असाल तरी एक चपराशी देखील तुमचा जातीच्या आधारावर अपमान करू शकतो.डॉ.मनीष नारनवरे IAS Dr. Manish Narnaware जे सध्या तामिळनाडूतील इरोड येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी, या पदावर कार्यरत आहेत, त्यांनी आरोप केला आहे की वरिष्ठ IAS अधिकारी गगनदीप सिंग बेदी Gagandeep Singh Bedi यांनी त्यांचा जातीयवादी मानसिकतेतून छळ केला,ते अनुसूचित जाती (SC) समुदायाचे असल्याने त्यांना बेदीकडून वाईट रीतीने ‘हेतुपूर्वक’ वागणूक दिली गेली.
“माझ्या कार्यकाळात, मी SC समुदायातील आहे म्हणून जाणीवपूर्वक बेदी सरांकडून मला खूप वाईट वागणूक आणि छळाचा अनुभव आला.
40 हून अधिक अधिकारी उपस्थित असलेल्या प्रत्येक आढावा बैठकीत अनावश्यक मुद्यांवर त्यांनी माझा अपमान केला,”
असं मनीष नारनवरे यांनी तामिळनाडूच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
“ते (बेदी) मला माझ्या जात आणि श्रद्धा स्थानाबद्दल उल्लेख करायचे आणि इंदूर कॉर्पोरेशनच्या आमच्या अधिकृत भेटीदरम्यान मी उज्जैन मंदिरात (बौद्ध असल्याने) का जात आहे असा प्रश्न विचारायचे,” आयएएस अधिकारी डॉ. मनीष नारनवरे पुढे म्हणाले की बेदी माझ्या विषयाच्या फायलींवर स्वाक्षरी करत नव्हते तसेच कामाच्या नियमित फायलींवर मंजुरी आणि स्वाक्षरी घेण्यासाठी मला दररोज बरेच तास वाट पाहत होते,सहीसाठी रात्री पर्यंत थांबावं लागत असे.असा आरोप आहे. ते नंतर म्हणायचे,Thambi, eppo late aayircha, come tomorrow, same reply next day).(” थंबी , इप्पो लेट आयर्चा, उद्या ये,” दुसऱ्या दिवशी तेच उत्तर असायचं ).
Manish Narnaware मनीष नारनवरे यांनी तक्रार केली की त्यांना नियमित अशा अपमानाचा सामना करावा लागला ज्यामुळे तो नैतिकदृष्ट्या खचले आणि त्यामुळे ते अनेकदा रडले आहेत. आयएएस अधिकारी डॉ. मनीष नारनवरे यांनी सांगितले की, बेदीच्या वागणुकीमुळे त्यांना नैराश्य आले आणि आत्महत्येचे विचारही आले, मात्र, त्यांच्या वडिलांनी त्यांना धीर दिला.
आयएएस डॉ. मनीष नारनवरे यांनी आरोप केला की, बेदी यांनी त्यांच्या आणि तत्कालीन आरोग्य सचिव डॉ. राधाकृष्णन IAS यांच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
आयएएस डॉ. मनीष नारनवरे यांनी बेदी यांच्यावर एससी/एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत योग्य कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सरस्वती वैद्य;खून करून शरीराचे तुकडे कुकरमध्ये शिजवले
पुन्हा फ्रीज हत्याकांड; स्टोनकटरने केले तुकडे,श्रद्धा वालकर हत्याकांडसारखी घटना
पत्नीचे तुकडे करून पाण्याच्या टाकीत लपवले
Nikki Yadav Murder :निक्की यादव चा खून,फ्रीजमध्ये मृतदेह;संपूर्ण प्रकरण
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा..
First Published by Team Jaaglya Bharat on 08, JUN 2023, 14:14 PM
WebTitle – District Collector Manish Naranvare harassed by seniors due to casteism