प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवीन संसद भवनाच्या छतावर बसवलेल्या विशाल अशोक स्तंभाचे अनावरण केले.मात्र त्यानंतर त्याचे फोटो सोशल मिडियात व्हायरल झाल्यावर अशोक स्तंभ वरून वाद सुरू झालाय.याबाबत सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.भारताचे राष्ट्रचिन्ह अशोक स्तंभ बदलण्यात आल्याचे बोलले जात आहे.
सोमवारी ऑल इंडिया मजलिस-ए इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनीही या अनावरणाला
घटनात्मक नियमांचे उल्लंघन म्हटले आहे. त्याचवेळी इतर पक्षांना कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी होती.
आता आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी राष्ट्रीय चिन्ह (अशोक स्तंभ) बदलल्याचा आरोप केला आहे.
एक ट्विट शेअर करत संजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला आहे की,
मला 130 कोटी भारतीयांना विचारायचे आहे की राष्ट्रीय चिन्ह बदलणाऱ्यांना “देशविरोधी” बोलायचे की नाही? मी 130 कोटी भारतीयांना विचारू इच्छितो की जे राष्ट्रीय चिन्ह बदलतात त्यांना “देशद्रोही” बोलावे की नाही?
अशोक स्तंभ वाद
संजय सिंह यांनी शेअर केलेलं ट्विट अविशेक गोयल या युजरचे असून त्यांनी असं म्हटलंय की
खाली आमच्या राष्ट्रीय चिन्हाची 2 चित्रे आहेत
एकात सिंह जबाबदार शासकांप्रमाणे गंभीर मुद्रेत दिसतो
आणि दुसर्यामध्ये मनुष्यभक्षी शासकाच्या भूमिकेत भीती पसरवण्यासारखेच….
तर, जेष्ठ पत्रकार अन विचारवंत, लेखक दिलीप मंडल यांनी देखील नवीन संसद इमारतीवर असलेल्या अशोक स्तंभाबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. अशोक स्तंभाचे मूळ स्वरुप सारनाथ येथील संग्रहालयात आहे. राष्ट्रीय प्रतिकाचा फोटो पोस्टाचे तिकिट, सरकारी दस्ताऐवजात उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. यामध्ये अशोक स्तंभावरील सिंह हा शांत असलेल्या भावमुद्रेत आहे.तर,प्रधानमंत्र्यांनी नवीन संसद भवनात ब्राह्मणी नीती नुसार स्थापन केलेल्या अशोकस्तंभावर आज सिंह अत्यंत नाराज आणि उग्र दिसतो आहे. तुमच्या लक्षात आले आहे का?
अशोक स्तंभ वाद
लेणी, पाली भाषा,आणि एकूणच बौद्ध धम्म अभ्यासक अतुल भोभोसेकर यांनीही हा राष्ट्रीय चिन्हांचा अपमान असल्याचे म्हटलंय
अतुल भोसेकर यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या कृतीचा निषेध व्यक्त केला आहे.ते म्हणतात.
26 जानेवारी 1950 साली, भारत सरकारने सम्राट अशोक यांनी सारनाथ येथे उभारलेल्या स्तंभावरील “सिंह शीर्ष” हे स्वंतत्र भारताची “राष्ट्रीय मुद्रा” म्हणून स्वीकारले.मुळात हे शिल्प आणि त्याच्या खाली असलेले हत्ती, बैल, दौडणारा घोडा आणि सिंह यांची कोरीव शिल्प हे भ.बुद्ध यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग अधोरेखित करते.
मानवतावादी, संपूर्ण प्राणीमात्रां विषयी करुणा व मंगल कामना असलेला बुद्ध विचार म्हणजेच धम्म याचे प्रतीक हा सिंह आहे. तो शांत आहे, स्वतंत्र आहे, त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आहेत व डोळ्यात दृढ निश्चय आहे. त्याचा जबडा नैसर्गिक रीत्या उघडलेला आहे. शिल्पकाराने अतिशय तन्मयतेने, संपूर्ण बुद्ध विचारांचे भाव या संपूर्ण शिल्पात कोरलेले पाहायला मिळतात. हे मानवतावादी विचार चारही दिशांना पसरावे म्हणून हे चार सिंह पाठीला पाठ लावून चार दिशांकडे तोंड करून आहेत. सम्राट अशोक यांना हे अभिप्रेत होते म्हणून त्यांना हा स्तंभ व हे शिल्प उभारले.
हेच मानवतावादी, सर्वांप्रती स्वातंत्र्य, समता आणि बंधूभाव विचार, स्वतंत्र झालेल्या भारताला सर्व जगात घोषित करायचे होते. म्हणूनच भारताच्या प्रथम मंत्रिमंडळाने एकमताने हे शिल्प, “राष्ट्रीय मुद्रा” म्हणून स्वीकार केले.नुकतेच प्रधानमंत्र्यांनी नवीन बांधलेल्या संसदेवर ठेवण्यात येणाऱ्या या राष्ट्रीय शिल्पाचे उद्घाटन केले.
मात्र या नवीन शिल्पात, चारही सिंहांचे भाव अतिशय हिंस्र दाखवले आहेत ज्यामुळे मूळ शिल्पाचा
आणि त्यात असलेल्या बोधाचा अपमान झाला आहे.सिंहात दाखवलेला हिंस्त्रपणा कशासाठी?
राष्ट्र चिन्हात बदल घडवून आणणे हे षडयंत्र आहे की शिल्पकराची चूक?
आणि ज्यामुळे राष्ट्राचा अपमान होत आहे, असे शिल्प का मान्य करण्यात आले?
आधुनिक लेझर तंत्रज्ञानाने मूळ शिल्पासारखेच अगदी हुबेहूब नवीन शिल्प तयार करता आले असते. मात्र जेथे मूळ विचारलाच तिलांजली द्यायची आहे, तेथे शिल्पात बदल होणे स्वाभाविक आहे.या नवीन हिंस्र शिल्पाचा (राष्ट्रीय मुद्रेचा नव्हे) आणि ते साकार करणाऱ्या कंपनीचा व हे शिल्प मान्य करणाऱ्या सर्वांचाच जाहीर निषेध.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनीदेखील राष्ट्रीय प्रतिक असलेल्या अशोक स्तंभाचा एक जुना आणि एक नवीन फोटो ट्वीट केला आहे.
तृणमूल काँग्रेसचे खासदार जवाहर सरकार यांनीदेखील यावर प्रश्न उपस्थित केला आहे. नवीन संसदेच्या इमारतीवर असलेले अशोक स्तंभ हा मोदी व्हर्जन आहे. यामधील सिंहाची भावमुद्रा ही अनावश्यकपणे आक्रमक आहे. याला बदलण्याची मागणी त्यांनी केली आहे.
अशोक स्तंभ हे भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे.नवीन संसद भवनावर उभारलेला अशोक स्तंभ हा कांस्य धातूचा असून आज त्याचे अनावरण करण्यात आले.हा पुतळा 6.5 मीटर उंच आणि 9500 किलो वजनाचा आहे. याला आधार देण्यासाठी सुमारे ६५०० किलो वजनाची स्टीलची यंत्रणाही तयार करण्यात आली आहे.
इतर वाचनीय अपडेट्स,लेख/बातम्या
नवीन संसद सेंट्रल व्हिस्टा इमारतीवर 6.5 मीटर उंच अशोक स्तंभ
छापा मारणारे अधिकारी म्हणाले; “काँग्रेस सरकार पाडा,तुम्हाला मुख्यमंत्री बनवू”
(आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा)
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 12, 2022, 16:50 PM
WebTitle – Dispute starts from Ashoka Stambh in new parliament building; Demand for replacement