मुंबई : महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी रचलेल्या कथित कटाचा पर्दाफाश तीन वर्षांनी झाला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपानुसार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांना दिशा सालियन बलात्कार बोगस प्रकरणांमध्ये अडकवण्यासाठी फडणवीस यांनी आपल्यावर दबाव आणला होता. त्यासाठी खोटी प्रतिज्ञापत्रे बनवावीत म्हणून त्यांनी दडपण आणले होते, असे देशमुख यांनी सांगितले. देशमुख यांनी हा आरोप फक्त केलेला नसून त्याचे ठोस पुरावे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कपटाची सविस्तर माहिती
अनिल देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विश्वासातील एका व्यक्तीला आपल्याकडे पाठवले होते.
खोटी प्रतिज्ञापत्रे बनवून दिल्यास तुमच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, अशी ऑफर फडणवीस यांनी दिली होती.
देशमुख म्हणाले की, ती व्यक्ती अनेकदा आपल्याकडे येत असे आणि फडणवीस यांच्याशी बोलणे करून देत असे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अनिल देशमुख गृहमंत्री होते.
देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना
आपल्यावर १०० कोटी रुपये गोळा केल्याचा खोटा आरोप करायला लावला होता,
असे देशमुख म्हणाले. त्या प्रकरणी कारवाई न करण्यासाठी फडणवीस यांनी ही खोटी प्रतिज्ञापत्रे देण्यास सांगितले होते,
पण आपण त्यास नकार दिला, असेही देशमुख यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांनी मागितलेल्या प्रतिज्ञापत्रांचे मुद्दे
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पैशांचा मागणीचा आरोप:
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले आणि सांगितले की, मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे, त्यासाठी तीनशे कोटी रुपये जमा करून द्यावेत.
- आदित्य ठाकरे वर दिशा सालियन बाबत बलात्काराचा आरोप:
- सुशांत सिंह राजपूत यांच्या मॅनेजर दिशा सालियन यांच्या पार्टीला आदित्य ठाकरे उपस्थित होते. त्यांनी ड्रिंक घेतल्यावर दिशावर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा तिने आरडाओरड केली, तेव्हा तिला बाल्कनीतून खाली फेकले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
- अजित पवार यांच्यावर पैशांची वसुलीचा आरोप:
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला मंत्रालयात बोलावून सांगितले की, गुटखा आणि पानमसाल्याचा धंदा करणार्यांकडून पैसे वसुलीचे काम पार्थ पवार करतील आणि तुम्ही गृह मंत्री म्हणून त्यांना मदत करा.
- अनिल परब यांच्यावर आरोप:
- परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की, दापोलीच्या साई रिसॉर्टमध्ये त्यांच्याच पैशांची गुंतवणूक आहे, फक्त कागदोपत्री मालकी सदानंद कदम यांची आहे. असं प्रतिज्ञा पत्र लिहून द्या.त्या प्रकरणात तक्रार झाल्यास गृहमंत्री म्हणून मदत करा.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी आरोपांवर प्रतिक्रिया देताना सांगितले की,
श्याम मानव हे सुपारी घेऊन आरोप करणाऱ्यांच्या नादी लागले असून अनिल देशमुख यांच्याबाबत ऑडिओ-व्हिडिओ पुरावे आपल्याकडे आहेत.
फडणवीस यांनी देशमुख यांना थेट इशारा देताना म्हटलं की, “मी कुणाच्या नादी लागत नाही आणि कुणी माझ्या नादी लागाला तर सोडत नाही.”
फडणवीस यांच्या या प्रतिकारामुळे या प्रकरणाचे पुढील काय होते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आपल्या जागल्याभारत या युट्यूब चॅनेल ला भेट द्या,सबसक्राईब करा. सपोर्ट करा.
आपल्या @jaaglyabharat या टेलिग्राम चॅनेलवर सहभागी व्हा,ताज्या अपडेट्स मिळवा
जागल्याभारत वर माफक दरात जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
First Published by Team Jaaglya Bharat on JULY 25,2024 | 08:55 AM
WebTitle – disha salian adity thackeray Devendra fadnavis shyam manav uddhav thackeray anil deshmukh